शहरं
Join us  
Trending Stories
1
Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
2
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
3
Rohit Pawar पवार कुटुंबात तीन खासदार, दोन आमदार तरी ही घराणेशाही नाही; रोहित पवारांचा तर्क ऐका...
4
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
5
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
6
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
7
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
8
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
9
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
10
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
11
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
12
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
13
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
14
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
15
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
16
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
17
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
18
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड
19
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
20
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित

शासकीय कार्यालयांतील टॉयलेट एक ‘व्यथा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 4:16 AM

टॉयलेट एक पे्रमकथा नावाचा चित्रपट २०१७ मध्ये येऊन गेला. अक्षयकुमार अभिनित हा चित्रपट स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारा होता. ‘स्वच्छ भारत अभियान’च्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट बेतलेला होता

टॉयलेट एक पे्रमकथा नावाचा चित्रपट २०१७ मध्ये येऊन गेला. अक्षयकुमार अभिनित हा चित्रपट स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारा होता. ‘स्वच्छ भारत अभियान’च्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट बेतलेला होता. त्याला देशभरात चांगला प्रतिसाद मिळाला. यापासून प्रेरणा घेऊन शासकीय जनजागरण आणि अनुदानाच्या माध्यमातून अनेक गावे, शहरे हागणदारीमुक्त झाली. परंतु, सरकार किंवा शासनव्यवस्था चालविणाऱ्या शासकीय कार्यालयांतील टॉयलेटची म्हणजेच स्वच्छतागृहांची स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने कोल्हापुरातील प्रमुख शासकीय कार्यालयांच्या टॉयलेटचे स्टिंग आॅपरेशन गेल्या आठवड्यात केले. त्यातून काय दिसले. नागरिकांना स्वच्छतेची शिकवण देणाºया सरकारच्या कार्यालयांतील स्वच्छतागृहेच अस्वच्छ आहेत. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय, मध्यवती बसस्थानक आदींचा समावेश आहे. जिल्हा परिषद, न्याय संकुल, पोलीस मुख्यालय, रेल्वे स्थानक यासारख्या काही कार्यालयांतील स्वच्छतागृहे मात्र स्वच्छ होती. त्यांची दैनंदिन स्वच्छता केली जात असल्याचे आढळून आले. ज्या ठिकाणी अस्वच्छता होती तिथे दुर्गंधीचे साम्राज्य होते. पान, मावा, तंबाखू खाऊन मारलेल्या पिचकाºयांचे व्रण जिथे-तिथे दिसत होते. नागरिकांना त्या स्वच्छतागृहात जाताना नाक मुठीत धरूनच जावे लागत होते.हे केवळ कोल्हापुरातील चित्र असले तरी राज्यातील शासकीय कार्यालयांतील ते यापेक्षा वेगळे नसावे. याला काही अपवाद असतात; परंतु शासकीय अनास्था स्वच्छतागृहांच्या बाबतीत सर्रास दिसून येते. केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू केले आहे. या अभियानांतर्गत अनेक गावे, शहरे हागणदारीमुक्त झाली आहेत. शासनदप्तरी ती हागणदारीमुक्त असली तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणांची वस्तुस्थिती काहीशी वेगळी असते. ते कुणीही नाकारणार नाही. याच अभियानांतर्गत केंद्र सरकार स्वच्छ शहरांचे मानांकनही जाहीर करते. त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रातील एक ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सातारा १६ व्या व सांगली-मिरज-कुपवाड २६ व्या, तर कोल्हापूर ३४ व्या क्रमांकावर आजघडीला आहेत. सध्या अनेक नगरपालिका स्वच्छतेच्या जाहिराती प्रसिद्ध करून या कार्यक्रमातील आपला सहभाग नोंदवीत आहेत. पण, हे केवळ जाहिराती किंवा काही दिवसांचे प्रबोधन एवढ्यानेच होणार नाही. यासाठी नागरिकांची मानसिकता तयार करणे व स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यावे लागेल. स्वच्छतेमुळे रोगराई, साथीचे आजार कसे कमी होतात हे सोदाहरण सांगावे लागेल तरच लोक स्वत:हून या अभियानात सहभागी होऊ लागतील. अन्यथा, केवळ एक शासकीय कार्यक्रम असेच त्याचे स्वरूप राहील.शासकीय कार्यालयांत फेरफटका मारला असता अनेक फाईल्सवर धूळ साचलेली दिसते. डिजिटलच्या जमान्यात फाईल्स इतिहासजमा होत असल्या तरी अद्याप अनेक कार्यालयांमध्ये त्यांचे अस्तित्व आहे. कार्यालयीन कामात डिजिटलमुळे बदल घडले, आधुनिकता आली तरी स्वच्छतागृहांबाबत अजूनही सुधारणा झालेली दिसत नाही. ती होण्यासाठी सरकारने कडक धोरण स्वीकारायला हवे. पडझड झालेली स्वच्छतागृहे तातडीने दुरुस्त करावीत. तसेच अधिकारी, कर्मचाºयांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. कामचुकारपणा करणाºयांवर थेट कारवाईचा बडगा उगारायला हवा. असे झाले तरच शासकीय कार्यालयांतील ही स्वच्छतागृहे ‘टॉयलेट एक व्यथा’ न राहता ‘प्रेमकथा’ बनतील.- चंद्रकांत कित्तुरे

(chandrakant.kitture@gmail.com)