शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 08:43 IST

ठाकरेबंधूंच्या युतीची चर्चा गेले काही महिने सुरू असताना राजकारणात ‘ठाकरे ब्रॅण्ड’ नाही, असे भाजपचे नेते बोलत होते. मात्र आता ठाकरेबंधूंची युती झाल्यावर दोन्हीकडील सैनिकांचा दुणावलेला आत्मविश्वास पाहून भाजपच्या मनात भीतीची पाल चुकचुकली आहे.

शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर उद्धव व राज ठाकरे, दोन्ही सुना व नातवंडे यांना एकत्र नतमस्तक होताना पाहून बाळासाहेब गहिवरले असतील. १९ वर्षांनंतर पुलाखालून इतके पाणी वाहून गेल्यावर का होईना ‘तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका’, याची जाणीव या साऱ्यांना झाली याचा कोण आनंद बाळासाहेबांना झाला असेल. उद्धव व राज ठाकरे यांनी विभक्त होऊ नये हीच बाळासाहेबांची इच्छा होती. राज यांच्या राजकीय काडीमोडानंतर २००९च्या निवडणुकीत ‘उद्धव, आदित्य यांना सांभाळून घ्या’, असे आर्जव करणारे बाळासाहेब पाहिल्यावर कडव्या शिवसैनिकांना ‘हे दोघे एकत्र का येत नाहीत?’ अशी चुटपुट लागली होती. काहींनी हे दोघे एकत्र यावे याकरिता मोहीम उघडली. काहींनी अनवाणी चालण्याच्या शपथा घेतल्या.. परंतु पहिली टाळी कुणी कुणाला द्यायची, असा अहंकाराचा मुद्दा उत्पन्न झाला. निवडणूक प्रचारात कौटुंबिक उणीदुणी काढण्यापर्यंत दोघांनी मजल गाठली. दोन्हीकडील ‘सैनिक’ नेत्यांना खुश करण्याकरिता बाह्या सरसावून एकमेकांच्या अंगावर गेले, एकमेकांवर नारळ भिरकावून डोकी फोडून बसले. छगन भुजबळ यांच्यापासून नारायण राणेंपर्यंत अनेकांनी शिवसेना सोडली तेव्हा पक्षात मोठी फूट पडली नाही. केंद्रातील भाजपच्या महाशक्तीचा आशीर्वाद लाभलेल्या एकनाथ शिंदे यांनी मात्र शिवसेनेतील नेते, पदाधिकारी अक्षरश: खरवडून नेले. त्यामुळे उद्धव यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. राज यांनी मनसे स्थापन केली खरी; पण तिची घट्ट बांधणी करण्यात ते कमी पडले. राजकारण व भूमिकेत सातत्य नसल्याने त्यांनाही अनेक सहकारी सोडून गेले. साहजिकच राज यांच्याही भवितव्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे दोघा बंधूंना अखेर प्रीतिसंगमात उडी ठोकणे अपरिहार्य झाले. तो मुहूर्त बुधवारी साधला.

महापालिका निवडणुकीत दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. याची घोषणा राज यांनी केली हे  विशेष ! कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, असे उद्धव म्हणाले. ठाकरेबंधूंच्या युतीची चर्चा गेले काही महिने सुरू असताना राजकारणात ‘ठाकरे ब्रॅण्ड’ नाही, असे भाजपचे नेते बोलत होते. मात्र आता ठाकरेबंधूंची युती झाल्यावर दोन्हीकडील सैनिकांचा दुणावलेला आत्मविश्वास पाहून भाजपच्या मनात भीतीची पाल चुकचुकली आहे. एकनाथ शिंदे ठाण्यात आणि राज व शिंदे ही डबलबॅरल गन मुंबईत उद्धव यांच्यावर रोखून महापालिका त्यांच्या हातून स्वबळावर हिसकावून घ्यायची, असा भाजपचा डाव होता. परंतु अचानक हे दोघे एकत्र आल्याने मुंबईत भाजपपुढे आव्हान निर्माण झाले. शिवाय शिंदे यांचे महत्त्व अवास्तव वाढले. दिल्लीत कळ फिरवून शिंदे यांनी भाजपला युती करायला भाग पाडले. त्याचे कारण अर्थातच लोकसभेतील तोकडे बहुमत व ठाकरेबंधूंची युती हेच आहे. २०१४ पासून मागील तीन विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचे भव्यदिव्य नेतृत्व पाठीशी असूनही महाराष्ट्रात भाजपला स्वबळावर सत्ता काबीज करता आली नाही. त्याचप्रमाणे महापालिका निवडणुकीतही भाजप दोन जागांनी का होईना शिवसेनेच्या मागे राहिली. भावांचे हे मनोमिलन पुन्हा एकदा भाजपला देशाच्या आर्थिक राजधानीवर कब्जा करण्याच्या मनसुब्यांवर उदक सोडायला लावणार, अशी चिन्हे दिसतात.

मुंबईतील मराठी व मुस्लीम मतदारांवर या युतीची भिस्त असेल. मुंबईसह महाराष्ट्रातील उच्च मध्यमवर्ग हा खरे तर शिवसेनेचा लाभार्थी आहे. मराठी माणसाला बँका, एलआयसी, एअर इंडिया वगैरे आस्थापनांत नोकऱ्या मिळाव्या याकरिता शिवसेनेने संघर्ष केल्याने आज त्यांच्या घरातील मुले-नातवंडे अमेरिका, ऑस्ट्रेलियात सुखनैव जगत आहेत. बाळासाहेबांच्या उपकारातून उतराई होण्याची हीच संधी आहे हा संदेश ठाकरेबंधूंनी या वर्गापर्यंत पोहोचवला व मुंबईतील गरीब, मध्यमवर्गीय मराठी माणसे जागा विकून उपनगरात फेकली जाण्याचा सध्याचा वेग कमी केला तरी मुंबई राखणे त्यांना शक्य आहे. महाविकास आघाडीला सुरुंग लावण्याकरिता भाजपनेच राज यांना तिकडे पाठवले, अशी टिमकी भाजपचे काही नेते वाजवत आहेत. निवडणूक प्रचारात आपण बरेच व्हिडिओ लावणार असल्याचे राज यांनी सांगितले आहे. निवडणुकीनंतर सत्तेच्या छोट्या तुकड्याचा मोह टाळायची तयारी राज यांनी ठेवली पाहिजे. कारण ठाकरेबंधूंच्या युतीपुढील लढाई छोटी व लवकर संपणारी नाही. अन्यथा ही युती अळवावरचे पाणी ठरेल. दोन्हीकडील मतदारांचा विश्वासघात ठरेल आणि बाळासाहेबांच्या स्मृतीशी केलेली प्रतारणाही ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Editorial: Raj-Uddhav and BJP, Don't Fail Again, Don't Split!

Web Summary : The Thackeray brothers' reunion sparks political tremors. Their alliance challenges BJP's Mumbai ambitions, fueled by concerns over a weakened Shiv Sena and the potential loss of Marathi votes. Raj's role and commitment will be crucial for sustained unity and electoral success, averting past mistakes.
टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBMC Electionsमुंबई महापालिका निवडणूक २०२६Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६