अशांत नागपूर
By Admin | Updated: April 7, 2015 00:56 IST2015-04-07T00:56:52+5:302015-04-07T00:56:52+5:30
महाराष्ट्राची उपराजधानी सध्या अस्वस्थ आणि अशांत आहे. या शहरात रोज काही ना काही विपरीत घडते आहे. सामान्य नागपूरकर भयग्रस्त आहेत, पोलीस हतबल आहेत

अशांत नागपूर
गजानन जानभोर -
महाराष्ट्राची उपराजधानी सध्या अस्वस्थ आणि अशांत आहे. या शहरात रोज काही ना काही विपरीत घडते आहे. सामान्य नागपूरकर भयग्रस्त आहेत, पोलीस हतबल आहेत आणि ज्यांनी पाठीशी उभे राहावे ते येथील लोकप्रतिनिधी कुंभकर्णाचीही मान शरमेने खाली जाईल इतक्या गाढ झोपेत आहेत. या संत्रानगरीचे काय होईल, ही एकच चिंता नागपूरकरांना सतावत आहे. नागपुरात फिरताना सामान्य माणसाला सतत असुरक्षित वाटत असते. गुंड, बदमाश आता या शहरावर वर्चस्व मिळवतात की काय अशी भीती वाटावी एवढी भीषण परिस्थिती आहे.
तुमचा प्लॉट किंवा घर कुणीतरी बळकावण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही पोलिसांत तक्रार करायला गेलात तर घर बळकावणारा गुंड तुमच्या आधीच पोलीस ठाण्यात पोहचून ठाणेदारासोबत चहा पीत बसलेला असतो. एखाद्या वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून गुंड सहज निघून जातो. सकाळी ट्युशनला गेलेली मुलगी दुपारपर्यंत परत आली नाही तर आई-वडिलांच्या मनात कालवाकालव सुरू होते. दिवसा-ढवळ्या गुंड दुकानात घुसतात, व्यापाऱ्यावर गोळीबार करतात, पैसे लुटून घेऊन जातात. थोडक्यात काय, तर मुख्यमंत्र्यांच्या या शहरात (ते गृहमंत्रीही आहेत) पोलिसांचे नव्हे तर गुंडांचे राज्य आहे. पोलीस आपले काहीच बिघडवू शकत नाहीत, किंबहुना त्यांना आपण विकत घेतले आहे, अशी मिजास वाढल्याने कुख्यात गुन्हेगार तुरुंगातून शहराचा कारभार पाहतात आणि तेवढ्याच सराईतपणे तुरुंगातून पळूनही जातात. उपराजधानीचे हे अस्वस्थ वर्तमान आहे. मिहान, मेट्रोसिटीसाठी तोफेसारखे धडधडणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरकरांनी ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे की, एकवेळ नको ही मेट्रो अन् नको हे मिहान, पण आम्हाला सुखाने जगू द्या! स्मार्ट सिटीसाठी ‘तडतड’ करणाऱ्या या नेत्यांना आपल्या शहरातील नागरिक भयमुक्त आणि सुरक्षित असायला हवेत, असे वाटत नाही का? निष्क्रिय पोलीस आयुक्त आणि त्यांच्या भालदार-चोपदारांना फैलावर घेण्याची, त्यांना जाब विचारण्याची हिंमत त्यांच्यात का नाही? नागपूरचे पोलीस आयुक्त के. के. पाठक महाशय आपले कर्तव्य बजावत नाहीत तर ते ‘एन्जॉय’ करीत असतात. ज्या दिवशी पाच कुख्यात गुंड तुरुंग फोडून पळाले त्याच दिवशी रात्री हे पोलीस आयुक्त महामूर्ख संमेलनात टाळया वाजवत मनमुराद आनंद घेत होते. (या लेखातील छायाचित्रातून त्यांच्या ताणतणावमुक्त जीवनशैलीची छबी दिसून येईल) सामान्य पोलीस कर्मचारी फरार गुन्हेगारांचा गल्लोगल्लीत शोध घेत असताना त्यांचे हसमुख बॉस मात्र महामूर्ख संमेलनात रमलेले असतात! मग या महाशयांना ‘शहाणे’ तरी कसे म्हणावे? त्यांची तीच योग्यता असेल तर बिचारे नागपूरकर तरी काय करणार? पोलीस आयुक्तांचे इतर वरिष्ठ सहकारी गंगाजमुनातील नि:शस्त्र, असहाय्य आणि गरीब महिलांवर मर्दुमकी गाजवतात, त्यांना देशोधडीला लावतात आणि बदमाषांना मात्र अभय देतात, ही नागपूर पोलिसांची कर्तव्यपरायणता आहे.
या शहरातील गुन्हेगारी एका दिवसात वाढलेली नाही. इथल्या सर्वपक्षीय नेत्यांनी तिला वर्षानुवर्षांपासून खत आणि पाणी देण्याचे काम केले आहे. आजी-माजी नगरसेवकांची यादी जर तपासली तर सज्जनांची संख्या काळजीपूर्वक शोधावी लागेल, अशी परिस्थिती आहे. काँग्रेसचा विद्यमान नगरसेवक वॉर्डात तलवारी घेऊन फिरतो, लोकांवर हल्ले करतो आणि त्याचवेळी भाजपाचा दुसरा नगरसेवक पाण्यासाठी घरी आलेल्या महिलांवर हल्ला करतो. यातील गंभीर बाब ही की, हे दोन्ही पक्ष त्यांच्यावर कुठलीही कारवाई करीत नाहीत. अलीकडच्या विधानसभा निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्षांच्या प्रचारात हिरिरीने ज्यांनी पुढाकार घेतला त्यात कुख्यात गुन्हेगारांची संख्या किती होती, हे कटू सत्य साऱ्यांनाच ठाऊक आहे. या समाजविघातक विकृतींना असेच पाठबळ मिळत राहते आणि मग त्याचे पर्र्यवसान गँगवारमध्ये आणि नंतर तुरुंग फोडून पळून जाण्यात होते. विधानसभा निवडणुकीत स्थानिक भाजपा नेते नागपूरकरांना ‘स्वराज की गुंडाराज’? असा सवाल करुन काँग्रेस नेत्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करायचे. नियतीने आता त्यांच्यावरच सूड उगवायला सुरुवात केली आहे.