शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
3
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
4
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
5
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
6
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
7
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
8
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
9
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
10
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
11
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
12
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
13
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
14
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
15
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
16
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
17
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
18
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
19
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
20
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!

तुम्हाला माहीत आहे का, चहात दूध घालायची आयडिया कुणाची? नाही, तर जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 10:17 IST

चहा चीनमधून आला वगैरे माहिती सगळ्यांनाच असते. पण तिकडे त्यात दूध नाही घालत. मग चहात दूध घालायची ही आयडिया कुणाची? 

अस्सल चहाबाज दुधाशिवायच्या चहाकडे उपेक्षेनेच पाहतो. ब्लॅक टी, ग्रीन टी प्यायची फॅशन हल्लीहल्लीची हो, दूध-साखर घातल्याशिवाय का कुणी चहा पितं? चहा चीनमधून आला वगैरे माहिती सगळ्यांनाच असते. पण तिकडे त्यात दूध नाही घालत. मग चहात दूध घालायची ही आयडिया कुणाची?  (whose idea is to add milk in to tea?)सतराव्या शतकातला ब्रिटिश युवराज चार्ल्स दुसरा याचं लग्न झालं पोर्तुगालची राजकन्या कॅथरीन ऑफ ब्रॅगांझा हिच्याशी. या लग्नाचा हुंडा आपल्या दृष्टीने फारच महत्त्वाचा. एक तर भारतातलं बॉम्बे नावाचं दलदलीनं भरलेलं बेट पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना हुंड्यात दिलं. शिवाय लग्नातल्या भेटवस्तूंमध्ये ब्रिटिश राजघराण्याला मिळाली एका अनोख्या, अमूल्य पदार्थाने भरलेली पेटी. चहापत्ती.उभ्या इंग्लंडमध्ये त्यापूर्वी कुणी चहाचं नावसुद्धा ऐकलं नव्हतं, पिण्याची गोष्टच सोडा. नववधू कॅथरीन मात्र भलतीच चहावेडी होती. हळूहळू तिने उच्चभ्रू वर्तुळाला चहाची आवड लावली. तो कोराच असे. युरोपात सर्व आर्थिक वर्गातले लोक चहाने खुळावले. पण तो महाग होता त्या काळात. त्यात काहीतरी भरीला घालावं म्हणून पॅरिसमधल्या पार्टी-लव्हिंग वर्गाने मलईदार दूध (ते स्वस्त होतं) घातलं. युरोपियन व्यापाऱ्यांनी तिबेटमधल्या लोकांना चहात लोणी मिसळून पिताना पाहिलं होतं. त्यावरून ही कल्पना स्फूरली म्हणे. आणखीही मजेदार कहाण्या आहेत. कधी चहाचा द्राव कडवट झाला म्हणून सौम्य करण्यासाठी; कधी निकृष्ट दर्जाच्या चहापत्तीचा उग्र स्वाद लपवण्यासाठी दुधाचा वापर झाला; चहाचे कप महागड्या पोर्सिलेनचे असत, त्यात उकळता चहा ओतला तर कप फुटायची भीती, म्हणून आधी कोमट दूध ओतून तापमान आटोक्यात आणलं जाई.. असे एक ना अनेक तर्क. एक कारणमीमांसा तर अजब आहे. इंग्लंडमधल्या कामगारवर्गाला दुपारची चहाची सुट्टी असे. कोरा, कडकडीत चहा दिला तर माणसं हळूहळू घुटके घेत वेळ काढत बसत. पण दूध मिसळून किंचित निवलेला चहा दिला तर एका दमात तो संपवून आपापल्या कामावर हजर होत. वेळ वाचावा म्हणून मालकवर्गाने लढवलेली शक्कल. असो. कोणत्याही कारणाने का होईना, चहात दूध घालण्याची प्रथा युरोपात स्थिरावली आणि इकडे आपल्याला एक पावरबाज पेय मिळालं एवढं खरं.

- मेघना सामंत, (लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)askwhy.meghana@gmail.com 

टॅग्स :milkदूधchinaचीन