शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
5
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
6
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
7
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
8
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
9
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
10
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
13
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
14
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
15
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
16
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
17
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
18
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
19
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

संपादकीय : राज ठाकरेंचा ‘टीआरपी’, मुलाखतीने व्यापून गेले अवघे चर्चाविश्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 05:53 IST

अमोल कोल्हे यांनी राज यांच्यासमोर प्रश्नांचा दांडपट्टा सळसळ करीत फिरवला आणि अमृता फडणवीस यांनी राज यांना थेट त्यांच्या ‘डॉन’ इमेजबद्दल छेडले.

लोकशाहीत लोकप्रतिनिधींचे संख्याबळ हाच जर नेत्याचा करिष्मा मोजण्याचा एकमेव निकष असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यात डावे ठरतील. संख्याबळात त्यांच्यापेक्षा काही पक्ष पुढे असतीलही, मात्र त्या पक्षाचे नेते करिष्मा दाखवण्यात अगदीच किरकोळ ठरतात. राज हे केवळ राजकारणी नाहीत. ते व्यंगचित्रकार आहेत. दिमाखदार सोहळे आयोजित करण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. श्रोत्यांना खिळवून ठेवणारी वाणी व हजरजबाबीपणाचे वरदान त्यांना लाभले आहे. राज यांची शैली खिळवून ठेवणारी असल्याने सध्याच्या डिजिटल युगात त्यांना खणखणीत टीआरपीही आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार व राजकीय वारसा त्यांना लाभला आहे.  लोकमतने ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार सोहळ्यात राज यांची मुलाखत आयोजित केली हे कळताच वरळीच्या एनएससीआय डोममध्ये तुफान गर्दी उसळली. खा. अमोल कोल्हे आणि बँकर अमृता फडणवीस यांनी राज यांची मुलाखत घेतली.  गेल्या दोन दिवसांत सोशल मीडियाच्या कट्ट्यांवर मुलाखतकारांच्या या निवडीवरून काही ट्रोलर्सनी चर्चेचा किस पाडला खरा, मात्र राज ठाकरे यांची खणखणीत मुलाखत अवघे मराठी चर्चाविश्व व्यापून उरली, हे मात्र खरे!

अमोल कोल्हे यांनी राज यांच्यासमोर प्रश्नांचा दांडपट्टा सळसळ करीत फिरवला आणि अमृता फडणवीस यांनी राज यांना थेट त्यांच्या ‘डॉन’ इमेजबद्दल छेडले. केंद्रीय यंत्रणांच्या जाचापासून घराणेशाहीपर्यंत आणि मराठी चित्रपटांना सिनेमागृहे मिळवून देण्यापासून मनसेच्या ब्ल्यू प्रिंटपर्यंत सर्वच प्रश्न विचारले गेले. मुलाखतकारांनी हातचे काहीच राखून न ठेवता विचारलेल्या सर्वच प्रश्नांना राज यांनीही खुलेपणाने उत्तरे दिली. केवळ मराठी... मराठी... न करता आपण यापुढे हिंदुत्वाचा मुद्दा पुढे नेणार हे राज यांनी स्पष्ट केले. मात्र हिंदुत्वाचा अभिमान बाळगताना उन्माद नको ही मध्यममार्गी भूमिका राज यांनी घेतली व ती स्वागतार्ह आहे. अयोध्येतील बाबरी मशीद पडल्यानंतर झालेल्या दंग्यांना असलेली विविध घटनांची पार्श्वभूमी त्यांनी उलगडून दाखवली. राज यांनी यापूर्वी ‘लाव रे तो व्हिडीओ’ या माध्यमातून अनेक हल्ले केले होते. आता राज यांची भूमिका मवाळ झाल्यामुळे या विषयावरून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती होणे स्वाभाविक होते. राज यांनी आपल्या बदललेल्या भूमिकांच्या कारणमीमांसेला खुबीने बगल देताना ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांचा संस्कार आपल्यावर कसा जुना आहे व मुंबईतील झोपडपट्ट्यांबाबत याच माध्यमातून आपण त्या काळात थेट शिवसेनाप्रमुखांसमोर कसे प्रेझेंटेशन दिले होते, याकडे लक्ष वेधले. विषय झोपडपट्ट्यांचा असो की टोल नाक्यांचा किंवा ब्ल्यू प्रिंटचा; राज यांनी चिकाटीने पाठपुरावा केला आहे. महाराष्ट्रातील टोल नाक्यांवरील बेलगाम वसुलीस त्यांच्या आंदोलनामुळे काही प्रमाणात लगाम लागला. विकासाची ब्ल्यू प्रिंट राज यांनी तयार केली. मात्र नाशिकमध्ये विकासाचे त्यांनी निर्माण केलेले मॉडेल मतदारांच्या पचनी पडले नाही, ही खंत त्यांच्या मनात आहे हे जाणवले. शिवसेनेत शिवसेनाप्रमुख यांच्या संस्कारात घडलेल्या राज यांच्याकरिता शिवसेना ही दुखरी जागा आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सध्याच्या स्थितीबाबत राज यांना थेट विचारले असता त्यांनी शिवसेना हा विषय आपल्याकरिता संपल्याचे जाहीर केले.

ईडी, सीबीआय यांच्या दडपशाहीवरून राहुल गांधींपासून अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत अनेक नेते तोंडसुख घेत असताना राज यांनी संयत भूमिका घेतली. केंद्रीय यंत्रणांचा जाच आहे, पण भ्रष्टाचाराचे नाले तुंबलेले आहेत. ते साफ व्हायला हवेत. देशाच्या जडणघडणीत योगदान असलेल्या टाटा उद्योगसमूहाच्या रतन टाटा यांनाही चौकशीला सामोरे जावे लागले होते, याची आठवण करून देताना ज्याच्या हाती सत्तेची लाठी असते तो तिचा वापर स्वार्थाकरिता करतो हेच अधोरेखित केले. शिवसेना फोडूनही सत्तेचा सुखी संसार करता न आलेल्या भाजपचे राष्ट्रवादीच्या नेत्यांना डोळे मारणे सुरू असताना मनसेला गृहीत धरले जाण्याची नाराजी राज यांनी लपवली नाही. भक्कम संघटना बांधणीत आजवर आलेले अपयश आणि कृतिशीलतेची वानवा यावरून राज ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका होत असते, तरीही जनमानसाला - विशेषतः तरुण वर्गाला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आकर्षण आहे हे राज यांचे कट्टर विरोधकही मान्य करतात. ते आकर्षण कशातून येते, या प्रश्नाचे उत्तर हे या मुलाखतीचे फलित होते, हेच खरे !

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAmruta Fadnavisअमृता फडणवीसlokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2023