शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Pawar : 'आघाडीमध्ये संधी मिळाल्यास आमच्याकडे जयंत पाटलांसारखा अनुभवी चेहरा'; रोहित पवारांचं सूचक विधान
2
बांगलादेशची Super 8 च्या दिशेने कूच, नेदरलँड्सची हार अन् माजी विजेत्या श्रीलंकेचे संपले आव्हान
3
मोठी बातमी! टीम इंडियाचे दोन शिलेदार T20 World Cup सोडून मायदेशात परतणार
4
'दीड वर्षापूर्वी विमानतळाच्या कामासाठी आलो होतो, आता मंत्री होऊन आलो'; मुरलीधर मोहोळांनी सांगितला 'तो' किस्सा
5
राहुल गांधी रायबरेली की वायनाड सोडणार; दुसरा उमेदवार कोण? नाव आलं समोर
6
स्टार एअरची नागपूर-नांदेड विमानसेवा २७ पासून; सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार चार दिवस असणार
7
कुवैतमध्ये आगीत होरपळून 45 भारतीयांचा मृत्यू; मृतदेह आणण्यासाठी वायुसेनेचे विमान पोहोचले...
8
शाकिब अल हसन झळकला, वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला; नेदरलँड्ससमोर उभे केले तगडे लक्ष्य
9
दहशतवादावर पीएम मोदींचा प्रहार; 21 जून रोजी पंतप्रधान थेट जम्मू-काश्मीरला जाणार...
10
“रोहित पवारांना CM व्हायचे, पण जयंत पाटील करेक्ट कार्यक्रम करतील”; अजित पवार गटाचा दावा
11
बांगलादेशच्या फलंदाजाचा डोळा थोडक्यात वाचला; इगलब्रेचच्या अफलातून झेलने पॉवर प्ले गाजला
12
एकाच मोबाईलमध्ये २ सिम वापरणे महागणार, भरावे लागणार शुल्क; TRAI नियमात करणार बदल
13
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; POCSO प्रकरणात न्यायालयाचा निर्णय
14
Super 8 सोबतच ८ संघ T20 World Cup 2026 साठी पात्र ठरणार; मग पाकिस्तानचं काय होणार?
15
दोनदा घटस्फोट, जुळ्या मुलींची आई चाहत खन्ना पुन्हा प्रेमात? चार वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट
16
सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच; राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार
17
Fact Check : लोकसभेवर ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा खोटा
18
यानंतर उपोषण नाही, निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार: मनोज जरांगे
19
याला म्हणतात धमाका...! ₹७५ रुपयांचा शेअर दहाच महिन्यांत २३०० वर पोहोचला; गुंतवणूकदार मालामाल
20
सौरभ नेत्रावळकरच्या १० मिनिटांच्या मुलाखतीसाठी पत्रकारांनी अर्शदीपसोबत केलं असं काही... 

एलिफंट हनी बी प्रकल्प ठरतोय दिशादर्शक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 11:22 PM

कर्नाटक राज्यातून सिंधुदुर्गच्या हद्दीमध्ये प्रवेश करून गेली पंधरा वर्षे येथील शेती, बागायतीच्या नासधुसीपासून मनुष्यहानीपर्यंत पोहोचलेल्या जंगली हत्तींचा बंदोबस्त करण्याची पहिली पायरी यशस्वी ठरली आहे.

