डॉ. एस. एस. मंठासध्या देशावर राज्य करणारा सत्तारूढ पक्ष प्रत्यक्षात ‘वन मॅन आर्मी’ आहे का? सध्या तरी तसेच दिसून येते आहे. त्यांच्या एकाच नेत्याच्या डोळे दीपवून टाकणाऱ्या प्रकाशात अन्य सारे नेते झाकोळले गेले आहेत. वास्तवात लोकशाहीचा आभास दिसत असला, तरी प्रत्यक्षात अध्यक्षीय राजवट देशाचा ताबा घेत असून, सांसदीय लोकशाही पाठीमागे पडते की काय, असे वाटू लागले आहे. आपल्या देशातील संगीत, टेलीव्हिजन, चित्रपट, मीडिया आणि किरकोळ विक्रीच्या बाजारपेठा ज्या पद्धतीने उद्ध्वस्त झाल्या आहेत, त्याचप्रकारे आपला देश राजकीय भूकंपाने ग्रस्त असल्याचे दिसत आहे, ते पाहता केवळ तंत्रज्ञानच नव्हे, तर इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातही नवे कलाकार पदार्पण करताना दिसत आहेत आणि कुणाच्या लक्षात जरी येत नसले, तरी ते सगळे वरच्या पातळीवर असलेल्या शिल्पकाराकडून नव्या विचारांच्या प्रभावाखाली आलेले आहेत. लोकांचा इगो नष्ट करण्याचे काम सुरू असून, सत्तेचे केंद्र उत्तरेकडे सरकत असताना, ते केंद्र अजेय असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या बदलाच्या झंझावातामुळे सामान्य माणसे बाजूला फेकली गेली आहेत.
त्यामुळे परिस्थितीचे लगाम हे सतत त्यांच्याच हातात दिसले. त्यांच्या विरोधकांना त्यांच्याशी स्पर्धा करताना अधिक स्मार्टपणा दाखविण्याची गरज आहे, अन्यथा त्यांची गणना ‘दे आल्सो रॅन’ या गटात होण्याची शक्यताच अधिक आहे. विरोधकांकडून बोलला जाणारा शब्द हा त्यांच्या स्पर्धकावर मात करणारा असण्यासाठी विरोधकांना आपल्या धोरणातच बदल घडवून आणावा लागेल. आपल्या लोकशाहीचे यश पंथनिष्ठा वाढविणाऱ्या नेत्यांचा प्रभाव कमी करण्यातच सामाविलेले आहे. या नेत्याने आपल्या कार्यकर्त्यांना ‘जगा, काम करा, विकास करा, संघर्ष करा आणि एकजूट दाखवीत विजयी व्हा’ हा मंत्र दिला आहे, पण ही एकजूट कशी निर्माण होईल? अन्य पक्षांचा द्वेष करीत असताना, त्याचे रूपांतर पक्षाच्या नेत्यांचा द्वेष करण्यात होऊ शकते. राष्ट्रभक्तीच्या भावनेने झपाटलेल्या नेत्यांचे अनुयायी स्वत:ची युक्तिवाद करण्याची क्षमता गमावून बसण्याची शक्यता अधिक असते. त्यांना मग त्या एका नेत्यातच संपूर्ण राष्ट्राचे दर्शन घडू लागते. त्या नेत्याला सत्तेत राहण्यासाठी सतत लोकप्रियता संपादन करावी लागते, तेव्हा कुठे पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा सत्तेत येण्याची संधी त्यांना मिळू शकते. अलंकारिक भाषेने वाहून जाण्याइतकी भारताची लोकशाही लेचीपीची तर नाहीच, पण देशभक्तीच्या भुलाव्याला तोंड देण्यासाठी ती बलाढ्यसुद्धा आहे, पण या सर्वांना अपयश आले, तरी अंतिमत: जनशक्तीचाच विजय होईल!
(लेखक बंगळुरू येथील एनआयएएस माजी चेअरमन, प्रोफेसर आहेत)