शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी एवढे करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 08:03 IST

या मुलांच्या शिक्षणासाठी सरकार उभारणार असलेली वसतिगृहे राजकीय कार्यकर्त्यांची नवी पुनर्वसन केंद्रे होऊ नयेत, हे पाहिले पाहिजे!

- हेरंब कुलकर्णी(शिक्षण चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते)

महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ४१ तालुक्यांत प्रत्येकी दोन वसतिगृहे उभारण्याचा राज्य सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. बीड जिल्ह्यात अशी १३ वसतिगृहे सुरू करून स्वयंसेवी संस्थांनी प्रयत्न केले होते. गावातील शाळेतच विद्यार्थ्यांनी मुक्कामाला राहायचे व  शालेय व्यवस्थापन समितीने त्यांच्या जेवणाची सोय करायची अशी हंगामी रचना होती. गावांमधील भांडणे, शिक्षकांवरचा अतिरिक्त ताण व शाळेच्या वर्गात असणारी राहण्याची गैरसोय, स्वच्छतागृह नसणे यामुळे विद्यार्थीही राहायला नाखूश असत व वर्गाच्या खोलीत मुलींना ठेवायला पालकही तयार नसत.

 जनार्थ, ज्ञानप्रबोधिनी व अनेक संस्था साखर कारखान्यावर साखर शाळा चालवत.  शिक्षण हक्क कायद्याने या साखर शाळाच बंद करून टाकल्या व जवळच्या शाळेत विद्यार्थ्यांना दाखल करावे, असा नियम केला. या साखर शाळेत मुलांना पाठवायला पालकही फार राजी नसत.  त्यामुळे कायमस्वरूपी वसतिगृह हाच उपाय होता. ही योजना यशस्वी होण्यासाठी काही सूचना कराव्याशा वाटतात. आश्रमशाळा ही गरीब आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एक कल्याणकारी योजना होती; परंतु ही योजना ठेकेदारीमुळे बदनाम झाली. नव्या व्यवस्थेत विद्यार्थ्यांना दर्जेदार जेवण कसे मिळेल, याची व्यवस्था गावातच करता येऊ शकेल. 

ही वसतिगृहे तालुक्यातील मोठ्या गावात असल्यामुळे जागरूक नागरिक, बचत गट, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, कार्यकर्ते, पत्रकार, मुख्याध्यापक यांच्या समित्या तयार करून रोज किमान काही व्यक्ती तेथे भेट देतील अशा प्रकारे उपाययोजना करायला हव्यात. तंत्रज्ञानाच्या काळात रोजच्या केलेल्या स्वयंपाकाचा व्हिडिओ वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवणे असेही बंधन टाकता येईल. अनेकदा अशा योजना राजकीय कार्यकर्त्यांना वाटल्या जातात. ते दडपण आणून योजनांची लूट करतात. तेव्हा ही वसतिगृहे राजकीय कार्यकर्त्यांचे पुनर्वसन केंद्र होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

या विद्यार्थ्यांना त्या वसतिगृहापासून रोज  शाळेपर्यंत नेणे कठीण असेल. त्यामुळे वसतिगृहाच्या बांधकामाची रचनाच अशी असावी की खालच्या मजल्यावर शाळेचे वर्ग असतील वर राहण्याची सुविधा असेल. ज्या शाळांमधील बहुतेक सर्व विद्यार्थी तिथे असतील अशा रिकाम्या पडलेल्या शाळांतील शिक्षकांची प्रतिनियुक्ती त्या शाळेत करून तिथेच शाळा सुरू ठेवायला हवी.

या योजनेचा लाभ त्या तालुक्यातील सर्वच स्थलांतरित मजुरांना व्हायला हवा. याचे कारण मराठवाड्यातून वीटभट्टीवर स्थलांतर करणाऱ्या मजुरांची संख्याही मोठी आहे. त्याचप्रमाणे बांधकाम मजूर म्हणून महाराष्ट्रात स्थलांतर करणारे मजूरही आहेत. उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील पारधी हे मुंबई किंवा मोठ्या शहरात सातत्याने स्थलांतर करीत असतात. तेव्हा योजना जरी ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी असली तरी इतर गरीब कुटुंबांतील स्थलांतर करणाऱ्या मजुरांच्या मुलांनाही याचा लाभ सरकारने द्यायला हवा. पालक आपल्या मुलांना या वसतिगृहात ठेवतील का? - हा एक कळीचा मुद्दा आहे.

वसतिगृहे सुरू  झाल्यानंतर  पालकांची मानसिकता बदलण्याचे आव्हान असणार आहे. यासाठी ऊस तोडणी कामगारांच्या संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांना महत्त्वाचे काम करावे लागेल. पण, त्याचबरोबर कायदेशीरदृष्ट्या ज्या तालुक्यात वसतिगृह आहे तेथील कामगारांनी जर आपली मुले सोबत आणली तर त्या मुकादमाला दंड करणे असे कठोर निर्बंध सहकार विभागाने लागू करावे लागतील. अन्यथा काही पालक  मुलांचा प्रवेश वसतिगृहात करायचा व नंतर मुलाला सोबत घेऊन जायचे असे करतील. त्यातून खोट्या हजेऱ्या व अनुदान लाटणे असे प्रकार वसतिगृहाच्या बाबतीत घडतील.

शासनाच्या चांगल्या योजनेचे  भ्रष्ट योजनेत रूपांतर होईल. तेव्हा कारखाना स्थळावर एकही मूल त्या तालुक्यातून येणार नाही अशी कठोर भूमिका सरकारला घ्यावी लागेल. या  योजनेच्या आश्रमशाळा होणार नाहीत, राजकीय कार्यकर्त्यांना ही वसतिगृहे वाटली जाणार नाहीत यासाठी सरकारने दक्ष असायला हवे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेEducationशिक्षण