शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

एकलहरा ग्रामपंचायतीचे पुरोगामित्व!

By किरण अग्रवाल | Published: January 31, 2019 8:12 AM

समाज स्वत:हून बदलत नसतो, त्याकरिता समाजधुरिणांना पुढाकार घ्यावा लागतो. हे धुरीणत्व अनेक व्यासपीठ अगर माध्यमातून पुढे येत असते.

किरण अग्रवाल

समाज स्वत:हून बदलत नसतो, त्याकरिता समाजधुरिणांना पुढाकार घ्यावा लागतो. हे धुरीणत्व अनेक व्यासपीठ अगर माध्यमातून पुढे येत असते. विशेषत: स्थानिक स्वराज्य संस्थांचे नेतृत्व वा प्रतिनिधित्व करणाऱ्यांकडे यासंदर्भात मोठ्या आशेने पाहिले जाते; परंतु अलीकडच्या काळात त्यांच्यातील वाढते राजकारण आणि त्याअनुषंगाने बदललेल्या त्यांच्या कामकाजाच्या प्राथमिकता पाहता समाजातील नाजुक-भावनिक प्रश्नांकडे मात्र लक्ष दिले जात नसल्याचेच आढळून येते. ते आपले काम नाही, अशीच नेतृत्वकर्त्यांची मानसिकता असते. त्यामुळे अशाही स्थितीत वैधव्य नशिबी आलेल्या गावातील भगिनींना पुनर्विवाहासाठी आर्थिक स्वरूपाची मदत करण्याचा एकलहरे ग्रामपंचायतीचा ठराव खऱ्याअर्थाने पुरोगामी राज्याची ओळख अधोरेखित करणाराच म्हणायला हवा.विवाहविषयक समस्या आज प्रत्येकच समाजात चिंतेची बाब ठरली आहे. पूर्वी हुंड्याचा विषय यात अग्रक्रमाने येई. आता हा मुद्दा तितकासा प्रभावी राहिला नसला तरी काळानुरूप अन्य विषय पुढे आले आहेत. उच्च विद्याविभूषित होताना गाठली जाणारी वयोमर्यादा, त्यात मुला-मुलींची अनुरूप पसंती असे प्रश्न तर आहेतच; परंतु शहरातीलच काय, गावातील मुलीदेखील गावातली स्थळे नाकारताना दिसत आहेत. गावाकडे प्रापर्टी असो अगर नसो, मुलगा शहरात नोकरी-व्यवसाय करणारा हवा असाच बहुतेकांचा कल असतो. यातही एकत्रित कुटुंब पद्धतीऐवजी विभक्तपणे राहणाऱ्यांना अधिक पसंती लाभते. अशा या एकूणच परिस्थितीत दुर्दैवाने कसल्या का कारणातून होईना, एखाद्या भगिनीच्या वाट्याला वैधव्य आले तर एकटेपणाचे तिचे जिणे असह्य ठरल्याखेरीज राहात नाही. कौटुंबिक पातळीवरील उपेक्षा वा दुर्लक्षाला तर तिला समोरे जावे लागतेच; परंतु सामाजिकदृष्ट्या गैरफायदा घेऊ पाहणाऱ्यांच्या नजराही तिला टोचल्याखेरीज राहात नाही. या पार्श्वभूमीवर गावाचे नेतृत्व करणाऱ्या एखाद्या ग्रामपंचायतीने रस्ते, गटारी व दिवाबत्ती आदी कामांच्या पारंपरिक चौकटीपलीकडे पाऊल टाकून विधवांसाठी आर्थिक मदतीचा विचार करावा, हे कौतुकास्पद व इतरांसाठी अनुकरणीयच आहे.नाशिक जिल्ह्यातील एकलहरे ग्रामपंचायतीने प्रजासत्ताकदिनी झालेल्या ग्रामसभेत एक ठराव करून, पुनर्विवाह करू इच्छिणाऱ्या विधवांना विवाहाकरिता ग्रामपंचायतीकडून २५ हजारांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण पुरोगामी राज्याची ओळख सांगतो, विधवांचे पुनर्विवाह घडवून आणून त्यांना पुन्हा सन्मानाने जगण्याचा अधिकार प्राप्त करून देण्यासाठी झटलेल्या राजा राममोहन रॉय, छत्रपती शाहू महाराज व महात्मा जोतिबा फुले यांच्यासारख्या समाजधुरिणांचा वारसा सांगतो; पण त्यांचे विचार खरेच अमलात आणतो का, हा प्रश्नच असताना एकलहरा ग्रामपंचायतीने मात्र सामाजिक जाणीव व कर्तव्यभावनेतून ऐतिहासिक ठरावा असा ठराव केला आहे. अर्थात, या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मोहिनी जाधव या महिला सरपंच असल्याने व महिलेचे दु:ख अगर वेदना महिलेशिवाय कुणाला अधिक कळणार, या न्यायाने त्यांनी या विषयाकडे लक्ष पुरविले असावे; पण त्यांच्या या विचाराला सर्व सहकारी ग्रामपंचायत सदस्यांनी व गावकऱ्यांनीही एकमुखी पाठिंबा दिल्याचे पाहता एका छोट्या गावातून पुरोगामित्वाची मशाल पेटून गेल्याचे म्हणता यावे.पंचायतराज व्यवस्थेत गावकारभारी सक्षम होणे अपेक्षित आहेच; परंतु विकासाचा गावगाडा हाकताना सामाजिक जाणिवेचे कर्तव्यभान बाळगले गेले तर अबोल ठरणाऱ्या वेदनेवर फुंकर घालण्याचे काम कसे घडून येऊ शकते याचा प्रत्ययच यानिमित्ताने एकलहरेवासीयांनी आणून दिला आहे. महिला व बालकल्याणाच्या योजना आखताना किंवा त्यासाठीचे प्रस्ताव देताना चौकटी ओलांडून असे मूलभूत मानसिक परिवर्तनाचे विचार केले गेले तर त्याद्वारे काळ्या पाटीवर पांढरी फुले रेखाटली गेलेली दिसून येतील. मागे नाशिक जिल्ह्यातीलच येवला तालुक्यात गावातील घराघरांवर मुलींच्या नावाच्या पाट्या लावण्यात आल्या होत्या. त्यातून मुला-मुलींमध्ये भेद न करता लिंग समानतेचा संदेश दिला गेला. त्यानंतर आता एकलहरे ग्रामपंचायतीने विधवांच्या पुनर्विवाहासाठी आर्थिक मदतीचा ठराव करून त्यापुढचे पाऊल टाकले आहे. आजच्या कौटुंबिक व सामाजिक विसंवादी तसेच विभक्त व्यवस्थेत गावक-यांचे, समाजाचे अशा रितीने मानसिक उन्नयन घडवून आणणाऱ्या या सर्व संबंधितांचे म्हणूनच कौतुक करावे तितके कमी आहे.

टॅग्स :Nashikनाशिक