शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

'त्या' कर्मांनी पूजा केली तर गणेश प्रसन्न होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 12:43 AM

मित्र-मैत्रिणींच्या भेटी होतात, वडीलधाऱ्यांचा सहवास लाभतो.

गणेशावरील भक्तिपोटी गर्दी केली, तर पुन्हा लॉकडाऊन माथी बसणार यात शंका नाही. ल़ॉकडाऊन आला की, त्यापाठोपाठ आर्थिक चणचणीची महामारी कोसळणार हे स्पष्ट आहे. म्हणजे गर्दी करण्याच्या मोहातून रोगाबरोबर दारिद्र्याला आपण आमंत्रण देऊ. गणरायाला हे आवडणार नाही.विघ्नहर्ता गणेशाचे आज घरोघरी आगमन झाले असेल. गणेश हा कौतुकाचा देव आहे. तो सार्वजनिक जीवनात आला असला, तरी त्याचे खरे कौतुक चालते ते घराघरांत. गणेशाचे वास्तव्य हा प्रत्येकाच्या घरात चैतन्याचा काळ असतो. मित्र-मैत्रिणींच्या भेटी होतात, वडीलधाऱ्यांचा सहवास लाभतो. धार्मिक श्रद्धेच्या कोंदणात, गणेशाच्या साक्षीने कौटुंबिक आनंदाला वेगळा बहर येतो. दीड, पाच, सात वा दहा दिवसांनंतर गणराय निघतात तेव्हा अनेकांचे डोळे पाणावतात. पुढील वर्षी नक्की येण्याची आण या देवाला घातली जाते. हा एकदंत, वक्रतुंड आणि तुंदील तनूचा, पण तरीही आपलासा वाटणारा. सुग्रास भोजनापासून अन्य अनेक कलाआनंदात रमणारा. पंढरीचा विठ्ठल आणि गणपती हे मराठी माणसाला आपल्या घरचेच वाटतात. त्यांचा धाक वाटत नाही.

गणेश हा विद्येचा दाता, पण तो मास्तरकी करणारा वाटत नाही, तर चौसष्ट कलांचा आनंद घेणारा व देणारा असा रसिक, स्वस्थ-शांत मित्र वाटतो. पुण्याच्या मंडईतील गणेशमूर्ती ज्यांनी पाहिली असेल त्यांना गणपतीच्या अशा रुपाची कल्पना येईल. लोडाला टेकून उजव्या कुशीवर किंचित रेलून सरस्वतीसह प्रसन्न मुद्रेने जगण्याचा आनंद घेणारा मंडईतील गणपती आपल्यालाही प्रसन्नता देऊन जातो. गणेश ओळखला जातो तो विद्येचा दाता म्हणून. तो विघ्नहर्ता आहे कारण तो बुद्धिमान आहे. विघ्ने दूर करायची असतील तर बुद्धी उत्तम, स्वच्छ, सरळ आणि गीतेचा आधार घ्यायचा तर सम असावीलागते. अशी बुद्धी असेल तर कोणत्याही विघ्नाची बाधा त्या माणसाला होत नाही. जग असेपर्यंत विघ्ने येतच राहणार; मात्र त्या विघ्नांना कसे तोंड द्यावे हे माणसाची बुद्धी सांगते. गणपती हा अशा सम-चित्त बुद्धीला प्रेरणा देणारा देव आहे. आज गरज आहे ती गणेशाचे हे रुप मनात ठसविण्याची. जगावर पसरलेले कोविडचे विघ्न दूर करावे म्हणून गणेशाला आळविणे सोपे असले, तरी केवळ भजन-पूजन करण्याने तो प्रसन्न होणार नाही. गणेशावर श्रद्धा ठेवून, आपली बुद्धी चालवून, कोविडचा मुकाबला करावा लागेल. हा मुकाबला धर्मशास्त्राने होणारा नाही. हा मुकाबला वैद्यकशास्त्राने करावा लागेल. साधना करून यश मिळवायचे असेल, तर बंधने पाळावी लागतात हे हिंदू धर्मशास्त्र सांगते. कोविडचा नाश करण्यासाठीही अशी बंधने पाळण्याची अतोनात गरज आहे. वैद्यकशास्त्राने लस निर्माण केली म्हणून कोविड थांबणार नाही. तो सर्वत्र पसरलेला आहे व आपल्या शरीरात शिरण्यासाठी योग्य संधीची वाट पाहात आहे. त्याला रोखणे हे आपल्या हातात आहे. त्यासाठी फक्त संयम आणि बुद्धीची गरज आहे. गणेश उत्सवासाठी आणि नंतर घरच्या गणपतीच्या विसर्जनासाठी गर्दी केली, तर कोविडला आपल्या घरात शिरण्याची संधी आपणच देऊ याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. धर्माज्ञेच्या नावाखाली काही राजकीय पक्ष आणि त्यांचे पंथ-उपपंथ हे बुद्धीभेद करून घरी विसर्जन करणे अयोग्य आहे, असे सांगत सुटले आहेत. हे त्यांचे सांगणे शास्त्रसंमत नाही. धर्मश्रद्धेचा आदर ठेवला, तरी कोविड घशात रुतला की व्हेंटिलेटरवर जाणे चुकत नाही. सुदैवाने अन्य देशांच्या तुलनेत भारतात कोविडचा प्रसार बराच आटोक्यात आहे. संसर्गावर किंचित नियंत्रण आल्याचे अलीकडील आकडेवारी सांगते.
अशावेळी गर्दी टाळून कोविड संसर्गावर पूर्ण नियंत्रण आणण्याची संधी आपल्याला आहे. चौदा विद्या व चौसष्ट कलांचा आस्वाद लॉकडाऊनमध्ये घेता येत नाही. गणेशावरील भक्तिपोटी गर्दी केली, तर पुन्हा लॉकडाऊन माथी बसणार यात शंका नाही. ल़ॉकडाऊन आला की, त्यापाठोपाठ आर्थिक चणचणीची महामारी कोसळणार हे स्पष्ट आहे. म्हणजे गर्दी करण्याच्या मोहातून रोगाबरोबर दारिद्र्याला आपण आमंत्रण देऊ. गणरायाला हे आवडणार नाही. कोविडला घराबाहेर ठेवण्याचा संकल्प करणे हेच आज धर्मशास्त्र संमत आहे. कर्म-कुसुमांनी पूजा केली, तरी ईश्वर प्रसन्न होतो असे ज्ञानदेवांनी सांगितले आहे. मास्क घालणे, स्वस्छता राखणे आणि गर्दी टाळणे ही सध्या अत्यावश्यक कर्मे आहेत आणि त्या कर्मांनी पूजा केली तर गणेश प्रसन्न होईल यात शंका नाही.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव