शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महादुर्बिणीचे वैश्विक योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2016 03:57 IST

अनंत, अथांग आणि अनाकलनीय अशा अंतरिक्षाचे गूढ अवघ्या विश्वाला आहे. अद्याप जिथे प्रत्यक्षात पोहोचता आलेले नाही व इतक्यात ती शक्यताही नाही अशा अंतरिक्षाचा शोध

अनंत, अथांग आणि अनाकलनीय अशा अंतरिक्षाचे गूढ अवघ्या विश्वाला आहे. अद्याप जिथे प्रत्यक्षात पोहोचता आलेले नाही व इतक्यात ती शक्यताही नाही अशा अंतरिक्षाचा शोध घेण्यासाठी मात्र आधार घ्यावा लागतो तो महादुर्बिणींचाच.पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील खोडद या गावी उभारलेल्या जीएमआरटी (जायंट मीटरवेव्ह रेडिओस्कोप टेलिस्कोप)चे योगदान भारतासाठीच नव्हे तर अवघ्या जगासाठी अत्यंत मोलाचे आहे. येथील शास्त्रज्ञांनी खगोलशास्त्राच्या क्षेत्रात केलेली कामगिरी, उलगडलेली नवी रहस्ये आणि त्यातून खगोलविश्वाचे झालेले नवे ज्ञान साऱ्या जगाने आजवर नावाजलेले आहे. खगोलशास्त्रातील हे योगदान दुर्लक्षून पुढे जाणे आता शक्य नाही. त्यामुळेच जगभरातील दहा मोठे देश एकत्रित येऊन जीएमआरटीच्या क्षमतेपेक्षा ३० पट अधिक क्षमता असणारा 'स्का' नावाचा एक महाप्रकल्प हाती घेत असताना त्यांनी या महाप्रकल्पाला मार्गदर्शक म्हणून जीएमआरटीला मानाचे स्थान दिले आहे. जीएमआरटीचा या क्षेत्रातील प्रदीर्घ आणि लक्षणीय अनुभव लक्षात घेऊन ही धुरा सोपवण्यात आली आहे. प्रत्येक पुणेकराचा, महाराष्ट्राचा व अवघ्या देशवासियांचा ऊर अभिमानाने भरून यावा अशीच ही सुखद घटना आहे. भारतीय वैज्ञानिकांनी व खगोलशास्त्रज्ञांनी जीएमआरटीच्या माध्यमातून जे मुलभूत संशोधन केले आहे आणि या क्षेत्रासाठी जे योगदान दिले आहे, त्याची योग्य दखल घेत अवघ्या जगाने त्यावर आता शिक्कामोर्तब केले आहे, याचेच द्योतक म्हणजे हा मानाचा तुरा आहे.या 'स्का' प्रकल्पामध्ये दहा देशातील ३०० पेक्षा अधिक जाणकार खगोलशास्त्रज्ञ कार्यरत राहणार आहेत. त्यांच्या संशोधनाला योग्य दिशा देण्यासाठी जीएमआरटी मार्गदर्शकाच्या भूमिकेत असल्याने भारताकडून जगाला फार मोठ्या अपेक्षा आहेत. जीएमआरटीच्या वाटचालीचा मागोवा घ्यायचा म्हटले तर, वैज्ञानिक संस्कृतीचे जनक डॉ. होमी जहांगीर भाभा यांनी मुंबईत १९४५ मध्ये टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) ही संस्था स्थापन केली. जागतिक दर्जाचे संशोधन घडावे या हेतुने त्यांनी परदेशात गेलेल्या तरुण आणि बुध्दिमान संशोधकांना स्वदेशी बोलावले. त्यातूनच डॉ. गोविंद स्वरुप यांच्यासारखे तरुण मायदेशी परत आले. डॉ. स्वरुप यांनी जीएमआरटीचा पहिला प्रस्ताव १९८४ मध्ये सादर केला. डॉ. विजय कपाही यांनीही महत्वाची भूमिका निभावली. अमेरिकेतील त्यावेळच्या सर्वात मोठया व्हेरी लार्ज अँरेपेक्षा (व्हीएलए) तिप्पट आकाराच्या ठरणाऱ्या या प्रकल्पाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले. पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानाच्या आधारे प्रकल्पाची निर्मिती केली. जीएमआरटी दुर्बिणीच्या माध्यमातून सर्वप्रथम सूर्याचे निरीक्षण केले. या यशस्वी कामगिरीनंतर जीएमआरटीने तामिळनाडू मधील उटी येथे प्रकल्प उभारणीसाठी योगदान दिले. खगोलविश्वाचे गूढ उलगडण्यात मोठा हातभार लावला. विशेष म्हणजे भारतातील रेडिओ खगोल शास्त्राला याचवर्षी ५३ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जीएमआरटीला मिळत असलेले मानाचे स्थान अभिमानास्पद आहे. जगभरात जे विविध क्षेत्रात संशोधन होत असते, त्यामध्ये भारतातील शास्त्रज्ञ व वैज्ञानिकांनी कायमच स्वत:चा ठसा उमटवला आहे. विज्ञान वैभवात भर घालून संपूर्ण जगात आपल्या देशाची वैज्ञानिक क्षमता वाढविण्यात व अस्मिता उंचावण्यात जीएमआरटी प्रकल्पाचा निश्चितच मोलाचा वाटा आहे. संचालक प्रा. यशवंत गुप्ता व मुख्य वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी जे. के. सोळंकी यांच्या खांद्यावर सध्या जीएमआरटीची धुरा आहे. जगातील एक महाकाय दुर्बिण आणि त्यातून समोर येणारे मौलिक संशोधन यामुळे जीएमआरटीचे नाव जगात सन्मानाने घेतले जातेच त्यात आता जागतिक स्तरावरच्या एका भव्य आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पात मार्गदर्शकाच्या नव्या भूमिकेतही जीएमआरटी 'विश्वाचे आर्त' उलगडण्यात निश्चितपणे सर्वोत्तम योगदान देईल असा विश्वास आहे. - विजय बाविस्कर