शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कोठडीमृत्यू थांबवून ‘सब का सन्मान’ही करा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 5:32 AM

संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केल्यानुसार दरवर्षी २६ जून हा दिवस कोठडीत छळ झालेल्यांना पाठिंबा देण्याचा जागतिक दिवस म्हणून पाळला जातो.

- अश्विनी कुमार(माजी केंद्रीय कायदामंत्री)संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केल्यानुसार दरवर्षी २६ जून हा दिवस कोठडीत छळ झालेल्यांना पाठिंबा देण्याचा जागतिक दिवस म्हणून पाळला जातो. ज्यांनी असा अनन्वित छळ सोसला त्यांचे स्मरण करण्याचा आणि माणुसकीस काळिमा फासणाऱ्या या अमानुषतेविरुद्ध सामूहिक चेतना ठामपणे व्यक्त करण्याचा हा दिवस. धर्मग्रंथाचा अपमान केल्याचा आरोप असलेल्या पंजाबमधील एका व्यक्तीचा अलीकडेच पोलिसांनी कोठडीत केलेल्या छळामुळे झालेला मृत्यू व गुजरातमध्ये झालेल्या अशाच एका कोठडीतील मृत्यूबद्दल एका वरिष्ठ निवृत्त पोलीस अधिका-यास झालेली जन्मठेप यामुळे भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत अशा घटना कशा सहन केल्या जाऊ शकतात हा देशभर चर्चेचा विषय झाला आहे.मानवी प्रतिष्ठा आणि त्या अनुषंगाने येणारे मूलभूत हक्क यांना सर्वच प्रकारच्या शासनव्यवस्थांमध्ये जगभर स्वीकारण्यात आले आहे. भारतात सर्वोच्च न्यायालयाने सन्मानाने जगणे याचा जगण्याच्या मूलभूत हक्कात अंतर्भाव केला आहे. एवढेच नव्हे तर सर्व मूलभूत हक्कांमध्ये त्याला सर्वात वरचे व अभेद्य स्थान दिले आहे. सन १९९७ चे डी. के. बसू ते सन २०१६ चे एम. नागराज अशा अनेक प्रकरणांमध्ये याचे सविस्तर विवेचन केले आहे. न्यायालयाच्या मते छळ हा मानवी प्रतिष्ठेवर उघड घाला आहे. त्यामुळे छळ झालेल्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व उद््ध्वस्त होते. मानवी प्रतिष्ठेच्या अशा पायमल्लीने संस्कृतीला बट्टा लागतो. अशा प्रत्येक छळाच्या घटनेने मानवतेचा ध्वज अर्ध्यावर फडकतो...वर्ड््सवर्थने त्याच्या काव्यात व्यक्त केलेल्या छळाच्या व्यथाच न्यायालयीन निकालांमध्ये प्रतिबिंबित झाल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीला स्वत:ची प्रतिष्ठा असते व व्यक्ती कोण आहे, यावर ती अवलंबून नसते. ही मूलभूत मानवी प्रतिष्ठा कोणतेही शासन हिरावून घेऊ शकत नाही. कान्टेच्या तत्त्वज्ञानातही मानवी मूल्यांना सर्वोच्च स्थान आहे.भारतात शासनव्यवस्थेची कार्यपालिका व विधायिका ही दोन्ही अंगे मानवी हक्कांशी बांधिलकीच्या आणाभाका घेत असली तरी कोठडीत होणाºया मृत्यूंना पायबंद करण्याच्या बाबतीत त्यांनी आपले कर्तव्य पूर्णांशाने पार पाडलेले नाही. छळाला प्रतिबंध करण्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचे जागतिक घोषणापत्र भारताने १९९७ मध्येच स्वीकारले असले तरी अद्याप हा स्वतंत्र गुन्हा म्हणून कायद्यात समाविष्ट केला गेलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाचे निकालही कागदावरच राहिले आहेत. राज्यसभेच्या निवड समितीने २०१० मध्ये, विधि आयोगाने २०१७ मध्ये शिफारस करूनही, मानवी हक्क आयोगाने याची निकड प्रतिपादित करूनही आणि राज्यघटनेचे तसे बंधन असूनही भारताने अद्याप या आंतरराष्ट्रीय वचनाची पूर्तता केलेली नाही. याबाबतीत भारताच्या पंक्तीला काही मोजके बदनाम देश आहेत. ‘एशियन सेंटर फॉर ह्युमन राइट््स’ने गेल्या वर्षी दिलेल्या अहवालानुसार १ एप्रिल २०१७ ते २८ फेब्रुवारी २०१८ या काळात भारतात १,६७४ मृत्यू कोठडीत झाले होते. यापैकी १,५३० मृत्यू न्यायालयीन तर १४४ पोलीस कोठडीतील होते. सरकारने याचे खंडनही केलेले नाही. प्रत्यक्षात हा आकडा याहूनही कितीतरी मोठा आहे, असे अनेकांचे मानणे आहे.यामुळे देशातून परागंदा झालेल्या गुन्हेगारांना, भारतात पाठविले तर आमचा तुरुंगात छळ होईल, असे म्हणून प्रत्यार्पणास विरोध करण्याची संधी मिळते. सरकारच्या प्रत्यार्पणाच्या अनेक विनंत्या अमान्य होण्यास ही संदिग्ध कायदेव्यवस्था जबाबदार आहे. जगात अधिक उदारमतवादी व्यवस्था निर्माण करण्याच्या कामी मोलाची भूमिका बजावण्याची आकांक्षा बाळगणाºया भारतासाठी ही भूषणावह गोष्ट नाही.आता मोदी सरकारने ‘सब का साथ, सब का विकास’ला ‘सब का विश्वास’ही जोडण्याची ग्वाही दिली आहे. ‘सब का विश्वास’ आणि ‘सब का सन्मान’ हे परस्पर पूरक असून एकमेकांचे अविभाज्य भाग आहेत. प्रचंड जनमताचे पाठबळ लाभलेले व राज्यघटनेशी पक्की बांधिलकी सांगणारे हे सरकार कोठडीतील मृत्यूंना प्रतिबंध करण्यासाठी परिणामकारक कायदा करण्यास सर्वोच्च प्राधान्य देईल, अशी आशा आहे.तसे झाले तर एक लोकशाही प्रजासत्ताक म्हणून स्वातंत्र्य आणि मानवी प्रतिष्ठा जपण्याचा आपण घेतलेला वसा पूर्ण करण्याचा दिशेने ते एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. अल्लामा इक्बाल यांच्या या अमर्त्य काव्यपंक्तीत हीच भावना चपखलपणे व्यक्त झाली आहे : ‘जब इश्क सिखाता है अदाब-ई-हुद अघाई, खुलते है गुलामोंपर असरार-ई- शहेनशाही. (जेव्हा एखाद्या गुलामालाही आत्मप्रतिष्ठेचा बोध होतो तेव्हा तोही शाही रुबाब दाखवू लागतो.)

टॅग्स :jailतुरुंग