कृषी पर्यटनालाही वाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 11:58 PM2018-05-15T23:58:36+5:302018-05-15T23:58:36+5:30

शेतमालाला भाव नाही. शेती परवडत नाही म्हणून निराश झालेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी पर्यटन हा फार मोठा पर्याय आहे.

Due to farm tourism too | कृषी पर्यटनालाही वाव द्या

कृषी पर्यटनालाही वाव द्या

Next

- बाळासाहेब बोचरे
शेतमालाला भाव नाही. शेती परवडत नाही म्हणून निराश झालेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी पर्यटन हा फार मोठा पर्याय आहे. यासाठी सरकारने ठोस धोरण अवलंबले तर हा व्यवसाय रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करू शकतो.
शेतमालाला भाव नाही. शेती परवडत नाही म्हणून निराश झालेल्या शेतकºयांना कृषी पर्यटन हा फार मोठा पर्याय आज उपलब्ध झाला आहे. यासाठी शेतकºयांची मोट बांधणे आणि त्यांना प्रोत्साहन देणारे धोरण अवलंबले तर देशात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. अनेक तरुण आणि सुशिक्षित शेतकरी उद्योजक म्हणून उदयास येतील.
रानातला रानमेवा रानातच खावा. त्याची चव निसर्गासोबतच चाखली तर त्याच्यासारखा आनंद नाही. अनेक शहरी लोकांना पर्यटनाला निघाल्यावर अस्सल ग्रामीण खाद्यपदार्थांची चव हवी असते. भारताची प्राचीन संस्कृती व चालीरीती, पेहराव याचा अभ्यास करणाºयांना हे सगळं ग्रामीण भागातच पाहायला मिळतं आणि तेही शेतकºयांच्या वावरातच, त्यामुळे शेत शिवाराला भेट देणाºयांची संख्या वाढू लागली आहे. अगदी परदेशी पर्यटकही कृषी पर्यटनाकडे आकृष्ट होऊ लागले आहेत.
बारामतीजवळ सुनेत्राताई पवार यांनी महाराष्टÑ राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ मर्यादित (मार्ट) ही संस्था स्थापन केली आहे. संस्थेच्या माध्यमातून कृषी पर्यटनामध्ये उतरू इच्छिणाºया शेतकºयांना मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाते. गेल्या १० वर्षांत कृषी पर्यटन कार्यशाळा, परिषदा, संमेलन, प्रदर्शने त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून कृषी पर्यटनाचा गवगवा केला जात आहे. त्यामुळे परदेशी पर्यटकांमध्ये ही केंद्रे लोकप्रिय होऊ लागली आहेत. सध्या बाळासाहेब बराटे हे या संस्थेचे चेअरमन आहेत. शेतकºयांनी शहरातील पर्यटकांना आपली शेती व उपक्रम दाखवणे, त्यांचे सशुल्क आदरातिथ्य करणे यालाच कृषी पर्यटन म्हणतात. महाराष्टÑ राज्य यामध्ये आघाडीवर असून आजमितीस राज्यात ३७५ कृषी पर्यटन केंद्रे आहेत. सोलापूरसारख्या ऊस उत्पादक जिल्ह्यात पाच कृषी पर्यटन केंद्रे आहेत. या केंद्रांना परराज्यासह परदेशातील पर्यटकांनीही भेटी दिल्या आहेत. सेंद्रीय शेती, नैसर्गिक जीवन, विषमुक्त अन्न, देशी गाईचे महत्त्व, पर्यावरणपूरक वातावरण निर्मिती व शरीराला आनंद देणारे निसर्गरम्य वातावरण यामुळे या पर्यटन केंद्रांनी पर्यटकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. गेल्या तीन वर्षांत कृषी पर्यटन केंद्रांना आवर्जून भेट देणाºया हौशी पर्यटकांमध्ये वाढ झाली आहे. सुमारे ७० लाख पर्यटकांनी खास पर्यटन केंद्रांना भेटी दिल्या असून त्यामधून शेतकºयांना चांगले चार कोटीपर्यंत उत्पन्न मिळाले आहे.
शेती टिकवणे, ती फायद्यात आणणे आणि शेतकºयांना चांगला मोबदला मिळवून देणे यासाठी कृषी पर्यटन हा चांगला पर्याय आहे. नोकरीच्या शोधात असलेला सुशिक्षित तरुण कृषी पर्यटनामुळे स्वत:च्या पायावर उभा राहू शकतो. पण सरकारने याबाबत अजूनही गांभीर्याने विचार केलेला दिसत नाही. शेतकºयांना शेतीदराने वीज दिली जाते; मात्र कृषी पर्यटन केंद्रांना व्यावसायिक दराने वीजपुरवठा केला जातो, असा अनुभव सोलापूरच्या वानप्रस्थ कृषी पर्यटन केंद्राच्या संचालिका व मार्टच्या संचालक सोनाली जाधव यांचा अनुभव आहे. मार्टने पाच वर्षांपूर्वी सरकारकडे याबाबतचा प्रस्ताव दिला असून सरकारने अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही. नाबार्डची मदत, सहलींसाठी प्राधान्य यापलीकडे सरकारने कृषी पर्यटनासाठी पूरक असे ठोस धोरण तयार केलेले नाही. कृषी पर्यटनातून रोजगार निर्मितीला प्रचंड वाव आहे.

Web Title: Due to farm tourism too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी