शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

‘उमवि’चा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 1:12 PM

जळगावच्या उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची राज्य सरकारने घोषणा केल्याने खान्देशच्या विद्यापीठाचा सन्मान झाला आहे, असेच म्हणावे लागेल. विद्यापीठाच्या स्थापनेपासून असलेल्या या मागणीची दखल घेतली गेली याचा खान्देशवासीयांना निश्चित आनंद आहे. राज्यातील बहुसंख्य विद्यापीठांना महापुरुषांची नावे दिली गेली असली तरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ त्याला अपवाद होते. ...

जळगावच्या उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची राज्य सरकारने घोषणा केल्याने खान्देशच्या विद्यापीठाचा सन्मान झाला आहे, असेच म्हणावे लागेल. विद्यापीठाच्या स्थापनेपासून असलेल्या या मागणीची दखल घेतली गेली याचा खान्देशवासीयांना निश्चित आनंद आहे. राज्यातील बहुसंख्य विद्यापीठांना महापुरुषांची नावे दिली गेली असली तरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ त्याला अपवाद होते. राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी मोर्चे, आंदोलने, निवेदने, ठराव या माध्यमातून मागणी लावून धरली, परंतु शासनदरबारी खान्देशचा आवाज नेहमीप्रमाणे दुर्लक्षित राहत होता. अगदी दोन महिन्यांपूर्वी भोरगाव लेवा पंचायतच्या महाअधिवेशनातदेखील नामकरणाचा ठराव प्रामुख्याने करण्यात आला होता. ‘देर आए, दुरुस्त आए’ असे म्हणून या निर्णयाचे स्वागत करायला हवे. १९९० मध्ये पुणे विद्यापीठापासून विभाजित होत उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ स्थापन झाले. नावात ‘उत्तर महाराष्टÑ’ असले तरी महसूल विभागातील नगर आणि नाशिक जिल्ह्याचा या विद्यापीठात समावेश नाही. केवळ नंदुरबार, धुळे आणि जळगाव या तीन जिल्ह्यांचे व भौगोलिकदृष्ट्या खान्देशचे हे विद्यापीठ आहे. खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांचे नाव या विद्यापीठाला देणे त्यामुळेच संयुक्तिक आहे. १८८० चा जन्म असलेल्या बहिणाबाई स्वत: निरक्षर होत्या. जळगावजवळील असोदा हे त्यांचे जन्मगाव. १३ व्या वर्षी लग्न होऊन त्या सासरी म्हणजे जळगावला आल्या. शेती हाच त्यांचा उपजीविकेचा व्यवसाय. शेतकरी कुटुंबातील बहिणाबार्इंना प्रतिभाशक्तीचे वरदान आणि डोळस जीवनदृष्टी लाभली होती. अनुभूती, आविष्कार आणि काव्यमय शब्दांनी त्यांनी दैनंदिन जीवनातील घडामोडींवर भाष्य केले. अतिशय गोडवा असलेल्या लेवा गणबोलीत त्यांनी कविता रचल्या. बहिणाबार्इंच्या मृत्यूनंतर त्यांच्या ५० कविता प्रकाशित झाल्या. त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांनी त्या लिहून घेतल्या होत्या. आचार्य अत्रे यांना हे हस्तलिखित दाखविल्यावर त्यांनी या कविता प्रकाशित करण्यासाठी पुढाकार घेतला. अरे संसार संसार, मन वढाय वढाय, अरे खोप्यामधी खोपा यासारख्या जीवनाचे सार साध्या, सोप्या भाषेत सांगणाऱ्या बहिणाबाई त्यांच्या काव्यातून अजरामर आहेत. स्वत: अशिक्षित असूनही असोद्याच्या शाळेच्या वर्णनापासून तर माणसाला कोºया कागदाची उपमा देणाºया बहिणाबाई प्रकांडपंडित म्हणायला हव्या. त्यांच्या काव्यावर अनेकांनी एम.फिल., पीएच.डी. केली असून अजूनही अभ्यास आणि मीमांसा सुरू आहे. सरस्वतीच्या दरबाराला त्यांचे नाव देऊन त्या दरबाराचा गौरव झाला आहे. सरस्वतीचे देणे त्यांनी एका कवितेत वर्णन केले आहे,माझी माय सरसोती, माले शिकवते बोलीलेक बहिनाच्या मनी, किती गुपीतं पेरली

टॅग्स :Jalgaonजळगावuniversityविद्यापीठ