निवडणुकीतील ‘माल’ प्रॅक्टिस

By Admin | Updated: October 27, 2014 00:28 IST2014-10-27T00:23:01+5:302014-10-27T00:28:41+5:30

निवडणुकीत पैसे वाटले म्हणून पुढाऱ्याच्या मागे पोलिसांचा भुंगा लागला व पुढाऱ्यावर कायदेशीर कारवाई झाली, असे कधी कोेठे घडले आहे का?

Election 'Goods' Practice | निवडणुकीतील ‘माल’ प्रॅक्टिस

निवडणुकीतील ‘माल’ प्रॅक्टिस

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांत दिवाळी खरेदी म्हणून जिल्ह्यात तब्बल वीस कोटी रुपयांहून अधिकची उलाढाल केवळ मोबाईल विक्रीतून झाल्याचा अंदाज मोबाईल विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे.
नवीन स्मार्ट फोन बाजारात आल्यानंतर जसाच्या तसाच फोन आपल्यालाही हवा या हव्यासापोटी तरुणाई तत्काळ नवीन फोन खरेदी करत आहेत. व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक, पिक्चर यामुळे स्मार्ट फोनची मागणी वाढली आहे. या खरेदीमुळे बाजारात कंपन्याही १५ ते २० दिवसांच्या अंतराने नवीन मॉडेल बाजारात लाँच करत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस स्मार्ट फोनचा युजर वाढला आहे. त्यामुळे जितके नवीन मोबाईलचे मॉडेल, तितकेच मागणीही तेवढीच असा अनुभवही खुद्द विके्रत्यांनाही येऊ लागला आहे. मोबाईल फोन केवळ संवादाचे साधन न राहता संदेश पाठविणे, पिक्चर पाठवणे, तत्काळ फोटो काढून पाठवणे आणि त्याचे रिसिव्हिंग तत्काळ समोरच्या फोनधारकास होत असल्याने स्मार्ट फोनचा वापर वाढला आहे.
गेल्या दोन दिवसांत सॅमसंग, इंटेक्स, लिनोव्हा, सोनी, नोकिया कंपन्यांच्या अ‍ॅँड्राईड मोबाईल फोनला मागणी अधिक आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत या कंपन्यांच्या अँड्राईड मोबाईल्सच्या विक्रीमध्ये सरासरी ७५ टक्क्यांची वाढ झाली आहे. नोकिया, सॅमसंग, सोनी, इंटेक्स, लिनोव्हा, जिओनी, मॅक्स या कंपन्यांच्या अँड्राईड मोबाईल फोनलाही चांगली मागणी आहे. सोनीचे अँड्राईड मोबाईल्स १० ते ५० हजार, इंटेक्स साडेतीन हजार ते २० हजार, सॅमसंग ६ ते ४० हजार, जिओनी ६ ते २५ हजारांमध्ये विकले गेले आहेत. विशेष म्हणजे शहरात किमान २५ ते ३० मोबाईल दुकाने आहेत. किरकोळ मोबाईल विक्री करणाऱ्या दुकानांची संख्या शंभरच्या वर आहे. त्यामुळे दिवाळी वीस कोटी रुपयांपेक्षा अधिक मोबाईलची खरेदी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सर्वसाधारण लोकांची स्मार्ट फोन्सची पसंती बदलली आहे. बेसिक अ‍ॅप्लिकेशन्सच्या तुलनेत अँड्रॉईड अप्लिकेशन असलेल्या मोबाईल फोनला अधिक मागणी आहे. या फोनचा वर्गही अगदी शालेय विद्यार्थी असल्याने यंदा दिवाळीच्या पाडव्यानिमित्त कोल्हापूरच्या मोबाईल बाजारातही मोठी उलाढाल झाली आहे.
- संदीप नष्टे मोबाईल फोन विक्रेते, कोल्हापूर

Web Title: Election 'Goods' Practice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.