शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

कायद्यातील पळवाटा काढू नका!

By राजा माने | Updated: October 13, 2017 07:24 IST

सोलापूर शहराची ओळख टेक्स्टाईल हब म्हणून जगभर आहे. जुनी मिल, लक्ष्मी-विष्णू, नरसिंग गिरजी या मोठमोठ्या कापड गिरण्यांमुळे महाराष्ट्राचे मँचेस्टर समजल्या जाणा-या या शहरात आज केवळ टेक्स्टाईलचा उद्योग राहिला आहे.

सोलापूर शहराची ओळख टेक्स्टाईल हब म्हणून जगभर आहे. जुनी मिल, लक्ष्मी-विष्णू, नरसिंग गिरजी या मोठमोठ्या कापड गिरण्यांमुळे महाराष्ट्राचे मँचेस्टर समजल्या जाणा-या या शहरात आज केवळ टेक्स्टाईलचा उद्योग राहिला आहे. वर्षाला १५०० कोटी रुपयांची उलाढाल असणा-या या व्यवसायात चादर, टॉवेलचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. युरोप, अमेरिकेसारख्या विकसित देशात या उत्पादनाची निर्यात होते. अनेक वर्षे सुरळीत चाललेला हा व्यवसाय अचानक चर्चेत आला तो ३१ जुलै रोजी भविष्य निर्वाह निधी आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे यांच्या आदेशाने. सोलापुरात १४ हजार यंत्रमाग आहेत. या सर्व कारखान्यात ४० हजारांपेक्षा अधिक कामगार काम करतात. या सर्वांना ‘ईपीएफ’ लागू करण्याचा आदेश काढण्यात आला.या निर्णयाच्या विरोधात कारखानदारांनी ६ आॅगस्ट रोजी एक दिवस लाक्षणिक बंद केला. यानंतर १७ ते २१ आॅगस्ट असा पाच दिवस आणि आता ७ आॅक्टोबरपासून बेमुदत कारखाने बंद ठेवण्यात आले आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर पुकारलेला हा बंद म्हणजे कामगारांच्या पोटावर पाय ठेवून त्यांचे जीवन उद्ध्वस्त करणारा आहे. कोणत्याही उद्योगाची भरभराट जेव्हा मालक आणि कामगार एकमेकांचे हित पाहतात, तेव्हाच होत असते. हे संबंध एकदा बिघडले की, चढणारा आलेख खाली यायला वेळ लागत नाही. यापूर्वी सोलापुरातील बड्या कापड गिरण्या अशाच पद्धतीने बंद पडलेल्या आहेत, याची जाणीव यंत्रमागधारकांनी ठेवली पाहिजे. सोलापूर हे कामगारांचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रसंगी आपल्या ताटातली अर्धी भाकरी देऊन श्रमकºयांना जगवण्याची परंपरा येथे निर्माण होऊन रुजली. यंत्रमागधारक कारखानदारांनी अशीच भूमिका ठेवून गरीब, कष्टकºयांच्या पोटाला न मारता त्यांच्या हक्काचा न्याय त्यांना द्यायला हवा.राज्यात भिवंडी, इचलकरंजी, मालेगावला हा उद्योग मोठ्या प्रमाणावर आहे. हा नियम केवळ सोलापूरलाच का, असा प्रश्न स्थानिक कारखानदारांना पडलेला आहे. १९५२ च्या लेबर अ‍ॅक्टनुसार हा कायदा सर्वांनाच लागू होणार आहे. याची सुरुवात सोलापूरपासून झाली तर एक नवा ‘पॅटर्न’ निर्माण होईल. अधिकारी आणि कामगार संघटनांनीही केवळ विरोधासाठी विरोध न करता हजारो कामगारांची रोजीरोटी त्यांना पुन्हा कशी मिळेल, याविषयी प्रयत्न करायला हवेत. किती वर्षांपासून ईपीएफ वसूल करायचा यापेक्षा तो अधिकाधिक कारखानदार लागू कसा करतील, याकडे भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अधिकाºयांनी अधिक लक्ष द्यायला हवे. सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांच्या रूपाने सोलापूरला वस्त्रोद्योग आणि कामगार राज्यमंत्रिपद लाभलेले असताना ईपीएफसारख्या छोट्या मुद्यावर कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणारा हा उद्योग बेमुदत बंद राहावा, ही बाब आपल्यासाठी नक्कीच भूषणावह नाही. या निर्णयामुळे दिवाळीच्या तोंडावर हजारो कामगारांची उपासमार होत आहे. आज त्यांच्या भावनांचा आपण विचार केला नाही तर उद्याचा काळ काय घेऊन येईल, हे सांगता येणार नाही. कायद्यातील पळवाटा काढण्याची परंपरा जुनीच आहे. या परंपरेला छेद देऊन कामगारांची ही न्याय्य भूमिका यंत्रमागधारकांनी मान्य करावी, एवढीच अपेक्षा.raja.mane@lokmat.com  

टॅग्स :Solapurसोलापूर