शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

काचेचे घर आणि दगडी चाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 4:05 AM

‘जिनके घर शीशे के होते हैं, वे दुसरों के घर पर पत्थर नही मारा करते’ एरवी हिंदी सिनेमात मारला जाणारा हा घिसापिटा डायलॉग परवा नागपूर अधिवेशनात भाव खाऊन गेला.

- दिलीप तिखिले‘जिनके घर शीशे के होते हैं, वे दुसरों के घर पर पत्थर नही मारा करते’ एरवी हिंदी सिनेमात मारला जाणारा हा घिसापिटा डायलॉग परवा नागपूर अधिवेशनात भाव खाऊन गेला. हा डायलॉग फेकणारे दुसरे, तिसरे कुणी नसून खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्यामुळे साहजिकच डायलॉगचे वजन वाढले आणि सभागृह टाळ्या व हंशाने दणाणून गेले. (आता ह्या टाळ्या केवळ सत्ताधारी बाकांवरूनच पडल्या हे वेगळे सांगणे न लगे.)मुख्यमंत्र्यांनी एक बरे केले. ‘माझे घर काचेचे नाही’ हे आधीच सांगून टाकले. उगाच सरकारच्या पारदर्शी कारभारात डोके खुपसणारे ‘विघ्नसंतोषी’ आपल्या घरातही डोकावू लागले तर काय घ्या...! पण तूर्तास तरी त्यांना हा प्रॉब्लेम नाही कारण त्यांनी आपले जुने घर पाडून नवे बांधायला घेतले आहे. आता या नव्या घरात काचेचा अजिबात वापर होणार नाही अशा सूचना त्यांनी दिल्याचे समजते.देवेंद्रबाबू तसे स्पष्टवक्ते आणि तेवढेच शांत स्वभावाचे. पण... परवाचा त्यांचा आवेश वेगळाच होता. त्याला कारणही तसेच होते. गेल्या चार वर्षांच्या काळात प्रथमच त्यांच्यावर कुणी भ्रष्टाचाराचा थेट आरोप करीत होते. या आरोपातील हवा काढताना बाबूंनी मग अशी काही बॅटिंग केली की विरोधकांना बॅकफूटवर जावे लागले. ‘तूमएक मारोगे तो हम दस’ अशा आवेशात त्यांनी मागच्या सरकारच्या काळातील २०० प्रकरणेच रडावर आणली. आता यात काचेचे घर कुणाकुणाचे आहे याचा ते शोध घेत आहेत म्हणे. यात पहिल्या क्रमांकावर आहेत (अर्थातच) विखे पाटील.पण...हा आरोप करण्यात आघाडीवर असलेल्या विखेंनी मात्र लगेच खुलासा करून टाकला... ‘मी काचेच्या नव्हे तर ‘दगडी घरात’ राहतो.नंतर विखेंना कुणीतरी गमतीने म्हणालेही..., काय राव...खुलासा करताना ‘दगडी घर’ म्हणण्याऐवजी ‘दगडी चाळ’ म्हटले असतं तर...!त्याने काय झाले असते...? विखे न समजून म्हणाले!काय झाले असते...? अहो...‘दगडी चाळी’चे नुसतं नाव ऐकून देवेंद्रबाबूच काय नरेंद्रभाईसुद्धा कधी तुमच्या वाटेला गेले नसते.अर्थात हा गमतीचा भाग सोडला तरी देवेंद्रबाबूंनी खेळलेल्या चालीने काँग्रेस आणि राष्टÑवादीची चिंता वाढली आहे हे खरे! या दोन्ही पक्षांत त्यावर विचामंथनही सुरू झाले.आपण त्यांची चार लफडी पुढे काय आणली, त्यांनी चक्क २०० ची यादी तयार करावी...? बहोत नाईन्साफी है ये...! राष्ट्रवादीचा कुणीतरी म्हणाला.त्यावर काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया...जाऊ दे. आपली ६० वर्षांच्या काळातील २०० आणि त्यांची चार वर्षांतील तीन-चार. अ‍ॅव्हरेज काढा...सेम टू सेम.तिसरा म्हणाला...! डोण्ट वरी... वरुण राजाच्या कृपेने सर्वकाही ठीक होईल....आता हा वरुण राजा कोण आणि त्याचा येथे काय संबंध? दोन-तीन जणांची कोरसमध्ये पृच्छा.तिसरा : अहो...मी पावसाबद्दल बोलतोय! मुंबईत मुसळधार पाऊस पडतो म्हणून सरकारने अधिवेशन नागपुरात घेतले. इथे तर विधानभवनातच पूर. कसलं कामकाज होणार! मी तर म्हणतो असाच पाऊस पडू दे अन् मुख्यमंत्र्यांची ती २०० ची यादी वाहून जाऊ दे...!(तिरकस)

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस