शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

चित्रपट महोत्सवास पेलवेना रसिकांचा प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 17:52 IST

गोव्यात चालू असलेला ४९वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव चित्ररसिकांची विलक्षण गर्दी खेचतो आहे. एरवी गोव्याच चित्रपटांएवजी चित्रपटबाह्य दर्शनासाठीच गर्दी लोटत असल्याचा अनुभव यायचा. मात्र यंदाचे वर्ष त्याला अपवाद ठरले आहे.

राजू नायक पणजी - गोव्यात चालू असलेला ४९वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव चित्ररसिकांची विलक्षण गर्दी खेचतो आहे. एरवी गोव्यामध्ये चित्रपटांऐवजी चित्रपटबाह्य दर्शनासाठीच गर्दी लोटत असल्याचा अनुभव यायचा. मात्र यंदाचे वर्ष त्याला अपवाद ठरले आहे. अनेक राज्यातून विशेषत: दक्षिणेकडील राज्यातून जाणकार चित्ररसिक महोत्सवासाठी आले असून चित्रपट पाहण्याबरोबरच ते चर्चेतही भाग घेताना दिसतात. मात्र या वाढत्या गर्दीला सामावून घेण्यास इफ्फीची आयोजन क्षमता अपुरी पडते आहे. चित्रपटगृह भरल्याच्या सबबीखाली अनेक रसिकांना परत पाठवले जात असून काही वेळा तर यातून प्रतिनिधी आणि आयोजकांमध्ये संघर्षही झाला व पोलिसांना पाचारण करावे लागले.

एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या प्रतिनिधींना सामावून कसे घ्यायचे हा यक्षप्रश्न आयोजक गोवा मनोरंजन संस्था आणि चित्रपट महोत्सव संचालनालयाला सतावतो आहे. गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यानी सांगितले की यावर्षी तबब्ल ६००० प्रतिनिधींनी नावनोंदणी केलेली आहे. मात्र महोत्सवासाठी पणजीत सात चित्रपटगृह उपलब्ध झाले असून त्यांची सामायिक आसनक्षमता २३०० आहे. साहजिकच दर शोच्या वेळी १०० ते २०० प्रतिनिधांनी विन्मुख परतावे लागते.

राजेंद्र तालक म्हणाले की दोना पावला येथे इफ्फी संकुल होऊ घातले असले तरी कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. अगदी आत्तापासून सुरुवात केली तरी संकुल पुर्णत्वास येण्यास किमान दोन वर्षे लागतील. पण विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या पार्श्वभूमीवर या संकुलासाठी आवश्यक असलेल्या राजकीय इच्छाशक्तीचा अभाव जाणवतो. शहरात खासगी क्षेत्राच्या गुंतवणुकीतून चित्रपटगृहे उभारायची ठरवली तरीही येत्या महोत्सवात ती उपलब्ध होणार नाहीत. शिवाय मल्टीप्लेक्सची आसनक्षमता मर्यादीत असते. इफ्फीला मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे पर्याय अपुरेच ठरतात.

चित्रपटांविषयी सजगता वाढत चालल्याचे समाधान असले तरी वाढत्या संख्येने महोत्सवासाठी येणाऱ्यांना कसे सामावून घ्यायचे यावर गोवा मनोरंजन संस्था आणि चित्रपट महोत्सव संचालनालयात खल सुरू झाला आहे.

टॅग्स :IFFIइफ्फीgoaगोवा