शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

सोनाराने कान टोचले!

By रवी टाले | Published: December 14, 2019 7:41 PM

अरविंद सुब्रमण्यम हे त्या अर्थाने स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच निवडलेले सोनार आहेत. त्या सोनारानेच कान टोचले आहेत; पण आता तरी सरकारला धोक्याची घंटा ऐकू येणार आहे का?

ठळक मुद्देअरविंद सुब्रमण्यम यांनीही अर्थव्यवस्थेबाबत चिंता प्रकट केली आहे. सध्याच्या मंदीची तुलना १९९१-९२ मधील आर्थिक संकटासोबत केली आहे.सुब्रमण्यम यांच्या विधानाचा अर्थ हा होतो, की समस्या खूप गंभीर आणि खोलवर आहे.

अर्थव्यवस्थेच्या नाजूक स्थितीबाबत आता सत्ताधारी भारतीय जनता पक्षाप्रती सहानुभूती बाळगणाऱ्या मंडळीकडूनही चिंतेचे स्वर उमटू लागले आहेत. उद्योगपती राहुल बजाज यांच्या पाठोपाठ माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनीही अर्थव्यवस्थेबाबत चिंता प्रकट केली आहे. राहुल बजाज आणि अरविंद सुब्रमण्यम हे दोघेही पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थक होते. राहुल बजाज यांनी भूतकाळात अनेकदा मोदींच्या कार्यपद्धतीची, त्यांच्या धोरणांची भलामण केली होती. सुब्रमण्यम यांना तर मोदींनीच देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार नेमले होते. त्याच सुब्रमण्यम यांनी आता अर्थव्यवस्थेतील सध्याच्या मंदीची तुलना १९९१-९२ मधील आर्थिक संकटासोबत केली आहे.अरविंद सुब्रमण्यम यांनी उल्लेख केलेल्या कालखंडात भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच जीडीपीच्या वाढीचा दर अवघ्या १.१ टक्क्यावर पोहोचला होता. विदेशी चलनाचा साठा एवढा रोडावला होता, की रिझर्व्ह बँकेकडील सोन्याचा साठा गहाण ठेवून कर्ज घेण्याची पाळी भारत सरकारवर आली होती. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ते सर्वात गंभीर आर्थिक संकट समजले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच नेमलेले देशाचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार जर सध्याच्या संकटाची तुलना १९९१-९२ मधील संकटासोबत करीत असतील, तर परिस्थितीने किती गंभीर वळण घेतले आहे, हे सहज लक्षात यावे!अरविंद सुब्रमण्यम यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे जोशुआ फेल्मन यांच्यासह भारताच्या आर्थिक घसरणीवर अभ्यास केला आहे. त्यावर आधारित एक सादरीकरण त्यांनी बुधवारी बेंगळुरुत केले. या सादरीकरणादरम्यान त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भातील काही गंभीर निरीक्षणे नोंदवली. सुब्रमण्यम यांच्या मते, सध्याच्या आर्थिक घसरणीवर कोणताही तातडीचा उपाय नाही. ज्या अर्थतज्ज्ञाने विद्यमान सरकारमध्ये महत्त्वपूर्ण पद भुषविले होते, तो अर्थतज्ज्ञच जर असे विधान करीत असेल तर ते गांभीर्यानेच घ्यायला हवे. सुब्रमण्यम यांच्या विधानाचा अर्थ हा होतो, की समस्या खूप गंभीर आणि खोलवर आहे.प्रारंभी आर्थिक घसरण सुरू असल्याचे साफ फेटाळून लावणाºया सरकारने गत काही काळापासून किमान समस्या असल्याचे मान्य करायला आणि त्यावर उपाययोजना करायला प्रारंभ केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गत काही दिवसांमध्ये अनेक उपाययोजनांच्या घोषणा केल्या. सरकारच्या आणि देशाच्या दुर्दैवाने अद्याप तरी त्या उपाययोजनांचा कोणताही सकारात्मक परिणाम दृष्टोत्पत्तीस पडलेला नाही. या पार्श्वभूमीवर आता वैयक्तिक आयकराच्या दरात कपात करण्याची आणि वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटीमध्ये वाढ करण्याची चर्चा सुरू आहे. सुब्रमण्यम यांच्या मते अर्थव्यवस्थेची प्रकृती ठीक नसताना या दोन्ही उपाययोजना रोग बरा करण्याऐवजी चिघळवू शकतात. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी एकीकडे कॉर्पोरेट करात कपात करायची आणि दुसरीकडे जीएसटीमध्ये वाढ करायची हे विरोधाभासी आहे, असे मत सुब्रमण्यम यांनी व्यक्त केले. त्यांचे हे मत अर्थकारणाचा जराही गंध नसलेल्या, पण सुज्ञ असलेल्या कोणत्याही व्यक्तीला सहज पटेल. दुर्दैवाने सरकारमधील कुणीही ते मान्य करायला तयार नाही.

सुब्रमण्यम यांच्या सादरीकरणाच्या दुसºयाच दिवशी जाहीर झालेली ताजी आकडेवारी अर्थव्यवस्था संकटात असल्याच्या वस्तुस्थितीकडेच अंगुलीनिर्देश करीत आहे. आॅक्टोबरमधील औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक धक्कादायक पातळीवर पोहोचला आहे. त्याचवेळी किरकोळ महागाईचा दर ५.५४ टक्क्यांवर पोहोचला आहे. आॅक्टोबरमध्ये तो ४.६२ टक्के एवढाच होता. मोदी सरकार आतापर्यंत महागाईच्या दरावर नियंत्रण ठेवल्याचे श्रेय घेत होते. आता त्या आघाडीवरही घसरण सुरू झाली आहे. अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या सुधारणा व उपाययोजनांचा कोणताही परिणाम झाला नसल्याचेच हे द्योतक आहे.तसे बघितल्यास, अरविंद सुब्रमण्यम यांनी बेंगळुरुत केलेल्या सादरीकरणामध्ये कोणताही नवा मुद्दा नव्हता अथवा त्यांनी अर्थव्यवस्थेची प्रकृती सुधारावी, यासाठी उपाययोजनाही सुचविल्या नाहीत; मात्र सरकारने घायकुतीला येऊन निर्णय घेऊ नयेत आणि तातडीने चमत्काराची अपेक्षा करू नये, हा संदेश त्यांनी जरूर दिला. मोदी सरकार तो संदेश गांभीर्याने घेणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. सोनारानेच कान टोचलेले बरे, अशी म्हण आहे. कोणतेही काम त्या क्षेत्रातील तज्ज्ञानेच केलेले बरे, हा त्या म्हणीचा अर्थ! अरविंद सुब्रमण्यम हे त्या अर्थाने स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच निवडलेले सोनार आहेत. त्या सोनारानेच कान टोचले आहेत; पण आता तरी सरकारला धोक्याची घंटा ऐकू येणार आहे का?- रवी टाले    ravi.tale@lokmat.com  

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाNarendra Modiनरेंद्र मोदी