शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

भाबडा आशावाद

By रवी टाले | Updated: December 28, 2019 11:56 IST

जागतिक मंदीच्या प्रभावातून भारत लवकरच बाहेर येईल आणि तसे करणारी जगातील पहिली अर्थव्यवस्था ठरेल, हा अमित शाह यांचा आशावाद भाबडा वाटतो.

ठळक मुद्देसत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आता किमान मंदी असल्याचे स्वीकारण्यास प्रारंभ केला आहे. २००८-०९ मध्ये मंदी आली होती तेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेला तब्बल दोन ट्रिलियन डॉलर्स मूल्याचा फटका बसला होता.आयएल अ‍ॅण्ड एफएससारख्या बड्या कंपन्यांनी थकविलेल्या कर्जांमुळे वित्त पुरवठ्याचे संकट उभे ठाकले आहे.

देशात आर्थिक मंदीची चर्चा सुरू झाली तेव्हा मंदी असल्याचे साफ नाकारलेल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आता किमान मंदी असल्याचे स्वीकारण्यास प्रारंभ केला आहे. मंदी असल्याचे मान्य करणाऱ्या सत्ताधारी नेत्यांच्या मालिकेत आता केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचेही नाव जुडले आहे. शुक्रवारी सिमला येथे गुंतवणूकदारांच्या परिषदेस संबोधित करताना, जागतिक आर्थिक मंदीतून बाहेर पडणारी भारत ही जगातील पहिली अर्थव्यवस्था असेल आणि ते लवकरच घडेल, अशा आशयाचे वक्तव्य शाह यांनी केले.शाह यांचे भाकीत खरे ठरल्यास प्रत्येक भारतीयास आनंदच होईल; पण सध्याच्या घडीला तर याचाच आनंद आहे, की शाह यांनी किमान मंदी असल्याची वस्तुस्थिती तर मान्य केली! अर्थात तसे करताना जागतिक मंदी असा शब्दप्रयोग करून, मंदीसाठी भारत सरकार नव्हे, तर जागतिक परिस्थिती कारणीभूत असल्याची मखलाशी त्यांनी अप्रत्यक्षरीत्या केलीच, ही बाब अलहिदा!भारतीय अर्थव्यवस्थेचा मंदावलेला वेग हा जागतिक मंदीचा परिणाम असल्याचे अमित शाह यांचे म्हणणे मान्य केले तरी, भारत लवकरच त्यामधून बाहेर पडेल, हा त्यांचा आशावाद पटण्यासारखा नाही. त्यामागचे कारण हे आहे, की जागतिक मंदीला अद्याप खºया अर्थाने सुरुवातच झालेली नाही. नॅशनल असोसिएशन फॉर बिझनेस इकॉनॉमी या संस्थेने नुकतेच एक सर्वेक्षण केले. त्यामध्ये ख्यातीप्राप्त अर्थतज्ज्ञांनाच समाविष्ट करण्यात आले होते. त्या सर्वेक्षणातून असा निष्कर्ष निघाला, की आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये मंदी अमेरिकेला धडक देऊ शकते. याचा दुसरा अर्थ हा, की अद्याप तरी अमेरिकेला मंदीने ग्रासलेले नाही. जेव्हा मंदी अमेरिकेला ग्रासते तेव्हा काय होते, या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी आपल्याला भूतकाळात जावे लागेल.अमेरिकेत २००८-०९ मध्ये मंदी आली होती तेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेला तब्बल दोन ट्रिलियन डॉलर्स मूल्याचा फटका बसला होता. त्या मंदीने युरोप आणि आशिया खंडातील तब्बल ५० देशांना कवेत घेतले होते; मात्र तेव्हाही भारताचा प्रत्येक तिमाहीतील सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच जीडीपीच्या वाढीचा दर सहा टक्क्यांच्या आसपास होता. तुलनेत गत तिमाहीतील हाच दर अवघा ४.५ टक्के होता, ही वस्तुस्थिती लक्षात घेतल्यास, यावेळचे आव्हान किती मोठे आहे, हे सहज ध्यानात यावे!साधारणत: २००९ पासून भारताचा वैश्विक अर्थव्यवस्थांसोबतचा संपर्क लक्षणीयरीत्या वाढला. भारतीय बाजारपेठांमधील मोठा हिस्सा बड्या विदेशी कंपन्यांच्या उत्पादनांनी व्यापला आहे. अशा कंपन्यांना जागतिक मंदीचा तडाखा बसल्यास त्याचे हादरे भारतीय अर्थव्यवस्थेलाही बसणे स्वाभाविक आहे. त्याचा परिणाम बेरोजगारी वाढण्यात होणे अनिवार्य आहे. सध्याच्या घडीला भारतात बेरोजगारीने गत ४५ वर्षातील उच्चांक गाठला आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेतल्यास, परिस्थिती किती गंभीर वळणावर येऊन ठेपली आहे, हे ध्यानात येईल.सुमारे एक दशकापूर्वीच्या मंदीच्या वेळी भारताकडे विदेशी चलनाचा भक्कम साठा होता. विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण मोठे होते. त्याशिवाय कॉर्पोरेट क्षेत्राची कर्ज उचल मर्यादित होती. त्यामुळे भारताला मंदीचा सामना करणे सोपे गेले होते. यावेळची परिस्थिती खूप भिन्न आहे. अनेक बड्या कॉर्पोरेट कंपन्या वित्तीय संकटाचा सामना करीत आहेत. आयएल अ‍ॅण्ड एफएससारख्या बड्या कंपन्यांनी थकविलेल्या कर्जांमुळे वित्त पुरवठ्याचे संकट उभे ठाकले आहे. विदेशी गुंतवणुकीचा ओघही आटला आहे. या पार्श्वभूमीवर, जागतिक मंदीच्या प्रभावातून भारत लवकरच बाहेर येईल आणि तसे करणारी जगातील पहिली अर्थव्यवस्था ठरेल, हा अमित शाह यांचा आशावाद भाबडा वाटतो.- रवी टाले    ravi.tale@lokmat.com   

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाIndiaभारतAmit Shahअमित शहा