हाफ चड्डीवाल्यांची संगत...

By राजा माने | Published: March 5, 2018 12:26 AM2018-03-05T00:26:32+5:302018-03-05T00:27:03+5:30

सर्वांनाच बुचकळ्यात टाकणे ही जाणता राजाची खासियत. त्यांच्या याच खासियतीमुळे आपल्या इंद्रलोकाचा स्टार रिपोर्टर येमके मात्र पुरता वैतागला आहे. अहो, मागच्या आठवड्यात ‘शेतक-यांना आरक्षण’ या त्यांच्या मागणीचा अर्थ लावण्यात भल्याभल्यांचा मेंदू झिजला.

 Half tights related to ... | हाफ चड्डीवाल्यांची संगत...

हाफ चड्डीवाल्यांची संगत...

Next

सर्वांनाच बुचकळ्यात टाकणे ही जाणता राजाची खासियत. त्यांच्या याच खासियतीमुळे आपल्या इंद्रलोकाचा स्टार रिपोर्टर येमके मात्र पुरता वैतागला आहे. अहो, मागच्या आठवड्यात ‘शेतक-यांना आरक्षण’ या त्यांच्या मागणीचा अर्थ लावण्यात भल्याभल्यांचा मेंदू झिजला. राष्ट्रवादी मावळ्यांनी, मराठा समाजाने, सर्व जाती-धर्माच्या शेतक-यांनी आणि नरेंद्र-देवेंद्रभक्तांनीही त्यांच्या या मागणीचा काय अर्थ लावावा? इंद्रदेवांनी तोच अर्थ लावण्याची असाईनमेंट येमकेला दिली होती़ येमकेला काही रिपोर्ट देता आला नाही. अखेर येमकेचे महागुरू खुद्द नारद त्याच्या मदतीला धावून आले. त्यांनी ‘जाणता राजा’ स्वत: राजसिंहासनावर असताना त्यांनी शेतकºयांना आरक्षण का दिले नाही, याची माहिती इंद्र दरबाराच्या ग्रंथालयातून घ्या, एवढ्या एकाच वाक्यात रिपोर्ट दिला आणि विषय संपविला. हा विषय विसरलोही नाही तोवर मराठवाडा भूमीत उस्मानाबाद इलाख्यातील कळंब तालुक्यात रांजणी या कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांच्या गावी ‘हाफ चड्डीवाल्यांची संगत...’ हा नवा विषय छेडला. खरे तर हाफ चड्डीची फुल्ल चड्डी होऊन आता जमाना उलटला तरी जाणता राजाने परत हाफ चड्डीचा विषय का काढावा? बरं फक्त ते विषय काढूनही थांबले नाहीत तर चक्क त्यांच्या संगतीवर उतरले! या घटनेने ईशान्य भारतातील विजयी रथात आरूढ होऊन आनंदोत्सवात रंगलेले अनेक स्वयंसेवक विचलित झाले. काही क्षणातच आॅरेंज सिटीत रेशीम बागेच्या दिशेने अनेकांचे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज धावू लागले. ही वार्ता इंद्रदरबाराला कळणार नाही, असे कसे होईल? अपेक्षेप्रमाणे नारदांचे फर्मान आमच्या येमकेला आलेच... ‘हे हाफ चड्डी प्रकरण काय आहे? तातडीने इंद्रदरबारी रिपोर्ट द्या!’ असा मेसेज येमकेला मिळाला आणि येमकेंंनी माहिती घ्यायला सुरुवात केली. रांजणी या गावी साखर क्षेत्रात दबदबा असलेल्या बी. बी. ठोंबरे यांच्या सोहळ्यात जाणत्या राजाने संतभूमीतील स्वयंसेवक बागडे नानांना उद्देशून ‘हाफ चड्डीवाल्यांच्या संगतीत राहूनही दुग्धव्यवसाय क्षेत्रात तुम्ही चांगले काम करता’ असे विधान केले, अशी माहिती येमकेला मिळाली. त्याने ती तशीच नारदांना फॉरवर्ड केली. थोड्याच वेळात नारदांकडून निरोप आला. रेशीमबाग आणि स्वयंसेवक परिवाराची काय प्रतिक्रिया आहे ते कळवा?
येमकेने पुन्हा मराठी भूमीसह दिल्ली भूमीतही आपल्या सर्व सोर्सेसशी संपर्क साधला. नरेंद्रभाई वास्तुशास्त्रातील ईशान्य दिशेच्या महतीवर व्याख्यान देण्यात व्यस्त असल्याचे समजले. अमितभार्इंना संपर्क साधला तर तेही गनिमी मार्गाने रेशीमबागेत ‘ईशान्य नजराणा’ पेश करण्यात मश्गुल होते़ येमकेला आता काय करावे हेच सुचेना. म्हणून त्याने करवीरनगरी गाठली अन् थेट चंद्रकांतदादांच्या पुढ्यात जाऊन उभा राहिला. दादा म्हणाले, ‘बोला... बोला... येमकेभाऊ!’
येमके दादांना म्हणाला, ‘हाफ चड्डी प्रकरण तुम्हाला तर माहीत आहे. दिल्लीदरबारी कुणीच सापडेना. तुम्हीच सांगा आता मी काय करू?’ प्रश्न ऐकून दादा गालातल्या गालात हसले. हातातल्या मोबाईलवर बोटे फिरवली आणि येमकेला म्हणाले, ‘बोला आपला मराठी भूमीपुत्र, मुंबईकर, सुनील देवधर लाईनवर आहेत.’ येमकेने मोबाईल कानाला लावला... ‘पुलोदपासून त्यांची आमची संगत आहे़ आतार् ुईशान्य भारतालाच चड्डीवाल्यांच्या संगतीचे महत्त्व विचारायला सांगा़’
 

Web Title:  Half tights related to ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.