- महेश सरनाईककर्नाटक राज्यातून सिंधुदुर्गच्या हद्दीमध्ये प्रवेश करून गेली पंधरा वर्षे येथील शेती, बागायतीच्या नासधुसीपासून मनुष्यहानीपर्यंत पोहोचलेल्या जंगली हत्तींचा बंदोबस्त करण्याची पहिली पायरी यशस्वी ठरली आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून हत्ती हटाव किंवा हत्ती पकड मोहिमा राबविल्या. मात्र, यातूनही हत्तींचे संकट कायमचे दूर होणारच नव्हते. कर्नाटकातून सिंधुदुर्गच्या हद्दीत येणाऱ्या हत्तींना रोखण्यासाठी युवानेते आमदार नीतेश राणे यांच्या पुढाकाराने मायवेट्स चॅरिटेबल ट्रस्ट अँड रिसर्च सेंटर, मुंबई या संस्थेने दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे, बांबार्डे परिसरात एलिफंट हनी बी प्रकल्प राबविला. हत्तींना सिंधुदुर्गात येण्यापासून रोखण्याचा हा अभिनव उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी झाला आहे. गेल्या पंधरा वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्ती आणि माणूस यांच्यात सुरू असलेला संघर्ष संपविण्यापासून अगदी पर्यावरणाचे रक्षण करण्यापर्यंत यशस्वी ठरणारा हा हनी बी प्रकल्प हत्तींना रोखण्याची नामी शक्कल ठरत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वनविभागानेच हा प्रकल्प दोडामार्ग तालुक्यात हत्ती येणाºया मार्गावर राबविण्यास सुरुवात केली आहे.वन्यप्राणी जपले पाहिजेत. कारण निसर्गाच्या दैनंदिन साखळीत त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. त्यात हत्तीसारखा प्राणी हा निसर्गचक्रातील महत्त्वाचा घटक आहे. दिवसेंदिवस भारतात हत्तींच्या संख्येतही कमालीची घट होताना आढळत आहे. त्यामुळे आता असलेल्या हत्तींना नैसर्गिक अधिवासात ठेवून त्यांना जपण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच कर्नाटक राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ वर्षांपूर्वी प्रवेश केलेल्या या पाहुण्यांनी दहशत माजवून अनेक शेतकरी कुटुंंबांची रोजीरोटीच हिरावली होती. हत्ती आणि माणूस यांच्यातील हा संघर्ष गेली काही वर्षे जिल्हावासीयांनी खास करून दोडामार्गवासीयांनी अगदी जवळून अनुभवला आहे. त्यामुळे हा संघर्ष कुठल्याही परिस्थितीत थांबविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक होते.शासनाने दोन वेळा हत्तींना आवरण्यासाठी मोहिमा राबविल्या. पहिल्यांदा दोडामार्ग तालुक्यात हत्ती हटाव मोहीम राबविण्यात आली. परंतु त्या मोहिमेतून काहीच साध्य झाले नाही. तर २०१५ मध्ये कुडाळ तालुक्यातील माणगाव खो-यात ठाण मांडून बसलेल्या हत्तींना पकडण्यासाठी हत्ती पकड मोहीम राबविली. या मोहिमेत तीन हत्तींना पकडण्यातही आले. मात्र, या तीन पैकी दोन हत्ती त्यानंतर मृत पावले. तर त्यातील एक भीम नामक हत्ती कर्नाटकच्या ताब्यात असून सध्या तो वनविभागाच्या विविध योजनांमध्ये काम करीत आहे. हत्ती पकड किंवा हत्ती हटाव या दोन्ही मोहिमांतून हत्तींचा कायमस्वरुपी बंदोबस्त करणे मात्र शासनाला शक्य झाले नाही. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोºयात येथील जंगलात ठाण मांडून बसलेले हत्ती पकडण्यात आले. मात्र, दोडामार्ग तालुक्यात असलेल्या आणि नजीकच्या कर्नाटक राज्यातून येणाºया हत्तींना रोखण्यासाठी शासनाकडून कोणतीही योजना आखण्यात आली नव्हती. परिणामी हत्ती पकड मोहिमेनंतरही दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे बाबरवाडीसह अन्य भागात हत्तींचा उच्छाद सुरूच होता. यासाठी दोडामार्गवासीयांनी शासनाकडे वेळोवेळी निवेदने दिली, उपोषणे केली, आंदोलने छेडली. मात्र, शासनाने या हत्तींच्या पुढे गुडघे टेकले होते.हत्तींचा हा प्रश्न कायमस्वरुपी मिटविण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील याचा अभ्यास आमदार नीतेश राणे यांनी केला.आफ्रिका, युरोप खंडात हत्तींना रोखण्यासाठी वापरण्यात येणाºया तंत्रज्ञानाची माहिती घेऊन पहिल्यांदा स्वखर्चाने मुंबईतील मायवेट्स चॅरिटेबल ट्रस्ट अँड रिसर्च सेंटरचे प्रमुख डॉ. युवराज कागिनकर आणि त्यांच्या सहकाºयांनी दोडामार्ग तालुक्यातील विजघर आणि बांबर्डेच्या जंगलात एलिफंट हनी बी प्रकल्प राबविला. यात प्रायोगिक तत्त्वावर हत्तींचा ज्या भागातून वावरण्याचा मार्ग होता त्या ठिकाणी मधुमक्षिका पालनाच्या पेट्या बसविल्यानंतर हत्तींनी या मार्गावरून बागायतीत प्रवेश करणे सोडले. या पेट्या बसविल्यानंतर पुढील दीड महिन्यात एकदाही हत्ती त्या मार्गाने गेले नाहीत. त्यामुळे पहिल्या प्रायोगिक तत्त्वावरील प्रयोगातच या प्रकल्पाला यश येत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या प्रकल्पाची माहिती महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाला देण्यात आली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा प्रकल्प शासनातर्फे राबविण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे कामदेखील मायवेट्स कंपनीलाच देण्याचे ठरले. सध्या वनविभागाच्यावतीने हेवाळे, बांबार्डे येथील हत्तींचे वास्तव्य असणाºया भागात ५० पेट्या लावण्याचे काम जोमात सुरू आहे. अर्ध्या किलोमीटर अंतरात प्रत्येक दहा मीटरवर या पेट्या बसविण्यात येणार आहेत. ज्या भागातून हत्ती दोडामार्गात प्रवेश करतात त्याठिकाणीच या ५० पेट्या बसविण्यात येणार आहेत.मधमाशी सातत्याने एक रसायन (पेरामोन्स) सोडत असते. याचा गंध अडीच ते तीन किलोमीटर परिसरात पसरतो. त्या गंधाद्वारे हत्तींना कळते की या परिसरात मधमाशा आहेत. मग हत्ती त्या दिशेला वाटचाल करीत नाहीत. तसेच मधमाशांच्या आवाजालाही हत्ती घाबरतात. त्यामुळे हत्तींना रोखण्यासाठी मधमाशांच्या पेट्या बसविण्याचा उपाय अत्यंत उपयुक्त ठरत आहे. मायवेट्स कंपनी हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी मोठी मेहनत घेत आहे. या बसविण्यात येणाºया पेट्यांमध्ये कायमस्वरुपी मधमाशा असणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यामुळे या पेट्यांवर सातत्याने लक्ष देणे आवश्यक आहे. या मधमाशांना योग्य खाद्य मिळाले पाहिजे. त्यासाठी आठवड्याला प्रत्येक पेटीची तपासणी करावी लागते. यात तांत्रिकदृष्ट्या या पेट्या किंवा यातील मधमाशा टिकून राहण्यासाठी त्यांचे पालन-पोषण करणे आवश्यक आहे. यात या मधमाशांना खाद्य मिळते की नाही ? त्यांची योग्य वाढ होते की नाही ? त्यांना काही रोगराई आहे का ? याची तपासणीही करण्यात येत आहे.जर यातील कुठली पेटी कमजोर झाली तर त्याठिकाणी नवीन पेटी बसविण्याची जबाबदारीही या कंपनीने घेतली आहे. बसविण्यात येणाºया एका पेटीत २० ते २२ हजार मधमाशा असतात. या मधमाशांचे आयुष्य दोन ते तीन महिने असते. त्यामुळे त्यांची उत्पत्ती होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. वर्षातील बाराही महिने जर या पेट्यांमध्ये मधमाशा राहिल्या तरच या प्रकल्पाचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये जे प्राणी पाळतो आणि त्यांना खाद्य देतो, त्यांची काळजी घेतो तसाच प्रकार हा या मधमाशांच्या बाबतीत करावा लागतो. तरच त्या मधमाशा व्यवस्थित तेथे राहतील. मायवेट्स कंपनीचे प्रमुख डॉ. युवराज कागिनकर (मुंबई), तांत्रिक कामगार किरण पाटील (कोल्हापूर) आणि नरसिंह कागिनकर हे सध्या या प्रकल्पात मन लावून काम करीत आहेत. याच बरोबरीने दोडामार्गमधील दोन स्थानिकांनाही याबाबत प्रशिक्षण देण्याचे कामही सुरू आहे. त्यामुळे या प्रकल्पातून स्थानिकांनाही रोजगार मिळणार आहे. ५० पेट्या बसविण्याचा हा प्रकल्प सध्या महाराष्ट्र शासनाच्या वनविभागामार्फत सुरू आहे. त्यामुळे त्यासाठी लागणारे अर्थसहाय्य शासन करीत आहे. प्रकल्प राबविण्यास सुरुवात झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून आजतागायत या भागात हत्ती आले नाहीत याची खात्रीही वनविभागाकडून करण्यात येणार आहे. शेतकºयांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी वनविभागही या प्रकल्पाच्या मागे ठामपणे उभे राहणार आहे. सध्या या प्रकल्पासाठी लागणाºया मधमाशा कोल्हापूर येथील मधमाशी प्रजनन महिला बचतगटामार्फत तयार केल्या जात आहेत.या प्रकल्पाची संकल्पना ही दक्षिण आफ्रिका, केनिया, थायलंड या देशात सुरू होऊन ती यशस्वी झाली आहे. त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी राबवायचा असेल तर मधमाशांचे पालन करणे आणि त्या वर्षभर त्या भागात टिकविणे हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा तांत्रिक भाग आहे आणि तो यशस्वी झाला तर जंगलातील हत्ती जंगलातच राहतील आणि ते पुन्हा मनुष्य वस्तीत येणार नाहीत. या प्रकल्पाचा आणखीन एक महत्त्वाचा फायदा म्हणजे मधमाशा ज्या भागात वास्तव्य करतील त्या भागातील आपल्या पिकांचे उत्पादन निश्चितच वाढणार आहे. त्या भागातील इतर किटाणू कमी होतील. त्यामुळे आंबा, काजू व इतर पिकांचे उत्पादन १०० टक्के वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणात मधमाशांचे जे महत्त्व आहे ते देखील टिकणार आहे. तसेच मधमाशांना कोणी छेडले किंवा डिवचले तरच त्या हल्ला करतात. अन्यथा ते आपले कार्य अविरतपणे करीत असतात. निसर्गचक्रामध्ये प्रत्येक प्राण्याला एकामेकापासून भीती असते. त्यामुळे हे प्राणी नेहमी एकमेकांपासून दूर राहण्याचा किंवा अंतर ठेवून जगण्याचा प्रयत्न करीत असतात. हत्ती हा एवढा मोठा टनांमध्ये वजन असलेला महाकाय प्राणी मधमाशीसारख्या छोट्या किटकाला घाबरतो. त्यामुळे हत्तींना रोखण्यासाठी मधमाशी पालन हा पर्यावरणपूरक व त्यावर नामी शक्कल ठरणारा उपाय प्रकर्षाने मोठ्या पातळीवर होणे आवश्यक आहे.नीतेश राणे यांनी स्वखर्चाने हा प्रकल्प पहिल्यांदा प्रायोगिक तत्त्वावर दोडामार्ग तालुक्यातील काही भागात राबविला आणि त्याची यशस्वीता पाहून आता शासनाने हा प्रकल्प स्वत: राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यात मायवेट कंपनी प्रकल्प यशस्वी होण्यासाठी झटत आहे. सिंधुदुर्गातील हत्ती आणि मानव यांच्यातील हा संघर्ष कमी करण्यासाठी राबविण्यात येणाºया या प्रकल्पामुळे दोडामार्गमधील जनमानसात आमदार नीतेश राणे, मायवेट कंपनी यांनी सलोख्याने घर केले आहे.