शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

मुला-मुलींमधील मैत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 4:13 AM

- डॉ. मिन्नू भोसले‘हाय हॉटी, हॅलो हँडसम’ हे संवाद आहेत, आजच्या पिढीचे. एक मित्र आणि दुसरी मैत्रीण यांच्यातले. आपल्या परंपरा, सामाजिक चालीरिती आणि काही अपरिहार्य जीवशास्त्रीय कारणे, यामुळे मुले-मुली एकमेकांचे फक्त चांगले मित्र असू शकतात, यावर अजूनही आपल्या लोकांचा विश्वास बसत नाहीये, पण काळ सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधत असतो. आता मात्र, ...

- डॉ. मिन्नू भोसले‘हाय हॉटी, हॅलो हँडसम’ हे संवाद आहेत, आजच्या पिढीचे. एक मित्र आणि दुसरी मैत्रीण यांच्यातले. आपल्या परंपरा, सामाजिक चालीरिती आणि काही अपरिहार्य जीवशास्त्रीय कारणे, यामुळे मुले-मुली एकमेकांचे फक्त चांगले मित्र असू शकतात, यावर अजूनही आपल्या लोकांचा विश्वास बसत नाहीये, पण काळ सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधत असतो. आता मात्र, मानसिकता वेगाने बदलतेय.मैत्रीचे स्वरूप बदलतेय का?मुला-मुलींमधील मनमोकळे संवाद आता काही नवीन नाहीत. शाळा, कॉलेज, आॅफिसमध्ये होणारी मुला-मुलींची मैत्रीही आता काही नवीन नाही, पण पालकांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र बदललाय. तो नक्की बदललाय का, त्याची अभिव्यक्ती बदललीय हे मात्र अजूनही स्पष्ट झालेले नाही. आमच्या नव्या पिढीला बरेच जण खूप लकी समजतात. कारण आमच्याकडे मैत्री करण्याचे, ती समजून घेण्याचे आणि कदाचित त्यातूनच आपला पार्टनरही निवडू शकण्याचे स्वातंत्र्य आहे.मैत्रीच्या नात्यामुळे नेमके काय बदल दिसून येत आहेत?आज मात्र, नात्यांमध्ये बरेच बदल घडत आहेत. मुला-मुलींना एकत्र येण्याची, एक व्यक्ती म्हणून एकमेकांना ओळखण्याची संधी मिळतेय. त्यांना एकमेकांना पारखून घ्यायला वेळ मिळतोय. अगदी दोन्ही बाबतीत म्हणजे जोडीदार म्हणूनही आणि मित्र म्हणूनही. स्त्री-पुरुष संबंधातली अवघडलेपणाची भावना कुठेतरी मोकळी होऊ पाहतेय. नात्यांच्या बाबतीतही एखादी नवीन गोष्ट करून पाहावी, म्हणून ते उत्सुक आहेत. नात्यांतील स्पेसची संकल्पनाही बºयापैकी रुजू लागलीये.त्यांच्या नात्यात पारदर्शीपणा येतोय का?जेंडर न्यूट्रल होण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून याकडे पाहता येईल. पुरुष आणि स्त्री यातल्या फरकाच्या सीमारेषा हळूहळू मिटत चालल्या आहेत. एक चांगली गोष्ट अशी घडली आहे, ती म्हणजे पालकांकडूनही आज मैत्री एक खरेखुरे नाते म्हणून हळूहळू स्वीकारली जात आहे. यापूर्वी कदाचित मुलगा किंवा मुलगी ऐकत नाही, म्हणून त्याचे आईवडील त्यांच्या मित्राला समजवायला सांगत नव्हतेही, पण आज अनेकदा मुलाला एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच्या मित्रांची मदत आवर्जून घेतली जाते.पालक मुलांना स्वत:ची अशी वेगळी स्पेस देत आहेत. मुलांनी इमोशनली आपल्यावरच अवलंबून असावे, असा हट्ट त्यांनी सोडला आहे. म्हणजे असे म्हणता येईल की, बदल होतायत, पण हळूहळू होतायत. मैत्रीच तर आहे, जी आपल्याला अपोझिट सेक्सचे जजमेंट मांडायला मदत करतेय.

टॅग्स :Mumbaiमुंबई