शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

डकवर्थ लुईसचे नियम आणि क्रिकेटचा खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 04:41 IST

भारत-न्यूझीलंड क्रिकेट सामन्यात सर्वात जास्त चर्चा झाली असेल, तर ती मोकाट सुटलेल्या डकवर्थ लुईस नियमांची!

- संतोष देसाईभारत-न्यूझीलंड क्रिकेट सामन्यात सर्वात जास्त चर्चा झाली असेल, तर ती मोकाट सुटलेल्या डकवर्थ लुईस नियमांची! हा खेळ पहिल्या दिवशी सुरू राहिला असता, तर या नियमांचा वापर करावा लागला असता, पण हे नियम भारतासाठी हानिकारक ठरणारे होते. त्यामुळे लाखो भारतीय प्रेक्षकांना निराशादर्शक उसासे सोडावे लागले असते.पावसाने पहिल्या दिवसाचा खेळ धुऊन काढला नसता, तर काय झाले असते? त्या दिवशी २० षटकांचा खेळ गृहीत धरला असता, तर न्यूझीलंडने तेवढ्या षटकांत जितक्या धावा काढल्या होत्या, त्याहून दुप्पट धावा भारतीय संघाला काढाव्या लागल्या असत्या. जर हा खेळ ४६ षटकांचा झाला असता आणि त्यात २० षटके खेळणे शक्य झाले असते, तर हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला ७० धावा काढणे पुरेसे ठरले असते. डकवर्थ लुईसच्या प्रत्येक नियमांमागे काही ना काही तर्क आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. जर सुरुवातीलाच हा सामना २० षटकांचा घोषित झाला असता, तर न्यूझीलंडने आपली धावांची गती वाढविली असती. प्रत्यक्षात काय घडले असते, याचा अंदाज बांधणे कठीण असल्याने जटिल अ‍ॅल्गोरिथमचा वापर करून अंदाज करण्यात आला. तेवढ्याच षटकांतील धावांचे टार्गेट बदलू शकते (१४८ विरुद्ध ७० किंवा तत्सम). आपल्याला किती षटके खेळायची आहेत हे समजले, तर त्यानुसार धावांचा पाठलाग करता येतो.

क्रिकेट हा खेळच अनेक जर-तरचा आहे. सामन्याची दिशा कशी राहील हे निश्चित करण्याचे काम खेळपट्टी करीत असते. खेळपट्टीचे स्वरूप बदलते असते. म्हणजे खेळ सुरू असतानाच मध्येच खेळपट्टीचे रूप पालटू शकते. ती कोरडी होते, खराब होते, दमट होते आणि या प्रत्येक स्थितीने सामन्याचे रूप पालटत असते. हवामानाचा परिणाम जसा सामन्यावर होत असतो, तसेच वाऱ्याची दिशासुद्धा सामन्यावर परिणाम करीत असते. चेंडू किती जुना आहे, यावर त्याचे उसळणे अवलंबून असते. टॉस हासुद्धा सामन्यावर प्रभाव गाजवत असतो. तेव्हा दोन्ही चमू समान परिस्थितीत खेळत असतात, हे म्हणणे तितकेसे खरे नसते!या खेळात अनेक जर-तरचा सामना करावा लागत असल्याने, डकवर्थ लुईसच्या नियमांना त्याचा फटका बसणे स्वाभाविक आहे. या सामन्यात या जर-तरचे प्रमाण दोन आकड्यांपुरते मर्यादित होते- एक किती षटके टाकणे शिल्लक राहिले आहे आणि दोन किती विकेट हातात आहेत. त्याच आधारावर दोन्ही चमूंसाठी नवीन टार्गेट ठरविले जाणार होते. त्याहून एखादा चांगला मार्ग असू शकतो आणि उद्या कदाचित कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अनेक मार्ग शोधले जाऊ शकतात़, पण त्यामुळे एकूण व्यवस्था अधिक भ्रममूलक होण्याची शक्यता आहे. कारण ज्या गोष्टीसाठी मार्ग काढण्याचे काम करायचे आहे, तीच मुळात जटिल आहे!सर्व परिस्थिती ही निसर्गावर अवलंबून असते आणि ती एकसारखी असू शकत नाही. क्रिकेट हा खेळ मुळातच गुंतागुंतीचा असल्याने, ही बाब सहज समजण्यासारखी आहे, पण ही गोष्ट सगळ्या खेळांनाच नव्हे, तर जीवनालासुद्धा लागू पडते. एखादे वेळी एकाच सामन्यात सूर्य कधी ढगामागून बाहेर येत सर्वत्र प्रकाश पसरवतो, त्यावेळी देवदूत स्वर्गीय संगीत गात असल्याचा अनुभव येतो. टेनिसचा चेंडू रॅकेटवर वेगळ्या कोनातून येत धडकतो आणि तो पास करण्याच्या कौशल्याने खेळाचा शेवट वेगळाच झाल्याचे पाहायला मिळते. कधी-कधी खेळाडू उच्च दर्जाचा खेळ खेळतात, तर कधी-कधी खेळताना एकदमच अडखळतात. त्यांचं शरीर आखडतं, बुद्धी काम करेनाशी होते आणि मन बथ्थड होऊन जातं.क्रिकेटमध्ये आपण जर टॉस आणि खेळाडूंना होणाºया जखमांचा स्वीकार करीत असू, तर मग डकवर्थ लुईस नियमही का स्वीकारू नयेत? प्रत्येक चमूला जर नवीन बंधने स्वीकारण्याच्या समान संधी मिळत असतील, तर मग आपल्याला तक्रार करायला जागाच उरत नाही.
खेळांमधून आपल्यातील सर्वोत्तमाचा शोध घेतला जातो, असे मानले जाते. तेथे प्रत्येक व्यक्ती ही सर्वांसमोर स्वत:ला अधिक मोकळं करण्याचा प्रयत्न करीत असते, पण जर निसर्गाचे सामर्थ्य दर्शविणारे, काळाची क्षमता दाखविणारे आणि मानवी आकांक्षांच्या आणि क्षमतांच्या मर्यादा दाखविणारे ते व्यासपीठ आहे असे समजले तर? कोणताही खेळ आपल्याला गुंतवून ठेवतो, कारण त्यात आपण अपेक्षित असतो, तसे घडतेच असे नसते, तसेच जे बलवान असतात, तेच नेहमी विजयी होतात, असेही घडत नाही. खेळाडू आपल्याला चकित करीत असतात, पण कधी-कधी तेही स्वत:च चकित होत असतात!(ज्येष्ठ विश्लेषक)