माहितीच्या विस्फोेटात आपण कैदी ‘अटेन्शन इकॉनॉमी’चे!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 04:02 AM2020-02-03T04:02:57+5:302020-02-03T04:07:10+5:30

पर्याय म्हणून जगातील सर्व लोकांनी केव्हाही न थांंंबता डाऊनलोडिंग सुरू ठेवल्यास त्याला किमान ८१ दिवस लागतील.

In the explosion of information you are a prisoner of the 'Attention Economy'! | माहितीच्या विस्फोेटात आपण कैदी ‘अटेन्शन इकॉनॉमी’चे!

माहितीच्या विस्फोेटात आपण कैदी ‘अटेन्शन इकॉनॉमी’चे!

googlenewsNext

- शैलेश माळोदे 

टीव्ही चॅनेल्सवर जोरजोराने कोकलत एखादा शो वा बातमीपत्र सादर करणारे अँकर्स असो वा अगदी मंद प्रकाशात टिमटिमणाऱ्या बारमधील स्टँडअप कॉमेडियन किंवा टिष्ट्वटरवर टिवटिवाट करणारे भक्त/अभक्त अथवा कॅमेरा दिसला की चित्रविचित्र हावभाव करणारे क्रिकेट फॅन्स किंवा गर्दी बघितल्यावर मुद्दाम आकांंडतांंडव करणारे आंदोलनकर्ते. सध्या ही जी सगळी धावपळ उडालेली दिसतेय ना ती तुमचंं-माझंं लक्ष वेधण्यासाठी. ‘गॅदर अ रोजबडस व्हाइल ये मे’ अशी एक इंंग्रजी कविता आहे. तिच्यात सुधारणेचे आधुनिक रूप म्हणजे ‘गॅदर मे आयबॉक्स व्हाइल ये मे.’ थोडक्यात जोपर्यंत तुम्ही लाइमलाइटमध्ये आहात तोपर्यंत प्रेक्षक जमवा.

एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांंत आपण माहिती युगाकडून ज्ञान अर्थव्यवस्थेकडे आणि आता अटेन्शन इकॉनॉमी (लक्ष अर्थव्यवस्था)कडे वाटचाल केली. आज माहिती ही एक कमोडिटी म्हणजे वस्तू बनलीय, तर ज्ञान हे सर्वांकडे असेल असे नाही. ‘एर्गो’ म्हणजे अटेन्शन इकॉनॉमी ही ग्राहक राजा असल्याचा आभास तरी करून देणारी अर्थव्यवस्था बनलीय. माहितीचा विस्फोट झालाय.

‘सिस्को’ या महाकायनेटवर्किंग कंंपनीच्या २००७ मधील अंदाजानुसार माणसाच्या डोळ्यांद्वारे मेंदूला दाखवली जाणारी दृश्य स्वरूपातील माहिती एका वर्षात ६.६ झिटाबाइट्स (एक झिटाबाइट्स म्हणजे १०२१ बाइट्स) इतकी प्रचंड असून ती सुमारे २५० अब्ज डीव्हीडीत सामावेल एवढी आहे. ही सुनामी थांंबणारी नाही. आयडीसी या भविष्याविषयी तंंत्रज्ञानाबाबतचे अंदाज व्यक्त करणाऱ्या कंपनीच्या मते २०२५ मध्ये जगातील डेटा सुमारे १७५ झिटाबाइट्स इतका प्रचंड असेल. म्हणजे २०२५ सालची एकूण ग्लोबल डेटास्फीयर अमेरिकेच्या सरासरी ब्रॉडबॅण्ड स्पीडने म्हणजे २५ एमबी/सेकंंड गतीने डाऊनलोड करण्यासाठी (सध्याच्या गतीने) एखाद्या व्यक्तीस १.८ अब्ज वर्ष लागतील.

पर्याय म्हणून जगातील सर्व लोकांनी केव्हाही न थांंबता डाऊनलोडिंग सुरू ठेवल्यास त्याला किमान ८१ दिवस लागतील. संपूर्ण अटेन्शन मार्केट किंंवा लक्ष वेधून घेणारी बाजारपेठ अस्तित्वात आली असून विविध कंपन्या स्वत:चे यश त्यांंनी मिळविलेल्या नफ्यावरून नव्हे तर किती भुवया उंंचावल्यात यावरून ठरते. म्हणूनच आज टेस्ला या कंपनीने कोणताही आर्थिक नफा न मिळवता ८९ अब्ज डॉलर्स भांडवली मूल्य प्राप्त केलेय. हा आकडा जनरल मोटर्स आणि फोर्ड या दोन मोठ्या वाहन कंपन्यांंच्या एकूण बाजारमूल्यांपेक्षा मोठा आहे.

या आकड्यांंत कोणतेही लॉजिक नाही हे मानल्यास क्षणभर विचार करा की माध्यमांंतून वा अगदी ऑफलाइन चर्चेतून टेस्ला, उबर वा वी वर्क्स या नावाची चर्चा कितीदा होते. अगदी वाईट प्रसिद्धी लाभली तरी या कंंपन्यांंकडे लक्ष असणाऱ्यांची संंख्या वाढते. कारण ऑनलाइन प्रसिद्धीसाठी ती अधिक उपयुक्त ठरते. कारण आक्रोश किंवा गु्रपवरील धमक्या हे त्यांचे खरे खाद्य असते. त्यानंंतर अल्गॉरिदम्सचं काम सुरू होतं. या अभियांत्रिकी भावनाच म्हणायला हव्यात. त्यामुळे लोकांना कोणती तरी बाजू घ्यावी लागते. या नव्या युगातील ताकद ही ज्ञान नसून लक्ष वेधणंं (अटेन्शन) ही आहे. जर तुम्हाला टिष्ट्वटर वा फेसबुकवर वा इन्स्टाग्रामवर एक दशलक्ष फॉलोअर्स लाभल्यास तुम्ही काहीही खुळचट बाब पुढे आणू शकता. अगदी अमेरिकन राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे.

यशाच्या मूल्यांकनाची पद्धत संपूर्णपणे ढवळून निघाली आहे. स्टार्टममध्ये प्रगतीचे मोजमाप करण्यासाठी जे पॅरामीटर्स वापरले जातात त्यात ‘बर्न रेट’, ‘अ‍ॅक्टिव्हेशन रेट’, अ‍ॅक्टिव्ह युजर्स आणि ‘कस्टमर चर्न रेट’ यासारख्या नव्या मेट्रिक्सची, मानकांची चलती आहे. मीडिया रिसर्च नावाच्या माध्यमांचे विश्लेषण करणाऱ्या फर्मच्या म्हणण्यानुसार आपण लक्ष वेधण्याच्या शिखरावर आहोत. (पिक अटेन्शन) लवकरच त्यातही सॅच्युरेशनची स्थिती निर्माण होईल. अशा वेळी एकीकडे वाढलेला नवीन उपभाग मिनिट (न्यू कझम्शन मिनिट) दुसºया उपभोग वेळेतील असेल. मोबाइल गेम्समधील ड्रॉप ऑफ हेच दर्शवितो. आपण सध्या तरी त्यापासून दूर आहोत.

धोक्याच्या स्थितीबाबत घंटानादाचा अभाव हा खरा प्रश्न आहे. आपण कंपन्यांना जी आपली वैयक्तिक माहिती देतो आणि वापरण्याची मोकळीक देतो त्याबाबतचे नियम आणि नियमन करणारे अजूनही आपल्या देशात तयार नाही. लक्ष वेधणारे आणि चतुर मार्केटर आपण सामाजिक माध्यमांवर वेळ घालवून उत्तेजित होण्याच्या स्थितीचा फायदा उचलताना दिसताहेत. त्याद्वारे आपल्या मेंंदूची विश्लेषण क्षमताही बदलत आहे. असे असताना ग्राहकांंना ‘नागरिक’ ठेवण्यासाठी ‘अटेन्शन इकॉनॉमी’त काही फायदे गरजेचे आहेत.

Web Title: In the explosion of information you are a prisoner of the 'Attention Economy'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.