शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

केजरीवालांचे माफीसत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 03:56 IST

केजरीवालांना अलीकडे काय होतेयं ठाऊक नाही पण, पहाटे-पहाटे अचानक झोपेतून ‘माफी दो, माफी दो म्हणत दचकून उठतात. सकाळी दारावरची बेल वाजली की, स्वत:च धावत जाऊन दार उघडतील आणि समोर जो दिसेल त्याला ‘माफ करा’ म्हणून पुन्हा दार लावून घेतील. सकाळी दूध घालणाऱ्या भैयालाही तोच अनुभव आला.

- दिलीप तिखिलेकेजरीवालांना अलीकडे काय होतेयं ठाऊक नाही पण, पहाटे-पहाटे अचानक झोपेतून ‘माफी दो, माफी दो म्हणत दचकून उठतात. सकाळी दारावरची बेल वाजली की, स्वत:च धावत जाऊन दार उघडतील आणि समोर जो दिसेल त्याला ‘माफ करा’ म्हणून पुन्हा दार लावून घेतील. सकाळी दूध घालणाऱ्या भैयालाही तोच अनुभव आला.भैय्या: साहेब मी तुमचा दूधवाला... अशी माफी का मागतायं?केजरीवाल : माहीत आहे मित्रा...पण मी कधीतरी तुझ्यावर नक्कीच आरोप केले असतील. दुधात पाणी घालतोय म्हणून, किंवा यूपीतून आला तेव्हा तुझ्याकडे एकच म्हैस होती, आता १५ कशा झाल्या? वगैरे, वगैरे. ते काही नाही... मला आता माफी देऊनच टाक.पेपरवाल्याचाही तोच अनुभव. मोलकरीण शांताबाई आली, तिच्यापुढे चक्क लोटांगण घालून स्वारी जेव्हा माफी मागू लागली तेव्हा मात्र सौ. केजरीवालांना राहवले नाही. त्यांनी रागातच विचारले...हे काय चालवलं, काय होतेयं तुम्हाला...? आणि हे कसले वागणे...? कानाचे मफलर कंबरेला कशाला हो बांधले?केजरीवाल : काही नाही गं, गेले काही दिवसांपासून वाकून, वाकून कंबरडे मोडले.. म्हणून बांधले बघ. ...ते काही नाही, मी आता डॉक्टरांनाच बोलावते. केजरीवाल नाही, नाही म्हणत असतानाच सौ.नी फोन लावला. डॉक्टरही हजर झाले.काय होतंय...! डॉक्टरांचा पहिला प्रश्न.केजरीवाल : पहाटे-पहाटे फार भीतीदायक स्वप्नं पडतात. मी कुठल्यातरी तुरुंगात आहे. आतल्या बगिच्यात लालूजी विळा, कुदळ घेऊन माळीकाम करीत आहेत. मी झाडू घेऊन तुरुंगाचा परिसर साफ करीत आहे. दारावरचा चौकीदार अंगावर शाई फेकतो आहे. उठल्यावर ते सर्व आठवलं की काटा येतो अंगावर. ...पण नेमका तुरुंगच कसा दिसतो स्वप्नात? - डॉक्टरांचा सवाल.त्याचे काय डॉक्टरसाहेब...मग सौ.नीच खुलासा केला... हे झाडू घेऊन निघाले संपूर्ण देश साफ करायला. वाटेत येईल त्याला झोडपत बसले. झाले, आले अंगलट. लोकांनी यांच्यावरच खटले भरले. मग स्वप्नात झाडू अन् तुरुंग येणार नाही तर काय!आता कुठे डॉक्टरांना नाडी कळली. म्हणाले, वहिनी.. यांची व्याधी शारीरिक नाही. ती किंचित सायकिक अन् बहुतांशी पोलिटिकल आहे. असं करा, यांना नितीनभाऊंकडे घेऊन जा! ते देतील यांना गुरूमंत्र. नितीनभाऊंचे नाव येताच केजरीवाल केव्हढ्यांदा तरी दचकले...! काय म्हणता...? अहो, त्यांच्यावरच तर मी पहिला झाडू मारला. ऐकतील ते माझं? शेवटी हो नाही करत स्वारी गडकरी वाड्यात दाखल झाली. (दिल्लीतल्या नितीनभाऊंच्या शासकीय निवासालाही आम्ही गडकरी वाडाच म्हणतो.) भाऊ मोठे दिलदार. केजरीवाल काही बोलण्याआधीच ते म्हणाले, ‘जाव..! माफ कर दिया.’केजरीवाल : भाऊ थँक्स...पण कुठे जाऊ , देशभरातल्या सर्व भ्रष्ट नेत्यांची यादी तयार केली होती मी. दोन कपाटे भरली आहेत. २०-२५ हजार तरी असतील. कुणाकुणाकडे जाऊ सांगा?भाऊ : तो मार्क झुकेरबर्ग माहीत आहे ना! २० कोटी भारतीय सदस्य आहेत त्याच्या फेसबुकचे. एका झटक्यात सर्वांची माफी मागून मोकळा झाला पठ्ठा! तू पण, चल.. सुरू हो..जा... केजरीवालांना ते पटले. कंबरेचे मफलर पुन्हा कानावर आले आणि मग सुरू झाले एक अभूतपूर्व माफीपर्व.(तिरकस)

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल