शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
3
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अॅक्शन मोडवर, अॅडव्हायजरी जारी
4
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
5
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
6
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
7
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
8
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
9
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
10
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
11
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
12
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
13
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
14
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
18
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
19
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
20
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू

Holi 2020: आनंदाच्या रंगांनी आयुष्याचाच उत्सव होवो!

By विजय दर्डा | Published: March 09, 2020 2:27 AM

होळी हा केवळ सण नव्हे, तर सद्भावनेच्या थोर परंपरेचे प्रतीक

विजय दर्डाकोरोनाच्या भयंकर साथीने आपणा सर्वांनाच घोर चिंता लागली आहे. या चिंताग्रस्त अवस्थेतच आपणा सर्वांचा आवडता होळीचा सण साजरा करणार आहोत. होळी हा रंगांचा उत्सव आहे, परस्परांच्या भेटीगाठींचा सण आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी कशी साजरी करावी, याची काळजी वाटणे स्वाभाविक आहे. मला वाटते, बस्स, आपण सर्वांनी सतर्क राहण्याची खरी गरज आहे. आणखी हेही लक्षात घ्या की, उत्सव साजरा करणे ही प्रफुल्लित मनाची अवस्था आहे. त्यासाठी स्वत: आणि इतरांना रासायनिक रंगांनी माखविण्याची थोडीच गरज आहे? कोरड्या होळीसारखी उत्तम होळी अन्य कोणती असू शकते?

शिवाय यंदाच्या होळीला दिल्लीतील भीषण दंगलींच्या विषण्णतेची झालर आहे. दंगलींमुळे समाजात पसरलेला विखार अद्याप गेलेला नाही. त्यामुळे या होळीत आपण प्रेम व ममतेच्या रंगातच न्हाऊन निघू या! होळी हा केवळ रंगांचा सण नाही. सामाजिक सद््भाव व बंधुभावाची मुळे खोलवर रुजलेल्या आपल्या संस्कृतीचा तो प्रातिनिधिक उत्सवही आहे. होळी हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. समाजातील भेदभाव संपवून एकोप्याने राहण्याचा हा सण आहे. होळीच्या दिवशी जात व धर्माची सर्व बंधने गळून पडतात. नवोदित कवी संजय वर्मा यांनी लिहिलेल्या या ओळी किती समर्पक आहेत पाहा:

रंगों की कोई जात नहीं होतीभाईचारे के देश में दुश्मनी की बात नहीं होतीये खेल है प्रेम की होली कामिलकर रहते इसलिए टकराव की बात नहीं होती.

होळीच्या दिवशी वैर आणि शत्रुत्व विसरून सर्वांनी गळ्यात गळे घालण्याची भारताची जुनी परंपरा आहे. याचाच अर्थ असा की, तुम्ही दोस्तीचा रंग जेवढा गडद कराल तेवढेच वैमनस्य फिके होत जाईल. होळी साजरी करण्याच्या परंपरेविषयी अनेक किस्से आपल्या समाजात रूढ आहेत. पण मला असे वाटते की, समाजात प्रेम आणि बंधुभावाची भावना रुजविण्यासाठीच या सणाची सुरुवात झाली असावी. या सणाची परंपरा जुनी असली तरी आपण आजही तो तेवढ्याच उत्साहाने साजरा करतो याचे कारणच हे की, रंगांबद्दल आपल्या मनात मनापासून ओढ आहे.

आर्यांच्या काळातही होळी प्रचलित होती. नारद पुराण व भविष्य पुराणाच्या प्राचीन हस्तलिखितांमध्येही होळीचा उल्लेख आढळतो. प्रसिद्ध मुस्लीम पर्यटक अलबरुनीच्या प्रवासवर्णनातही या सणाचे वर्णन आहे. रंगांच्या या ताकदीमुळेच हा सण मुघलकाळातही टिकून राहिला. अकबर जोधाबाईसोबत व जहांगिर नूरजहाँशी होळी खेळत असे, असे इतिहासात नमूद आहे. शहाजहाँच्या काळात होळीला ईद-ए-गुलाबी व आब-ए-पाशी (रंगांचे फवारे) असे म्हटले जायचे. अंतिम मुघल बादशहा

बहादूरशहा जफर यांना होळीच्या दिवशी अनेक मंत्री रंग लावायचे. आपल्या समाजात बंधुभाव दृढ होण्यात होळीचे योगदान किती मोठे आहे, हे समजावे म्हणून मी इतिहासातील हे दाखले मुद्दाम दिले. एवढेच नव्हे, मुस्लीम कवींनी होळीवर सुंदर काव्यरचना केलेल्या आहेत. नझीर अकबराबादी यांची ही रचना माहीत नाही, असा भारतीय अभावानेच आढळेल:जब फागुन रंग झमकते हों,तब देख बहारें होली कीऔर डफ के शोर खड़कते हों,तब देख बहारें होली कीपरियों के रंग दमकते हों,तब देख बहारें होली कीकुछ घुंघरू ताल छनकते हों,तब देख बहारें होली की

नझीर अकबराबादी यांची ही रचना सुमारे १०० वर्षांपूर्वीची आहे. नझीर बनारसी यांचे हे ८० वर्षांपूर्वीचे काव्यही याहून कमी सरस नाही:कहीं पड़े न मोहब्बत की मार होली मेंअदा से प्रेम करो दिल से प्यार होली मेंगले में डाल दो बांहों का हार होली मेंउतारो एक बरस का खुमार होली मेंमिलो गले से गले बार बार होली मेंहोली मिलन हे खरे तर वैमनस्य दूर सारून समाजात दोस्तीचा रंग पक्का, अधिक गहीरा करण्याचे प्रतीक आहे. तेव्हा यंदाच्या होळीमध्ये आपण मैत्रीचा रंग एवढा गडद करू या, प्रेमाचा गुलाल एवढा दूरवर उधळू या की, वैराचे बीज समाजात अंकुरित व्हायलाही संधी मिळू नये! मग आनंदाची खरी रंगवर्षा होईल व संपूर्ण जीवनच जणू उत्सव होऊन जाईल! या पृथ्वीतलावर माणुसकीच्या रंगाहून सुंदर रंग कोणताही रंग नाही, हे पक्के लक्षात ठेवा.

तुम्हा सर्वांना होळीच्या मनापासून भरपूर शुभेच्छा! स्वस्थ राहा, आनंदी राहा. 

(लेखक लोकमत समूह एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आहेत)

(vijaydarda@lokmat.com)

टॅग्स :Holiहोळीcolourरंग