शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

अदृश्य सायबर दरोडेखोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 05:47 IST

आभासी जगातील दरवाजावरील टकटक करणारा किमान एकदा पारखून पाहिला तरी वास्तववादी जगात फकीर होण्याची वेळ येणार नाही.

अचानक समोर आलेल्या मित्राने दोन-पाचशे रुपये मागितले तर पाकीट घरी विसरल्याचा बहाणा केला जातो. मोबाइलचा पासवर्ड बायकोलाही कळू नये याकरिता नवरोबा धडपडतात. मालकी हक्क गाजवणाऱ्या सहा-आठ स्थळांना नकार दिलेल्या विवाहेच्छुक तरुणी असतात. हे सारे आपल्या अवतीभवती वास्तवात असतात, भेटतात. मात्र हीच हाडामांसाची माणसे व्हर्च्युअल विश्वात तशीच वागत नाहीत. मित्राला उसने पैसे देण्यास नकार देणारा व्हर्च्युअल विश्वात एखाद्या मद्याच्या बाटलीच्या मोहापायी लाखभर रुपये देऊन बसतो. बायकोला मोबाइलचा पासवर्ड न सांगणारा पलीकडून मधुर आवाजात संवाद करणाऱ्या तरुणीला आपल्या डेबिट कार्डाचा पिन नंबर अलगद सांगून मोकळा होतो. मालकी हक्क गाजवणाऱ्या स्थळांना नकार देणारी विवाहेच्छुक तरुणी मॅट्रिमोनिअल साइटवर भेटलेल्या उपवराला आपल्या खात्यातून मोठ्या रकमा कधी व कशी ट्रान्सफर करून मोकळी होते ते तिलाही कळत नाही.

व्हर्च्युअल विश्वात कधी न पाहिलेल्या, भेटलेल्या माणसांच्या जाळ्यात सुशिक्षित, समंजस, बुजुर्ग माणसे सावज बनून अलगद कधी अडकतात ते त्यांना का कळत नाही, हेच पोलिसांसमोरचे आव्हान आहे. अकोल्यातील एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने फेसबुक फ्रेंडच्या २५ लाखांचे गिफ्ट पाठवण्याच्या आमिषाला बळी पडून ५६ लाख रुपये गमावल्याचे प्रकरण उघड झाले आहे. या प्रकरणात एका नायजेरियनसह दोन आरोपी अटकेत आहेत. फसवणूक झालेली व्यक्ती निवृत्त अधिकारी आहे म्हणजे तिने तिच्या आयुष्यात अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले आहेत. परंतु तरीही थोडीथोडकी नव्हे तर इतकी मोठी रक्कम गमावली आहे हे एक उदाहरण आहे. मात्र दररोज अशी फसवणूक होणारी शेकडो माणसे आहेत.
गेल्या काही वर्षांत सायबर दरोडेखोरांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या टोळीत काही तरुण व तरुणी असतात. ते मोठ्या प्रमाणावर सीमकार्ड खरेदी करतात. पश्चिम बंगालसारख्या राज्यातून या टोळ्यांनी सीमकार्ड खरेदी केल्याचे निदर्शनास आले आहे. टोळीचे सदस्य बिहार, झारखंडसारख्या गरीब राज्यातील गरजू व्यक्तींची बँक खाती मामुली रक्कम मोजून खरेदी करतात. एका प्रकरणात एका गरोदर स्त्रीला तिच्या प्रसूतीकरिता ८०० रुपये देऊन सायबर चोरांनी तिचे बँक खाते खरेदी केले. टोळीचे काही सदस्य सोशल मीडियावरील सर्वसामान्यांचे फोटो, व्हिडिओ, चॅट यावर लक्ष ठेवून असतात. एखादा उच्चपदस्थ निवृत्त झाला की, तो आपला निरोप समारंभाचा फोटो फेसबुक, इन्स्टाग्रामवर अपलोड करतो. नवी मोटार खरेदी करण्याच्या विचारात असलेल्यांचा जुनी मोटार विकण्याचा संदेश पाहून त्यांना लक्ष्य केले जाते. निवृत्त झालेल्या व्यक्तीला गुंतवणुकीचे आमिष दाखवून किंवा मोटार खरेदी करू पाहणाऱ्यास त्यासोबत गिफ्टची लालूच दाखवून त्यांच्या खात्यातील मोठ्या रकमा गोरगरिबांच्या खरेदी केलेल्या बँक खात्यात जमा करायला भाग पाडले जाते. रक्कम जमा होताच ती काढून घेतली जाते व त्या गोरगरिबाच्या हातावर फारच थोडे पैसे टेकवले जातात. या टोळ्यांमधील नायजेरियन हे तर क्रिप्टो करन्सीमार्फत आफ्रिकी देशात ट्रान्सफर करतात.
भारतात फसवणुकीच्या हेतूने आलेले हे नायजेरियन आपला पासपोर्ट नष्ट करून बिनदिक्कत येथे राहतात. अशा बऱ्याच सायबर गुन्ह्यांत पानवाले, रिक्षाचालक, ढाब्यावरील कामगार यांच्या नावावर सीमकार्ड खरेदी केलेली असतात व पोलीस जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांना या फसवणुकीची गंधवार्ता नसते. झारखंडमधील जामतारा हे अशा सायबर दरोडेखोरांचे मोठे केंद्र आहे. या सायबर टोळ्यांमध्ये सामील होणाऱ्यांना विवाहेच्छुक तरुणींशी लव्ह चॅट कसे करायचे, कर्करोग किंवा तत्सम दुर्धर आजाराच्या रुग्णांच्या नातलगांना आपण विदेशातील डॉक्टर असल्याचे भासवून गंडा कसा घालायचा, शेतीचे बियाणे विकण्याच्या बहाण्याने शेतकऱ्यांची फसवणूक कशी करायची, याचे रीतसर प्रशिक्षण देतात. पोलिसांनी पकडले तर त्यांच्याकरिता न्यायालयात युक्तिवाद करणारे वकील बांधलेले असतात.आपल्या वास्तव जीवनातील नातलगांना आपल्या व्हर्च्युअल विश्वातील गुपिते कळू न देण्याचा आटापीटा अनेकजण करीत असतात. त्यामुळे कुणी चॅटिंग अथवा डेटिंग साइटवर सूत जुळवत असेल तर आर्थिक वस्त्रहरण झाल्यावरच तो हे कुटुंबात जाहीर करतो. अदृश्य सायबर दरोडेखोरांचे सर्वात मोठे लक्ष्य हे महिला व ज्येष्ठ नागरिक असतात हेही अनेक प्रकरणात उघड झाले आहे. आभासी जगातील दरवाजावरील टकटक करणारा किमान एकदा पारखून पाहिला तरी वास्तववादी जगात फकीर होण्याची वेळ येणार नाही.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम