शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
3
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
4
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
5
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
6
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
7
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
8
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
9
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
10
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
11
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
12
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
13
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
14
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
15
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
16
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
17
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
18
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
19
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
20
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?

संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 07:24 IST

माणिकराव कोकाटे आणि वादाचे नाते नवे नाही. मंत्रिपद मिळाल्यापासून ते बेधडक व वादग्रस्त बोलत आले आहेत.

महाराष्ट्रभर सध्या दोन प्रश्न भलतेच चर्चेत आहेत. पहिला- विधानसभेचे कामकाज सुरू असताना कृषिमंत्रीमाणिकराव कोकाटे हे मोबाइलवर जंगली रमी खेळत होते, की पत्त्यांचाच साॅलिटेयर गेम? आणि दुसरा- शेतकरी आत्महत्यांच्या रूपाने शेती व्यवसायाचा कडेलोट होत असताना कृषिमंत्र्यांनी अशी असंवेदनशीलता दाखवूनही त्यांचे मंत्रिपद शाबूत राहील का? महाविकास आघाडीच्या खासदारांनी हा मुद्दा थेट दिल्लीत नेला आहे. असंवेदनशील कृषिमंत्रीमहाराष्ट्राला नको असे साकडे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चाैहान यांना घातले आहे. पण, या प्रश्नांची उत्तरे चाैहान यांच्याकडे नाहीतच.महाराष्ट्रात तीन पक्षांचे महायुती सरकार सत्तेवर असल्याने माणिकरावांना धनंजय मुंडे यांच्या मार्गाने जावे लागेल का, याचे उत्तर नैतिकतेवर नव्हे तर राजकीय समीकरणांवर अवलंबून असेल. माणिकराव कोकाटे आणि वादाचे नाते नवे नाही. मंत्रिपद मिळाल्यापासून ते बेधडक व वादग्रस्त बोलत आले आहेत. महायुती सरकारला, कोकाटे यांच्या मंत्रिपदाला जेमतेम आठ महिने होताहेत आणि जवळपास दर महिन्याला एक वाद असा माणिकरावांचा स्कोअर आहे. खोटी कागदपत्रे देऊन सदनिका मिळविल्याच्या तीस वर्षे जुन्या प्रकरणात नाशिकच्या न्यायालयाने त्यांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. त्यामुळे आमदारकी अडचणीत आली. पण, वरच्या न्यायालयाने दोषसिद्धीला स्थगिती दिल्याने गोळी कानाजवळून गेली.भ्रष्टाचाराचे कुरण ठरलेली एक रुपयात विमा योजना सरकारने गुंडाळली तेव्हा भ्रष्टाचाराचा मुद्दा लपविताना कृषिमंत्री म्हणाले, ‘आजकाल भिकारीदेखील १ रुपया घेत नाही; परंतु आम्ही शेतकऱ्यांना १ रुपयात विमा देतो..!’ साहजिकच विरोधक त्यांच्यावर तुटून पडले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना त्यांनी केवळ उभ्या पिकाचेच पंचनामे होतील असे ठणकावून सांगितले आणि ‘पीक निघाल्यानंतर काय ढेकळाचे पंचनामे करायचे का?’ असा सवाल विचारला. कर्जमाफीचा मुद्दा निघाला तर ते शेतकऱ्यांना उद्देशून म्हणाले, ‘कर्जाचे पैसे तुम्ही शेतीत गुंतवता का? तुम्ही कर्जे घेता, ती फेडत नाही. त्या पैशांतून साखरपुडे करता, लग्न समारंभावर खर्च करता आणि नंतर कर्जमाफी मागता’. हे विधानही त्यांना भोवले. दिलगिरी व्यक्त करावी लागली.कांद्याच्या घसरलेल्या दरासाठीही त्यांनी शेतकऱ्यांनाच जबाबदार ठरवले. ‘एखाद्या शेतकऱ्याच्या कांद्याला चांगला भाव मिळाला की सगळे कांदा लावत सुटतात. प्रत्येकानेच कांदा लावला तर भाव पडणारच’, या त्यांच्या वक्तव्यात तसे पाहता कांदाच काय, पण कोणत्याही पिकाच्या बाजारपेठेचे वास्तव होते खरे. तथापि, मंत्रिपदावर बसलेल्या माणसाने इतके परखड बोलायचे नसते हे भान त्यांना राहिले नाही. नंतर एका समारंभात बोलताना माणिकरावांनी त्यांच्याकडील कृषिमंत्रिपदाची तुलना ओसाड गावच्या पाटीलकीशी  केली. ते म्हणाले, ‘कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच आहे आणि मला हे खाते दिले आहे.’माणिकराव कोकाटे शेती खात्याला ओसाड गावची पाटीलकी म्हणत असले तरी प्रत्यक्षात शेती, शिक्षण, आरोग्य या खात्यांची मंत्रिपदे म्हणजे काटेरी मुकुट असतो. या खात्यांचा एकूण कारभारच इतका गुंतागुंतीचा आणि झालेच तर खालपासून वरपर्यंत चिरीमिरीचा आहे की, आतापर्यंत मोजकेच मंत्री ही खाती सांभाळूनही निष्कलंक राहू शकले आहेत. त्यातही शेती हा व्यवसाय मुळात प्रचंड तोट्याचा. त्याला लोकसंस्कृतीपासून ते जागतिक व्यापारापर्यंत असंख्य संदर्भ. त्याविषयी अधिकारवाणीने बोलणारेही खूप. ही बोलणारी मंडळी तज्ज्ञ वगैरेही असतात. गरिबाला, संकटात सापडलेल्या माणसाला सल्ले देणारे खूप असतात. म्हणूनच, शेतकऱ्याला सल्ले देणारे जसे पैशाला पायलीभर तसेच मंत्र्यालाही सल्ले देणारे खूप. त्यांनी ऐकले तर ठीक. अन्यथा... बरेच बरे. शेतकरी जसा चोहोबाजूंनी संकटांनी घेरलेला, तसाच या खात्याचा मंत्रीही संकटांच्या कोंढाळ्यात असतो.अशावेळी शांतपणे आपल्या खात्याचे काम पाहणे, आवश्यक असेल तेवढेच कमीतकमी बोलणे आणि महत्त्वाचे म्हणजे या खात्याचा केंद्रबिंदू जो शेतकरी त्याच्याबद्दल सहानुभूती, कळवळा, संवेदनशीलता बाळगणे, हे भान कृषिमंत्र्यांनी बाळगायलाच हवे. माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदाच्या पहिल्या दिवसापासून हे उमजलेले नाही. तेव्हा, मोबाइलवरील गेमच्या वादात बरोबर कोण, चुकीचे कोण, कृषिमंत्री की विरोधक? हे महत्त्वाचे नाही. त्यापेक्षा फटकळ, परखड बोलण्याच्या नादात शेतकऱ्यांच्या मंत्र्यांमध्ये संवेदनशीलता नाही, हे अधिक महत्त्वाचे. 

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेMaharashtraमहाराष्ट्रministerमंत्री