या गोजिरवाण्या घरात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:03 AM2018-05-25T00:03:20+5:302018-05-25T00:03:20+5:30

माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. आपण दोघे मिळून घरात पाळणाघर काढू.

In this gozed house ... | या गोजिरवाण्या घरात...

या गोजिरवाण्या घरात...

Next

- संदीप प्रधान

आजोबा आणि नातू चिंतू एका उद्यानात कोपऱ्यात बसलेले असतात. दोघांचे चेहरे तणावपूर्ण...
चिंतू : आज्जो, आपण इथं का आलोय?
आजोबा : चिंतू, आपल्या घरातला प्रॉब्लेम तुला चांगलाच ठाऊक आहे. त्याच्यावर सोल्युशन काढायला.
चिंतू : कुठल्या प्रॉब्लेमबद्दल बोलतोयस तू आज्जो?
आजोबा : (दीर्घ सुस्कारा टाकत) चिंतू, तुझे पप्पा म्हणजे आमचे चिरंजीव आॅफिसात, त्यानंतर मित्रांसोबत क्लबमध्ये आणि उरलेल्या वेळात मोबाईलमध्ये कित्ती बिझी असतात, तुला ठाऊक आहेच.
चिंतू : बरोबर आज्जो. पप्पा खूप स्ट्रेसखाली आहे.
आजोबा : कसला आलाय डोंबल्याचा स्ट्रेस. त्याचं लक्षच नाही घरात. परवा त्याच्या ब्लॅक टीमध्ये मी गुपचूप एरंडेल तेलाची निम्मी बाटली उपडी केली. हा शुंभ मोबाईलमध्ये गर्क. पठ्ठ्यानं पटकन कप तोंडास लावला आणि खाली ठेवला. तुझ्याएवढा होता तेव्हा घरभर पळवायचा. दुसºया दिवशी सकाळी मला म्हणतो कसा, आज अंमळ जास्तच हलकं वाटतंय.
चिंतू : आज्जो, द्या टाळी. पण, इट्स नॉट फेअर. कुणाच्या नकळत असं काही मिक्स करणं बरं नाही. शिवाय, तुमचं एरंडेल तेल का काय ओल्ड फॅशन झालंय. आता रात्री दोन घ्यायच्या, सकाळी टकाटकचा जमाना आहे.
आजोबा : ते जाऊ दे. मुद्दा हा की, तुझ्या पप्पाला वेळ नाही. आईला तिचे करिअर, किटी पार्टी, शॉपिंग, सोशल लाईफ यामध्ये वेळ नाही. आता आमचं कुटुंब म्हणजे सौ. त्यांनाही या वयात स्पेस हवी आहे. त्याचं काय आहे चिंतू, आमच्या हिनं आयुष्यभर नोकरी केली. तशी तिची नोकरी होती सोसोचं. म्हणजे, पंचपक्वान्नाच्या ताटात लोणचं किंवा कोशिंबीर असते तशी. पण, तिनंही चांगली ३०-३२ वर्षे इमानेइतबारे केली नोकरी...
चिंतू : आज्जो, कम टू दी पॉइंट. मला फ्रेण्ड्सबरोबर मॅच खेळायला जायचंय.
आजोबा : चिंतू, मुद्यावरच येतोय. त्यामुळे घरात तुला आणि तुझ्या धाकट्या बहिणीला कुणी सांभाळायचं असा पेच निर्माण झालाय. रोज भांड्याला भांड लागतंय. आपण काहीतरी सोल्युशन काढायला हवं.
चिंतू : आपण काय सोल्युशन काढणार आज्जो?
आजोबा : माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. आपण दोघे मिळून घरात पाळणाघर काढू. म्हणजे, आपल्या विंगमधील सगळ्याच घरांमधील मुलांच्या सांभाळण्याचा प्रश्न चुटकीसरशी सुटेल. शिवाय, तुला आणि छकुलीला दिवसभर कंपनी राहील.
चिंतू : आज्जो, ही फॅन्टास्टीक आयडिया आहे. मी आजच सर्व दोस्तांना सांगतो.
(आजोबा आणि चिंतू यांची घरात पाळणाघर सुरू करण्याची कल्पना घरात जुजबी खळखळ करून स्वीकारली जाते. प्रत्येकजण आपल्याला स्पेस मिळणार, या आनंदात होता. पण, चेहºयावर दाखवत नव्हता.) घरात आठदहा मुलं जमतात. दंगा सुरू होतो. आजोबा हळूच कपाटातून ग्लास आणि बाटली काढतात. तेवढ्यात,चिंतू येतो आणि डोळे वटारतो. आजोबा तोंडावर बोट ठेवून गप्प राहण्यास खुणावतात. चिंतू, मलाही हवी ना स्पेस, असं बोलतात...

Web Title: In this gozed house ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.