शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

प्रबोधनाची ही परंपरा अशी नासवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 03:42 IST

नागपुरात सध्या कीर्तन महोत्सव सुरू आहे. हा महोत्सव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंडळींनी आयोजित केला असल्याने त्याच विचारांचे कीर्तनकार इथे अपेक्षित आणि इतर उपेक्षित राहणार आहेत. त्याबद्दल कुणाचा विरोधही नाही.

- गजानन जानभोरनागपुरात सध्या कीर्तन महोत्सव सुरू आहे. हा महोत्सव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंडळींनी आयोजित केला असल्याने त्याच विचारांचे कीर्तनकार इथे अपेक्षित आणि इतर उपेक्षित राहणार आहेत. त्याबद्दल कुणाचा विरोधही नाही. परंतु या महोत्सवात सहभागी होणाºया कीर्तनकारांचे श्रेष्ठत्व सांगताना विदर्भातील इतर कीर्तनकारांना नालायक ठरविण्याचा अश्लाघ्य प्रकार या महोत्सवाच्या आयोजकांकडून झाला असल्याने त्याची कठोर शब्दात दखल घेणे आणि पर्यायाने त्यांची लायकीही दाखवून देणे समाजहिताचे ठरते.या महोत्सवातील कीर्तनकारांना सामान्य जनता ओळखत नाही. संघपरिवाराच्या चौकटीपलीकडे त्यांना कुणी किंमत देत नाही. मग इथेच त्यांना का बोलावण्यात आले? पात्रता एकच, ते कट्टर हिंदुत्वाचे वाहक आहेत. इथे राष्टÑसंतांवर कीर्तन करणारे बुवा एरवी कुठे दिसत नाहीत. धर्माभिमान जागविणे आणि हिंदुत्वाचा प्रसार करणे एवढाच अंतस्थ हेतू अशा कीर्तन महोत्सवाच्या आयोजनामागे असतो. त्याबद्दलही आमचे काहीच दुखणे नाही. परंतु स्वत:ची थोरवी गाताना इतरांना तुच्छ लेखण्याची सडलेली मानसिकता समाजात अजूनही कायम आहे. गुणवत्ता असूनही केवळ जातीवरून लायकी ठरविणारे नवे भांडवलदार आता सर्वंच जातीत दिसतात. ते एकत्र येतात तेव्हा त्यांचा मेळावा किंवा महोत्सव होतो. हा कीर्तन महोत्सव त्यातीलच एक. या कीर्तन महोत्सवाच्या व्यासपीठावर सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज कधी दिसणार नाहीत. कारण ते उपेक्षित समाजाचे प्राक्तन मांडताना गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांच्या प्रबोधनाचा प्रवाह पुढे नेतात, ज्ञानेश्वर-तुकारामही सांगतात. पण त्यांचे विचार हिंदुत्ववाद्यांना पचनी पडणारे नसतात. संघप्रणीत कीर्तन महोत्सवात भागवत-पुराणाच्या महतीचे बोधामृत पाजले जातात. सत्यपाल असोत किंवा इंजिनियर भाऊ थुटे, संदीप पाल, तुषार पाल. या कीर्तनकारांची परंपरा परिवर्तनाची असल्याने त्यांना अशा ठिकाणी कधीच बोलावले जात नाही. पण लोकं आपल्यावर टीका करतील या भीतीने मग हे आयोजक मानधनाचे किंवा लायकी नसल्याचे कारण समोर करतात.या कीर्तन महोत्सवाच्या आयोजकांनी विदर्भातील कीर्तनकारांची लायकी ठरविताना केवळ त्यांनाच अपमानित केलेले नाही तर बहुजन संतांशी नाते सांगणाºया प्रबोधनाच्या परंपरेला बदनाम करण्याचा कुटील डावही त्यामागे आहे. राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेला ‘संडास साफ करणारी गीता’ असे संबोधणाºया निवृत्ती वक्ते या महाराजाला अशा व्यासपीठावर स्थान दिले जाते आणि महाराष्टÑ सरकार त्याला पुरस्कृतही करीत असते. तुकारामाच्या भूवैकुंठगमनाची भाकड कथा लिहिणारेही या मंडळींना हवे असतात. आपल्या कीर्तनातून विकृती पसरवायची आणि समाजमन नासवायचे एवढेच काम या बुवांचे असते. सत्यपाल महाराजांसारखे प्रबोधनकार धर्माची चिकित्सा करतात. देवाच्या नावावर खारका-बदामा खाणाºयांना झोडपून काढतात. परिवर्तनाचा हा क्रांतिकारी विचार आपली धर्मसत्ता धोक्यात आणू शकतो ही भीती अशा मंडळींना सतत वाटत असते. या धर्माभिमान्यांना आमचे एवढेच सांगणे आहे की, तुम्ही खुशाल तुमच्या व्यासपीठावर कुणालाही बोलवा, त्यांच्या आरत्या ओवाळा, त्यांचे बुरसटलेले विचार आत्मसात करा, तुमच्या परंपरेचा तो भागच आहे. पण विदर्भातील प्रबोधनाची ही परंपरा अशी नासवू नका.

टॅग्स :social workerसमाजसेवक