शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आमचा पगार तर चहा-पाण्याला पुरत नाही, आम्ही काय करावं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 09:52 IST

गावोगावच्या आरोग्य यंत्रणेचा मुख्य आधार असलेल्या ‘आशा सेविका’ त्यांच्या मागण्या घेऊन मुंबईत आंदोलनाला बसल्या आहेत. त्यांच्याशी संवाद !

शर्मिष्ठा भोसले, मुक्त पत्रकार

आंदोलनाच्या बॅनरसमोर एक कुणी हाताचा पाळणा बनवून ३ महिन्यांच्या बच्च्याला झोपवतेय,  काहीजणी हाताची उशी करून धुळीनं माखलेल्या सतरंज्यांवर झोपलेल्या, काहीजणी जेवणाच्या रांगेत उभ्या... उरलेल्या आपापली बरीचशी सारखी आणि बरीचशी वेगळी सुख-दु:खं एकमेकींना सांगत रात्र जागवत राहिलेल्या. या साऱ्या ‘आशा’ सेविका. सरकारचं लक्ष वेधायला  पदरचे पैसे टाकून, उधारी-उसनवारी करून  मुंबईला आलेल्या ! पंचेचाळिशीच्या हसीना पठाण गेली १३ वर्षे ‘आशा’ म्हणून काम करतात. म्हणाल्या, “कोरोना था तब जान हथेलीपे लेके काम किया हम सबने. उसका ये सिला मिला देखो. उधर घर के लोगा हम को बोलते तुम्हारी पगार तो चाय को भी बस नै होती. अब तो यहीं बोलेंगे हम सरकारसे की आप हम को रोटी दो, तभी हम आप को वोट देंगे.” राजश्री स्वामी आणि कविता सोनकटले सांगतात, ‘‘आंदोलनाच्या ठिकाणी सत्तेतलं कुणीच फिरकलं नाही. विरोधी पक्षनेते येऊन पाठिंबा देऊन जातात. आम्ही आशा वर्कर गावातल्या सगळ्यांशी जोडलेल्या असतो. लोकांवर प्रभाव असतो आमचा हे विसरतात सत्ताधारी!”

सांगायला-विचारायलाही लाज वाटेल अशा मोबदल्यावर तब्बल ७८ इंडिकेटर्सवर काम करणाऱ्या या आशा सेविकांचं आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानात सुरू आहे. गावोगावहून मुंबई गाठलेल्या आशांसोबत महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीचे विनोद झोडगे, दत्ता देशमुख, सचिन आंधळे, राधाबाई पांचाळ, मुगाजी बुरुड, राजू देसले यांच्यासह डाव्या चळवळीतील ‘सीटू’च्या आरमायटी इराणी, उज्ज्वला पडलवार आणि अर्चना घोगरे आंदोलन पुढं नेत आहेत.

झोडगे सांगतात, “राष्ट्रीय आरोग्य अभियानात राज्यभरात सुमारे सत्तर हजार आशा आणि साडेतीन हजारांहून जास्त गटप्रवर्तक कार्यरत आहेत. १८ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबरला रास्त मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारला तेव्हा आरोग्यमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांनी तीन आश्वासनं दिली होती. २ हजार रुपयांची दिवाळीभेट, आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात ७ हजार रुपयांची वाढ आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची वाढ. या मंजूर झालेल्या मागण्यांचे शासन निर्णय अजूनही काढण्यात आलेले नाहीत. त्याविरोधात आम्ही पुन्हा मैदानात उतरलो आहोत.’’ आंदोलनकर्त्या आशांपैकी अनेकजण आजारी पडल्या आहेत. दिवसभर ऊन-धूळ आणि रात्री डास-थंडी असा मारा; मात्र ‘जीआर हातात पडत नाही तोवर हटणार नाही.’ अशी जिद्द त्या बोलून दाखवतात. उषा अडांगळे सांगतात, “कोरोनाकाळात  मासिक १ हजार रुपये विशेष भत्ता सरकारनं मंजूर केला  दोन वर्षांतला फक्त पहिला महिना तो भत्ता मिळाला.”

सुरेखा हजारे म्हणतात, “क्षयरोग, कुष्ठरोग आणि विविध संसर्गजन्य आजारांनी बाधित व्यक्तीशी आम्ही थेट संपर्कात येतो.  आमच्या जिवाची बाजी लावून केलेल्या कष्टाचा मोबदला द्यायची वेळ आली की मात्र व्यवस्था हात वर करते. आशा आजारी पडल्यावर तिला विशेष प्राधान्यानं आरोग्य सेवाही मिळत नाही. ठरवलेली सुट्टी नसते. साधी पे-स्लीप मिळावी ही आमची मागणीही आजवर मान्य झालेली नाही. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे पैसे गर्भवती महिलांना वेळेवर मिळत नाहीत, अनेकदा उशिराही मिळत नाहीत. त्यांच्या घरचे आमच्यावरच पैसे खाल्ल्याचा आरोप करतात. कुठंकुठं तोंड द्यावं ?”

विदर्भातल्या आशा सांगतात, “आता गावाकडे कापूसवेचणी सुरू आहे. एक महिला दिवसाला पाचशे रुपये मजुरी कमावते . आम्ही आरोग्य सेवा देऊनही तिच्या तुलनेत तुटपुंजं काहीतरी पदरात पडतं. एकल महिला आहेत, विधवा, परित्यक्ताच प्रामुख्याने या कामात आहेत. सरकारने आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे” ‘इतक्या त्रासात इथं तग धरून कशा दिवसरात्र काढताय”- या प्रश्नावर एक आशा म्हणाली, “आम्हाला गावी तरी कुठलं सुख आहे ? इथं येऊन दु:खातला जीव अजून थोडा दु:खात टाकलाय इतकंच.” न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गानं लढणाऱ्या या आशांचं दु:ख प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींना कळेल का?