शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

हिंदुस्तानला द्वेषाचा आखाडा बनवू नका

By विजय दर्डा | Updated: December 4, 2017 01:32 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वतंत्र भारतात आज आपण बघतोय अशाच राजकारणाची कल्पना केली होती काय? कालपरत्वे भारतीय राजकारण जाती आणि धर्मात गुरफटेल आणि संपूर्ण समाजाला त्यात गुंतवेल

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वतंत्र भारतात आज आपण बघतोय अशाच राजकारणाची कल्पना केली होती काय? कालपरत्वे भारतीय राजकारण जाती आणि धर्मात गुरफटेल आणि संपूर्ण समाजाला त्यात गुंतवेल असा विचारही पं. जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि इतर वरिष्ठ नेतृत्वाने कधी केला असेल का? निश्चितच त्यांनी कधीच याची कल्पना केली नसेल. त्यांनी तर एका अशा हिंदुस्तानचे स्वप्न बघितले असणार जेथे माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म असेल. जाती आणि धर्म ही प्रत्येकाच्या जीवनातील खासगी बाब असावी, त्याने समाज प्रभावित होऊ नये. परंतु दुर्दैवाने आज नेमके हेच घडतेय. आता तर एकमेकांविरुद्ध द्वेषाचे अशाप्रकारे बीजारोपण होत आहे की येणारा काळ किती भयावह असेल याचे चित्र स्पष्ट दृष्टीस पडते.मी स्वत: एका राजकीय कुटुंबातून आलो आहे. १८ वर्षे संसदीय राजकारणाचा हिस्सा राहिलो आहे. परंतु आज जी परिस्थिती आहे त्यासाठी मी थेट राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनाच दोष देतो. मी वृत्तपत्राशीही जुळलेला असून फार सूक्ष्मपणे परिस्थितीचे आकलन करतो. मी जे अनुभवतो ते आपणासही जाणवत असेल; निवडणुका असल्या की वातावरण तापायला लागते. प्रारंभ विकासापासून होतो पण मग केव्हा तरी त्याला जाती आणि धर्माचे वळण लागते. एखाद्या उमेदवाराची पार्श्वभूमी काय आहे अथवा विकासासाठी कुणाच्या काय योजना आहेत, यावर तर चर्चासुद्धा होत नाही. उलट ती व्यक्ती कुठल्या पक्षाची, धर्माची आणि जातीची आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. एवढेच नाही तर राजकीय पक्षांकडूनही बहुतांश अशाच लोकांना तिकीट दिले जाते ज्यांच्यात जाती आणि धर्माच्या नावावर मते मिळविण्याची ताकद असते वा पैशाच्या बळावर मते आपल्या पारड्यात टाकून घेण्याची शक्ती असते. सर्व जाती आणि धर्म समान मानणाºया कुणा समाजसेवकाला तिकीट मिळाल्याचे आपण कधी बघितले आहे का? आणि अशा व्यक्तीला तिकीट मिळालेही तरी तो जिंकू शकत नाही, कारण राजकारणात ध्रुवीकरण हे सर्वात मोठे आयुध बनले आहे.दुर्दैव हे की या ध्रुवीकरणाचा आमच्या समाजावर काय परिणाम होत आहे याचा विचारही आमचे राजकीय पुढारी करीत नाहीत. उघडपणे भलेही लोक हे स्वीकारणार नाहीत, परंतु वस्तुस्थिती ही आहे की आमचा समाज जाती आणि धर्माच्या नावावर पूर्वीपेक्षा जास्त विघटित होत चाललाय. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाºया नेत्यांना अशी आशा वाटली असेल की काळासोबत जातीप्रथा कमकुवत होईल आणि धर्मांधता संपेल. परंतु राजकारणानेच अपेक्षांचे फासे उलटे फेकले. आज राजकारणात जातीचा बोलबाला आहे अन् धार्मिक कट्टरवाद तर शिगेला पोहचला आहे.मी कुणा एकाला दोष देत नाही. माझ्या दृष्टीने राजकारणातील प्रत्येक पक्ष यास जबाबदार आहे. गुजरात निवडणुकीतच बघा! तेथे या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. लोकमत समूहाच्या आमच्या प्रतिनिधींनी गुजरातचा दौरा करून तेथील वास्तव उघड केले आहे. विकासाचा मुद्दा भरकटून धर्मांधतेच्या बाजूने झुकला आहे. गुजरातमध्ये सोशल मीडियावर जे संदेश सध्या फिरत आहेत त्यांचा उल्लेखही येथे करता येणार नाही, कारण ते संदेश विद्वेष पसरविणारे आहेत. राजकीय नेत्यांना या संदेशांबाबत माहिती नसेल काय? सर्वांना माहीत आहे परंतु ते थांबविण्याचा कुठलाही प्रयत्न झालेला नाही. उलट राजकीय पुढारी तर एकमेकांवर अशाप्रकारे चिखलफेक करीत आहेत की समोरच्याच्या अब्रूचे धिंडवडे निघावेत.भारतीय राजकारणाचे अशाप्रकारे कलुषित होणे देशासाठी चिंताजनक आहे. पुढारी तर येत-जात राहतील. पक्षही बदलत राहतील. परंतु लोकशाही खिळखिळी होईल. नेत्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, निवडणूक काळात ते जो द्वेष पसरवितात त्यामुळे भविष्यात देशाची प्रतिमा पार बिघडेल. राजकारण्यांनी हे लक्षात घ्यावे की हा देश कुठल्या एका वर्गाचा, धर्माचा अथवा जातीचा कधीही नव्हता आणि राहणारही नाही. सर्वांनी आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवत हे समजून घ्यावे की, हा देश हिंदू असो वा मुस्लीम, शीख असो अथवा जैन, बौद्ध किंवा ईसाई सर्वांचा आहे. संख्या कमी-अधिक असू शकते, पण सर्वांचे अधिकार समान आहेत. कुणालाही कमी लेखता येणार नाही. खरे तर या विविधतेतच आपले सामर्थ्य आहे. एकमेकांप्रति सद्भाव आणि स्नेह बाळगून तसेच मिळूनमिसळून राहण्यानेच आमचा समाज समृद्ध होईल. समाज कमकुवत असला तर देशही कमजोर होईल. राजकीय नेत्यांना माझे एकच सांगणे आहे, हिंदुस्तानला द्वेषाचा आखाडा बनवू नका...! धर्मनिरपेक्षता हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे. ती कदापि निष्प्रभ होऊ नये. विशेषत: नव्या पिढीपुढे आमची सर्वात मोठी संपदा असलेली धर्मनिरपेक्षता कशी सुरक्षित ठेवायची, हे मोठे आव्हान आहे.हे लिखाण संपविण्यापूर्वी...नॅशनल क्राईम ब्युरोचा ताजा अहवाल अत्यंत चिंताजनक आहे. देशात बलात्काराच्या घटनांमध्ये १२.४ टक्के अशी लज्जास्पद वाढ झाली आहे. तीन मोठे राज्य मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्टÑ अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. आमच्या समाजाला झालेय तरी काय? हेच मला कळत नाही. बलात्काराच्या घटना एवढ्या का वाढताहेत? आमचे संस्कार संपत चाललेत काय? हा गंभीर मुद्दा आहे. कायदा तर अधिक कठोर व्हायलाच हवा. पण समाजालाही सकारात्मक पुढाकार घ्यावा लागेल.