शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मस्क, स्क्रीनवर कपडे उतरवणारं ‘ग्रॉक’ आणि सेन्सॉरशिप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 06:38 IST

‘बंदी असेल अशा ठिकाणी’ हे ग्रॉक होऊ देणार नाही, म्हणजे काय? काही देशांमध्ये हे चालेल आणि काही देशांमध्ये नाही, असं मानायचं?

अतुल कहातेएआयचे अभ्यासक

इलॉन मस्क या बहुचर्चित आणि वादग्रस्त उद्योगपतीच्या ‘ग्रॉक’ या एआय टूलच्या गैरवापरावरून उठलेल्या वादळाला शांत करण्यासाठी अखेर या टूलच्या वापरासंबंधीच्या धोरणांमध्ये  बदल करत असल्याची घोषणा ‘एक्स’वर (म्हणजे आधीच्या ‘ट्विटर’वर) करण्यात आली. हा मुद्दा ग्रॉक या एआय टूलच्या संदर्भात निर्माण झालेला असला तरी उद्या तो आणखी कुठल्याही एआय टूलच्याबाबतीत उद्‌‌भवू शकेल, हे निश्चित! 

मुळात घडलं  काय? ग्रॉक या एआय टूलचा वापर करून कुणीही इतर कुणाचंही छायाचित्र घेऊन ते छायाचित्र तोकड्या कपड्यांत किंवा नग्नावस्थेत असल्याचं दाखवू शकत होतं. यामुळे अनेक लोकांना विलक्षण  लज्जास्पद प्रसंगांचा आणि अश्लाघ्य ‘ट्रोलिंग’चा सामना करावा लागला. आता ‘जिथे अशा गोष्टींवर बंदी असेल अशा ठिकाणी’ या गोष्टी घडू नयेत, अशी तांत्रिक सोय ग्रॉकमध्ये केली असल्याचा तसंच छायाचित्रांमध्ये बदल करण्याचा अधिकार ग्रॉकच्या फक्त ‘पेड’ (म्हणजे वर्गणीदार) यूझर्सनाच दिल्याचा दावा ग्रॉकच्या वतीनं करण्यात आला आहे. 

‘एआय टूल’चा सोपा अर्थ म्हणजे एआयचा वापर करून कुठलंही काम अगदी सहजपणे करणं. यात एआयकडून माहिती मिळवण्यापासून एआयला ई-मेल लिहायला सांगण्यापर्यंत, कुठलंही छायाचित्र किंवा कसलीही चित्रफीत बनवायला सांगेपर्यंत काहीही करता येतं. काही एआय टूल्स विशिष्ट प्रकारचीच कामं करण्यासाठी बनवलेली असतात, तर काही एआय टूल्स विविध प्रकारची कामं करू शकतात. असंख्य एआय टूल्स  (निदान काही काळ / काही मर्यादांपर्यंत) फुकट वापरता येण्याजोगी असतात. व्यावसायिक कामांसाठी याच टूल्सची ‘पेड’ आवृत्ती असते. ग्रॉक हे चॅट जीपीटी, जेमिनी, क्लॉड, डीपसीक यांच्यासारख्या ‘लार्ज लँग्वेज मॉडेल (एलएलएम)’ प्रकारात मोडणारं बहुरूपी एआय टूल असंख्य प्रकारच्या गोष्टींसाठी वापरता येतं. त्यातलाच एक वापर चित्रं नव्यानं काढणं किंवा अस्तित्त्वात असलेली छायाचित्रं हवी तशी बदलणं. 

नेमक्या याच सोयीचा चुकीचा वापर काही गैरप्रवृत्तीच्या लोकांनी केल्यामुळे हे वादळ उठलं. मुळात ग्रॉकमध्ये अशा प्रकारची सुविधा उपलब्ध असणं, हीच मोठी चूक होती. एआयचा वापर कशा प्रकारे होऊ शकतो, याविषयी आता तंत्रज्ञान विश्वात पुरेशी जाण आलेली आहे. अशा प्रकारच्या गोष्टी अशक्य किंवा किमान अशक्यप्राय तरी व्हाव्यात, यासाठी ‘गार्डरेल’ची संकल्पना वापरली जाते. एआयनं कुठल्याही प्रकारचं विघातक कृत्य होण्यापूर्वीच थांबवावं, द्वेषमूलक, वर्ण / धर्म / जात / लिंग अशा कुठल्याही गोष्टीवरून केला जात असलेला भेदभाव होण्याआधीच थांबवावा, हा त्यामागचा उद्देश. एआयनं अश्लील, बीभत्स, समाजामध्ये तेढ पसरवणारं असं काहीही आपल्या हातून घडू देऊ नये, अशीही अपेक्षा ‘गार्डरेल’ बसवताना केली जाते.  

एआय टूलचा गैरवापर रोखण्याची जबाबदारी  हे टूल तयार करणाऱ्या आणि त्याचा वापर होऊ देत असलेल्या कंपनीवर असतो. ग्रॉकनं इतक्या निष्काळजीपणे या गोष्टी घडू दिल्या, ही नि:शंकपणे ‘एक्सआय’ या तिच्या मूळ कंपनीची घोडचूक ठरते. आता यावरचा उपायही चमत्कारिकच वाटतो. ‘जिथे अशा गोष्टींवर बंदी असेल, अशा ठिकाणी’ हे ग्रॉक होऊ देणार नाही, म्हणजे नेमकं काय? काही देशांमध्ये कुणीही कुणाचेही कपडे समोरच्या स्क्रीनवर उतरवावेत आणि काही देशांमध्ये हे चालणार नाही, असं मानायचं? यूझर भारतामधला असेल आणि त्यानं हे एखाद्या अमेरिकी नागरिकाच्या बाबतीत केलं तर कुठले नियम लावायचे? शिवाय अशा प्रकारच्या गोष्टींमधून पळवाटा शोधण्यासाठी चतुर लोक आपलं खरं ठिकाण लपवण्यासाठी ‘व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन)’चा वापर करू शकतात, त्याचं काय? मूळ चूक तर गंभीर होतीच; पण त्यावरचा उपाय त्याहूनही भयानक आहे. ‘एआयचे गॉडफादर’ म्हणून ओळखले जात असलेले नोबेल पारितोषिक विजेते जेफ्री हिंटन यांनी एआयच्या संभाव्य धोक्यांविषयी इशारा दिलेला आहे. एआयचा गैरवापर करण्यासाठी टपून बसलेले लोक हॅकिंग करण्यापासून बॉम्ब तयार करण्यापर्यंत अनेक प्रकारे या अद्भुत तंत्रज्ञानाचा फायदा घेण्यासाठी जंग जंग पछाडतील, असं हिंटन बजावून सांगतात. एकूणच कितीही गार्डरेल्स लावली, कितीही सेन्सॉरशिप लादली, तरीही हे प्रकार पूर्णपणे थांबवणं आता जवळपास अशक्य झालं आहे.

माणसामधली विकृती एआयवरही भारी पडण्याची ही उदाहरणं अपवाद म्हणूनच बघायला मिळतील एवढीच आशा आपण करू शकतो.akahate@gmail.com 

English
हिंदी सारांश
Web Title : Musk's Grok, AI Censorship, and Concerns Over Misuse Unveiled

Web Summary : Grok AI tool's misuse, allowing image manipulation, sparked controversy. X Corp's response and AI's potential dangers, misuse for malicious purposes, raise censorship questions. Guardrails are crucial.
टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कSocial Mediaसोशल मीडियाArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स