शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

पिकांसोबत खेड्यांनीही टाकल्या माना; देशोधडीच्या वाटेवर मराठवाडा

By सुधीर महाजन | Published: October 27, 2018 12:13 PM

मराठवाड्यात केवळ पाण्याचा प्रश्न नाही. दिवाळीपूर्वीच एवढी दाहकता वाढली की, ग्रामीण भागातून पोट भरण्यासाठी आता स्थलांतर सुरू झाले आहे.

दुष्काळामुळे पिकांनी माना टाकल्याचे माहीत होते; परंतु खेडीपण माना टाकतात, हे नव्यानेच पुढे आले. रणरणते ऊन तेही आॅक्टोबरमध्ये. विहिरींनी तळ गाठला नाही तर त्या कोरड्याठाक. नदीनाले कोरडे. वातावरणात एक कायमस्वरूपी उदासीनता भरून राहिलेली. पारांवर, कट्ट्यांवर, मंदिरांच्या पडव्यांमध्ये लोक बसलेले; पण कुणाच्याही चेहऱ्यावर चैतन्य नाही की, आलेला दिवस ढकलण्यासारखे आयुष्य आहे. 

मराठवाड्यात केवळ पाण्याचा प्रश्न नाही. दिवाळीपूर्वीच एवढी दाहकता वाढली की, ग्रामीण भागातून पोट भरण्यासाठी आता स्थलांतर सुरू झाले आहे. सोयगाव आणि गंगापूर या तालुक्यांतील जगरू तांडा आणि बोलठाण या दोन गावांची उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत. आता या खेड्यांमध्ये वृद्धांशिवाय कुणी नाही. सगळेच काम शोधण्यासाठी बाहेर पडले. पोट भरणे हा एकमेव उद्देश. आज ते गावातून उखडले गेले. त्यापैकी किती परत येणार, हा खरा प्रश्न आहे. प्रत्येक दुष्काळाने अशी पिढीच्या पिढी आपल्या मातीपासून परागंदा केली आहे.

दुष्काळाची अशी दाहकता असताना सरकार आणि प्रशासन आकडेवारीचे निकष घासत बसले आहेत. मराठवाड्यातील सर्व धरणांमध्ये आता केवळ २३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. आॅक्टोबरमध्ये जवळपास ३ हजार खेडी दुष्काळग्रस्त आहेत. २७ तालुक्यांत ही अवस्था. हे २७ जात्यात, तर आणखी १४ तालुके सुपात आहेत. दिवाळीनंतर तेथेही पाणी नसणार. रोजगार तर आजच नाही. दिवाळीची आशा मावळली आहे. असे म्हणण्यापेक्षा शेतकरी-शेतमजुरांची दिवाळी करपली आहे. सरकार दुष्काळ जाहीर करण्याची घोषणा करते. ३१ आॅक्टोबरचा मुहूर्त असला तरी त्यादिवशी काहीही होणार नाही. सरकार म्हणते दुष्काळसदृश स्थिती आहे, म्हणजे नेमके काय आहे. खरे तर दुष्काळ आहे की नाही, अशा दोन शब्दांतच स्पष्टता पाहिजे. आता दुष्काळ आहे; पण दुष्काळ नाही, असा शब्दच्छल चालू आहे. या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याचा हा खेळ तसा जुना झाला; पण सरकार व प्रशासन दोघेही तो खेळण्यात रमले आहेत.

दुष्काळ जाहीर करण्यासाठी निकष काय? लोक देशोधडीला लागण्यास सुरुवात झाली, पेरलेले हाती काहीच पडले नाही, हाताला काम नाही, जनावरे मातीमोल किमतीत कोणी घ्यायला तयार नाही, चारा नाही, पाणी नाही, अशी परिस्थिती दुष्काळसदृश कशी असू शकते. सरकार ३१ आॅक्टोबरपर्यंत नजर आणेवारी घेणार, त्यानंतर कापणीचा अहवाल आणि त्यानंतर प्रत्यक्ष पीक उत्पादनाचा अहवाल. त्यानंतर गेल्या १0 वर्षांतील शेतमालाचे उत्पादन आणि त्यांची सध्याच्या परिस्थितीची सरासरी, असे निकष ओलांडत दुष्काळ जाहीर होतो. या अंदाजांना खरे तर कोणताही शास्त्रीय आधार नाही. तरी सरकार म्हणते महिनाअखेर दुषकाळाची घोषणा करणार.

लोकांच्या हाताला काम नाही आणि लोक काम मागत नाहीत. सरकारही रोजगार हमीची कामे देत नाही. मराठवाड्यात उडीद, मुगाचे पीक गेले. याचे उत्पादन हेक्टरी ५३३ किलो व्हायला पाहिजे; पण यात ६२ टक्के घट झाली म्हणजे शास्त्रीय भाषेत उणे उत्पादन. झालेला खर्चही भरून निघाला नाही. कडधान्याचा भाग हा विदर्भ आणि मराठवाडा; पण येथे यावर्षी पिकलेच नाही. याचा अर्थ भाव वाढणार, महागाई वाढणार, सरकारचे मंत्रीसुद्धा त्यांना वाढलेल्या घोषणा करतात. चारा नाही म्हटल्यानंतर अर्जुन खोतकरांनी थेट आॅस्ट्रेलियातून चारा आणण्याच्या बाता मारल्या. ठीक आहे, तर मग पाणी कोठून आणणार? या प्रश्नाचेही उत्तर तयार असेल. व्यावहारिक पातळीवर बोलले नाही की, सार्वजनिक हसे होते, ते खोतकरांचे झाले.

दुष्काळ नवा नाही; पण आजवरच्या दुष्काळापेक्षा भीषण आहे. हा दुष्काळ ग्रामीण भागाची सामाजिक घडी उस्कटून टाकणार. खेडी ओस पडणार. ज्यावेळी जगण्याचा लढा तीव्र होतो, अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा नात्यातला ओलावा आटतो. आता विहिरी आटल्या आणि त्याबरोबर परस्पर प्रेम, माया, आपुलकीला ओहोटी लागत आहे. माणूस मोडून पडणार आहे. तो पुन्हा उभा राहील का?

- सुधीर महाजन

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाWaterपाणीagricultureशेती