शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
4
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
5
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
6
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
7
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
8
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
9
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
11
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
12
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
13
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
14
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
15
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
16
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
17
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
18
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
19
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
20
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?

डिटेक्टिव्ह चाणक्य ! खबरबात विरोधकांची..सल्ला कार्यकर्त्यांचा

By सचिन जवळकोटे | Updated: April 16, 2023 13:05 IST

लगाव बत्ती..

- सचिन जवळकोटे

राजकारणात राहावं लागतं चोवीस तास अलर्ट. विरोधकांवर ठेवावं लागतं सतत लक्ष. यासाठी नेत्यांना जोडावे लागतात अचूक खबरबात देणारे कार्यकर्ते. जपावे लागतात योग्य वेळी अचूक सल्ले देणारे सहकारी. पूर्वीच्या काळी नेत्यांच्या कामाला लागणाऱ्यांना ‘चमचेगिरी’ किंवा ‘चमकोगिरी’ची मिळायची उपाधी. आता मात्र बदलला काळ. नेत्याच्या करिअरमध्ये मोठा रोल निभावणारी ही मंडळी ठरली आता ‘आधुनिक चाणक्य’ होय. जणू डिटेक्टिव्ह चाणक्यच..लगाव बत्ती...

आजचा विषय एकदम हटके. एकदम वेगळा. तुम्ही म्हणाल, हे काय आता नवीनच? होय... या विषयाला कारणीभूत ‘हात’वाले ‘पटोलेनाना’. परवा काय झालं, त्यांच्या आदेशाचं एक सर्क्युलर ‘पार्टी’तल्या कार्यकर्त्यांमध्ये फिरलं. ‘आपला कार्यकर्ता आपल्या नेत्यांबद्दल काय बोलतो किंवा पार्टीबरोबर कशी गद्दारी करतो? यावर बारीक लक्ष असल्याचा संदेश या पत्रातून दिला गेलेला. विशेष म्हणजे अशा मंडळींवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र पाच जणांची टीम तयार केल्याचा निर्णय डिक्लेर केलेला.

म्हणजे बघा. या ‘पटोलेनाना’ कित्ती म्हणजे कित्ती कामं ! एकीकडे ‘फडणवीस-शिंदे’ जोडीवर लक्ष ठेवायचं-दुसरीकडं ‘पवार-ठाकरे’ भेटीवरही नजर ठेवायची. तिसरीकडं आपल्याच कार्यकर्त्यांवर वॉच ठेवायचा. खरं तर हे ‘हात’ पार्टीत खूप पूर्वीच व्हायला हवं होतं; मात्र सत्ता गेली. उपरती झाली. असो. ‘कमळ’ पार्टीत अशी सिस्टीम पूर्वीपासूनच. अत्यंत ‘शिस्तबद्ध’पणे कार्यकर्ते तयार करणारी. अत्यंत ‘संयमशील’पणे कार्यकर्ते हाताळणारी. मात्र ‘भवानीपेठेत’ल्या ‘सुरेशअण्णां’च्या बाबतीत ‘पार्टी पॉलिसी’ कुठं गडबडते हे ‘विजयकुमार’ अन् ‘विक्रमभाऊं’नाच माहीत. ‘घड्याळ’वाल्यांच्या पार्टीत मात्र सारेच जबरदस्त कलाकार. ‘अजितदादां’पर्यंत पोहोचला तो डिटेक्टिव्ह. ‘थोरल्या काकां’पर्यंत गेला तो चाणक्य. ‘ठाकरे सेनेत’ मात्र एकमेकांची खबर काढण्यातच सारे मश्गूल. नेत्यांना ‘योग्य सल्ला’ द्यायला वेळ आहेच कुणाकडं?

स्थानिक पातळीवर मात्र नेतेमंडळी अशा मंडळींना हाताळण्यात भलतीच माहीर. डाव्या कानाला कुणाला ठेवायचं, उजव्या कानाजवळ कुणाला येऊ द्यायचं. कुणा-कुणाचं या कानानं ऐकून त्या कानानं सोडून द्यायचं, याचा चार दशकांचा दांडगा अनुभव ‘सुशीलकुमारां’ना. एकेकाळी ‘शिंदें’ची कार कोणत्या रस्त्यानं जायला हवी हे ‘तात्या’ ठरवायचे. मात्र आता त्यांच्या गाडीत कुणी बसायचं, यावर म्हणे ‘दोन्ही ताईं’चा बारीक कटाक्ष.

‘सुशीलकुमारां’च्या गाडीत बसणं, म्हणजे सोलापूरच्या कार्यकर्त्यांसाठी ‘लाडका चाणक्य’ बनण्यासारखंच. ‘तात्या युगाचा अस्त’ झाल्यानंतर ही संधी ‘चाकोते-बेरिया-यलगुलवार’सारख्या सिनियर नेत्यांना होती; मात्र बरीच वर्षे समोरच्या सीटवर दिसले ‘रॉकी’; मात्र ‘रॉकी’ला सोलापूरकरांना ‘खंजीर’ आवडल्यानं ‘चेतनभाऊं’नी खुर्ची झटकून त्यावर मांड टाकली. मात्र अलीकडं शहरात फिरताना ‘बंदपट्टे’ तर गावागावांत जाताना ‘हसापुरे’ दिसू लागलेत या गाडीत.

‘हसापुरे’ तसे सर्वपक्षीय चाणक्य. ‘संजयमामा’ अन् ‘आवताडें’सोबत बसतील, पण हळूच कॉल लावतील ‘रणजितदादां’ना. मेसेज टाकतील ‘सुशीलकुमारां’ना. हा सारा किस्सा सांगतील ‘म्हेत्रेअण्णां’ना; मात्र ‘दिलीपरावां’ना भेटून आल्यानंतर ‘सुरेशअण्णां’चं हे ‘थोर कर्तृत्व’ पाहून नुसतंच ‘सिद्धारामअण्णां’नी हळूच टोला हाणलाही, ‘आजकाल जनवात्सल्यवर सारखं असता म्हणे तुम्ही. जरा बघा... आमच्याबद्दल चांगलं बोला साहेबांसमोर’ तेव्हा ‘हसापुरें’नी नेहमीप्रमाणं ‘विनयशील’ होऊन हात जोडले, ‘अण्णाऽ मी तुमचाच की होऽऽ’ तेव्हा ‘म्हेत्रे’ म्हणे पुटपुटले, ‘असं म्हणून-म्हणूनच वाट लावली की चार वर्षांपूर्वी’..लगाव बत्ती...

‘विजयकुमार’ मात्र खूप हुशार. एकाच ‘चाणक्यावर’ ते कधीच विसंबून न राहणारे. कोणत्याच ‘डिटेक्टिव्ह’ कार्यकर्त्यावर झटकन विश्वास न ठेवणारे. माणसं गोळा करायला ‘कोळी’ तर ‘टेंडर हॅन्डल’ करायला जोडी. ‘यार्डातले नरोळे’ विश्वासू असले तरी कानापर्यंत पोहोचतील फक्त ‘शिवानंद’च. ज्याला-त्याला त्यांनी बरोबर अंतरावर ठेवलेलं. तेही चेहऱ्यावरची रेषाही बदलू न देता.

इकडं ‘सुभाषबापूं’च्या चाणक्यनीतीची त्यांच्याच दोन जुन्या चाणक्यांनी पुरती वाट लावलेली. एकेकाळी ‘महागावकर-भोसले’ बोले, ‘बापूं’चा दरबार म्हणे हाले... मात्र ‘राजपुत्रां’च्या आगमनानंतर हे दोन्ही चाणक्य कुठं गुडूप झाले हे ‘मनीषभय्यां’नाच माहीत. मात्र आजकाल या ‘भय्यां’च्या भोवती असणारी ‘आकाश-सागर’ जोडीही जुन्या चाणक्यांची ‘सेकंड एडिशन’ बनू नये म्हणजे मिळवली. लगाव बत्ती...

अक्कलकोटमध्ये ‘कल्याणशेट्टीं’च्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी म्हणे आयती संधी चालून आलेली. ‘सचिनदादां’च्या घराजवळच एक भलंमोठं हॉटेल. योगायोगानं याचे चालक ‘म्हेत्रेअण्णां’चे जवळचे पाहुणेच. त्यामुळं विरोधकांची ताजी खबरबात शिजण्यापूर्वीच टेबलावर हजर. मात्र ‘दुधनी’तल्या घडामोडींवर लक्ष ठेवायला या ‘सचिनदादां’कडे वेळ आहेच कुठं. जिल्ह्यात बाकींच्या आमदारांच्या नोंदी ठेवण्यातच सारा दिवस चाललेला. ‘पंतां’ना नको का पार्टीच्या फायद्याचं रिपोर्टिंग करायला ? लगाव बत्ती...

बार्शीत तर सारंच उलटं. नंदघराणं उलथवण्यासाठी चंद्रगुप्ताला सामील होऊन मदत करणारा ‘चाणक्य’ आजही बार्शीकरांना आठवतो. ‘मनगिरे’ यांना ‘चाणक्यनीती’ तोंडपाठ. ‘सोपल भावजीं’कडं मानसन्मान मिळाला नाही म्हणून सध्या ‘रौतां’च्या मार्केट यार्डाची ‘तिजोरी’ सांभाळणारे ‘रावसाहेब’ प्रमुख सल्लागाराच्या भूमिकेत. मात्र या ‘राजाभाऊं’कडं डझनभर ‘डिटेक्टिव्ह’. प्रत्येकाला एकमेकांवर ‘वॉच’ ठेवायची सवय लागलेली. त्यामुळं ‘आगीमधून फुफाट्यात’ अशी अवस्था या ‘रावसाहेबां’ची होऊ नये म्हणजे झालं.

दुसरीकडं ‘लंडन रिटर्न’ नातवाचा चिवचिवाट सोडला तर सोपलांच्या बंगल्यात सन्नाटाच. अशा वेळी एकटे ‘नागेशअण्णा’च डिटेक्टिव्ह कम चाणक्याच्या भूमिकेत. तेही मध्यंतरी कंटाळून ‘घड्याळ’ बांधायला निघालेले. सोशल मीडियावर कैक दिवस हा इश्यू व्हायरल होऊनही ‘दिलीपरावां’नी कधीच यावर ओपन रिॲक्शन न दिलेली. हीही एक प्रकारची हतबल चाणक्यनीतीच म्हणायची..लगाव बत्ती...

मोहोळमध्ये मात्र सारं उलटंच. तालुक्यात ‘चवरे’ सोडले तर ‘अनगरकरां’चे मोहोळमध्ये ‘डिटेक्टिव्ह’ खूपच कमी. या गावाला वगळून अख्ख्या तालुक्याचं राजकारण करण्याची परंपरा ‘पाटलां’च्या तिसऱ्या पिढीनंही अखंडपणे सुरू ठेवलेली. नाही म्हणायला ‘अनगर’मधलाच पुण्यात राहून ‘उमेशदादां’ना आतल्या टीप देत राहतो हा भाग वेगळा.

मंगळवेढ्यात ‘प्रशांतपंतां’च्या ‘चाणक्य’चं काम ‘शिवानंदअण्णा’ करत असले तरीही ते मूळचे ‘ढोबळें’चे. सत्ता पलटल्यानंतर ‘लक्ष्मणरावां’ची पुरोगामी विचारधारा जशी झटकन बदलत गेली, तसे हे ‘शिवानंद’ही देव्हाऱ्यातला विठ्ठल बदलून ‘पांडुरंग’ परिवारात सामील झालेले. एकीकडे शेकडो कोटींची उलाढाल करणाऱ्या ‘आवताडें’ना साधा साखर कारखाना सांभाळता न आलेला. तेच दु:ख उरी बाळगून त्यांनी पंढरपुरातही स्वत:चा गट स्थापन करण्याचा ‘विनोद’ घडविलेला..लगाव बत्ती...माढा-करमाळ्यात ‘बबनदादा-संजयमामां’कडं ढिगानं चाणक्य. भारतआबा अन् ढवळे नानांपासून तोडकरी-केकेंपर्यंत लय माणसे ‘दादां’नी कानाजवळ ठेवलेली. ढाणेअण्णा, उद्धवदादांपासून परमेश्वरमामांपर्यंत बक्कळ मंडळी ‘संजयमामां’नीही हातची राखून ठेवलेली.

अकलूजच्या ‘रणजितदादां’चा खास माणूस म्हणून ‘देगाव’च्या ‘राजूं’ची ओळख. मात्र, ते खूप हुशार. नेहमी ‘टेंडरांच्या सुपात’ राहतात. ‘दुश्मनांच्या जात्यात’ अडकण्याचा लोच्या कारभार त्यांनी कधीच न केलेला. ‘धैर्यशीलभैया’ मात्र प्रोफेसर अन् टीचरसारख्या मंडळींकडून राजकीय सल्ले घेण्यात आग्रही. वाटल्यास --- यांना विचारा.सांगोल्यात मात्र देनच व्यक्ती. तेच नेते, तेच कार्यकर्ते. ‘तू मला वाचव... मी तुला सांभाळतो’, या आधुनिक चाणक्यनीतीत रमलेले. ‘दीपकआबा’ हे ‘शहाजीबापूं’चे परफेक्ट डिटेक्टिव्ह. झाडी-डोंगरातही ‘बापूं’ना गावाकडची खबरबात खडान्खडा पोहोचत राहिलेली. त्यामुळंच ‘बापू’ हेच ‘आबां’चे ‘इनकमिंग चाणक्य’ बनलेले. घरबसल्या काम नावावर... लगाव बत्ती...‘प्रणितीताई’ मात्र खूप हुशार. मतदारांशी थेट संवाद साधताना त्यांनी आजपावेतो पुन्हा ‘कोठे पॅटर्न’ निर्माण होऊ न देण्याची कसोशीनं काळजी घेतलेली. मात्र, या नादात त्यांच्या दरबारात कुणीच ‘यशस्वी चाणक्य’ न बनलेलं. सारा एकहाती कारभार. ‘मग कसं... ताई म्हणतील तसंच’. एक मात्र खरं... त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ‘डिटेक्टिव्ह एजन्सी’ज् भरपूर. बहुतांश जण हेरगिरीत माहीर. ‘श्रीदेवीताईं’नी नवीन दागिना कोणता घेतला इथपासून ‘फिरदोसदीदी’ आजकाल गप्पगप्प का? या साऱ्यांची खडान्खडा माहिती या एजन्सीजकडे तयार. मात्र, ‘हात’वाल्यांच्या आतल्या गुप्त घडामोडी ‘लगाव बत्ती’ सदरातून येतात; याचा शोध मात्र या मंडळींना आजपावेतो न लागलेला... लगाव बत्ती..

टॅग्स :SolapurसोलापूरPoliticsराजकारणDilip Sopalदिलीप सोपलVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखPraniti Shindeप्रणिती शिंदे