शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

'त्या' नेत्यांच्या विखारी प्रचारास निवडणूक आयोगानं घातला लगाम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 5:28 AM

ज्या धोरणांचा स्वीकार राज्यघटनेने तत्त्वज्ञान म्हणून केला आहे, त्याला मानणाऱ्या मायावती आणि न मानणारे योगी आदित्यनाथ यांना जातीय विखारी प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी संपूर्ण निवडणुकीसाठीच प्रचारबंदी करायला हवी.

ज्या धोरणांचा स्वीकार राज्यघटनेने तत्त्वज्ञान म्हणून केला आहे, त्याला मानणाऱ्या मायावती आणि न मानणारे योगी आदित्यनाथ यांना जातीय विखारी प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी संपूर्ण निवडणुकीसाठीच प्रचारबंदी करायला हवी.सतराव्या लोकसभेची निवडणूक अटीतटीची होणार आहे. त्यासाठी प्रचाराची जोरदार मोहीम चालू असताना, काही नेते प्रचाराची पातळी सोडून भारतीय राज्यघटनेला अपेक्षित समाजवास्तवाला तडा जाईल, अशी वक्तव्ये करीत आहेत. त्यांना निवडणूक आयोगाने प्रचारास बंदी घालून लगाम लावला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांना अनुक्रमे तीन आणि दोन दिवस प्रचारास बंदी घातली आहे. निवडणुकीची आचारसंहिता पाळण्याची सक्ती असताना, तिला पायदळी तुडविण्याच्या घटना अनेक वेळा घडत होत्या. त्यावर निवडणूक आयोग कारवाईची प्रक्रिया करीत होते. मात्र एखाद्या स्टार प्रचारकास प्रचारासच बंदी घालण्याचे पाऊल कधी उचलले नव्हते. उत्तर प्रदेशसारख्या सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळणाºया व्यक्तीच्या तोंडची भाषा ही समाजद्रोहाचीच आहे. मेरठमध्ये एका सभेत बोलताना त्यांनी मुस्लीम समाजाचा उल्लेख ‘हिरवा विषाणू’ असा केला होता. अलीला नव्हे, तर बजरंग बलीला मतदान करण्याचेही आवाहन केले होते.

भारतीय राज्यघटनेनुसार निवडणूक आचारसंहितेच्या विरोधात ही वक्तव्ये आहेत. समाजाची एकात्मता राहावी, ती राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, अशा वरिष्ठ पदावर बसलेल्या व्यक्तीने अशी भूमिका मांडावी, हा समाजद्रोह आहे. ते केवळ आपल्या धर्माचे बांधव नाहीत, म्हणून त्यांना विषाणू म्हणणे हा किती विखारी प्रचार आहे! वास्तविक अशा व्यक्तीला मुख्यमंत्रीपदावर राहण्याचाही अधिकार नाही. मायावती यांनी सहारनपूरमध्ये बोलताना, मुस्लीम समाजाच्या मतदारांनी मुस्लीम उमेदवारासच मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यांचे हे आवाहन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणवून घेणाºयासही शोभत नाही. वंचित, उपेक्षित, दलित-पददलितांच्या उन्नतीचे राजकारण करणे आणि केवळ सत्तेवर येण्यासाठी ठरावीक धर्माच्या मतदारांनी एका ठरावीक धर्माच्या उमेदवारासच मतदान करा, असे आवाहन करणे, हे समाजद्रोहाचे आहे. खरे तर या दोघांनाही निवडणूक आयोगाने केवळ दोन-तीन दिवसांसाठी प्रचारावर बंदी न घालता, या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेपासूनच बाहेर काढायला हवे होते. ही बंदी काही दिवसांसाठी असली तरी, तिचे स्वागत करायला हवे.

जाती-धर्माच्या आधारे मते मागण्याचे, सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या आडून हिंदुत्वाच्या किंवा धर्मनिरपेक्षतेच्या नावावर मते मागण्याचे राजकारण हे घातक आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाच्या विकासाचे मॉडेल काय असू शकेल, याची चर्चा करणे आवश्यक आहे. ज्या धोरणांचा स्वीकार भारतीय राज्यघटनेने एक तत्त्वज्ञान म्हणून केला आहे, त्याला मानणाºया बहुजनवादी मायावती आणि न मानणारे योगी आदित्यनाथ यांची भाषा एकसुरीच आहे. जातीय विखारी प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी, या दोघांना संपूर्ण निवडणुकीसाठीच बंदी करायला हवी. समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी अभिनेत्री जयाप्रदा यांच्यावर टीका करताना असभ्य भाषेचा वापर केला होता. ही विरोधी पक्षांच्या उमेदवारावरील टीका नव्हती, तर लिंगभेदावर आधारित स्त्रीत्वाचा अपमानही करणारी होती. समाजवादी जनआंदोलनाचे जनक डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या विचाराचे पाईक म्हणून मिरविणाºया समाजवादी पक्षाने अशा वाचाळवीराला घरी बसविले पाहिजे. आझम खान यांनी घमेंडखोरीची भाषा पहिल्यांदाच केलेली नाही. त्यांनी अनेक वेळा समाजशांततेला तडा जाईल, अशी वक्तव्ये केली आहेत. त्यांच्यावरही बंदी घालणे आवश्यक आहे. देशाचे प्रमुख नरेंद्र मोदी यांची भाषा विद्वेषाची आहे. काश्मीर किंवा राष्ट्रवादाच्या आडून त्यांनीही समाजाच्या धार्मिक ध्रुवीकरणाची भूमिकाच घेतली आहे. ज्यांच्यावर देश चालविण्याची जबाबदारी मतदारांनी टाकली होती, त्यांची ही भाषा असेल तर भारतीय लोकशाहीचे संरक्षण कोण करणार? यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशाचे स्वागत करून समाजहितासाठी बळ दिले पाहिजे. या बंदीला आव्हान देणारी मायावती यांची याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूक आयोगाच्या या कारवाईची प्रशंसा केली आहे. विखारी प्रचार करणाऱ्यांना हा आणखी एक ‘सर्वोच्च’ दणका आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019mayawatiमायावतीyogi adityanathयोगी आदित्यनाथ