शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

मागास विद्यार्थ्यांना जेवण द्यायचे की जेवणाचे पैसे?

By यदू जोशी | Updated: April 23, 2018 00:39 IST

ती हौस नसते तर नियतीने लादलेली अपरिहार्यता असते.

आयुष्यातील सर्व रस्ते पोटातून जातात आणि त्या पोटाची धडपड जेव्हा कायम नशिबी असलेल्या गरिबीची पाठ सोडविण्यासाठी व नव्या उमेदीसह प्रगती करण्यासाठी असते तेव्हा तर त्या पोटाची अत्यंत आपुलकीने काळजी घेतली गेली पाहिजे. राज्यातील दलित, आदिवासींसाठीच्या वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या हजारो मुलांना मिळणारे जेवण आणि त्याचा दर्जा हा नेहमीच टीकेचा विषय ठरला आहे.खरेतर सरकार हेच त्यांचे पालन-पोषणासाठीचे मायबाप आहेत. दारिद्र्याच्या संगतीत आपली मुलं खितपत पडून राहतील म्हणून त्यांना काही मैलांवरील वसतिगृहांमध्ये त्यांच्या जन्मदात्या मायबापांनी पाठविलेले असते. ती हौस नसते तर नियतीने लादलेली अपरिहार्यता असते. आपल्या मुलामुलीने शिकून मोठे व्हावे ही आस त्यामागे असते. समाजाच्या शेवटच्या घटकातील या वंचित मुलांचा नीट सांभाळ करून त्यांना दर्जेदार जेवण द्यावे ही सरकारची जबाबदारी ठरते. आदिवासी वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांना जेवणाऐवजी पैसे देणे हा शासनाने पळ काढण्याचा प्रकार आहे. वसतिगृहांमधील जेवणाचा दर्जा सुधारावा यासाठी काही ठोस करण्याऐवजी मुलांच्या अंगावर पैसे फेकण्याचा हा निर्दयीपणा आहे. जे अधिकारी या निर्णयामागे आहेत ते उद्यापासून आपल्या मुलांना घरी जेवण देण्याऐवजी महिन्याकाठी जेवणाचे पैसे देणार आहेत का? पैसे देण्याचा निर्णय योग्य असल्याची त्यांची भूमिका असेल तर त्यांनी त्याची सुरुवात आपल्या घरापासून करावी. संबंधित मंत्री, अधिकाºयांची भावना व भूमिका ही वसतिगृहांमधील मुलांच्या पालकत्वाची असती तर ते असे पैसे फेकण्याचा निर्णयाप्रत आलेच नसते.अधिकारी आणि अन्न पुरविणारे कंत्राटदार आणि सत्ताधाºयांच्या संगनमतातून वर्षानुवर्षे भ्रष्टाचार होत आला हे वास्तव आहेच पण त्यावर अन्नाला पैशात मोजण्याचा पर्याय स्वीकारला जाऊ शकत नाही. भ्रष्टाचाराची ही शृंखला तोडण्याचे धाडस आघाडी सरकारनेही दाखविले नाही आणि आताच्या सरकारमध्येही ती हिंमत नाही. सामाजिक न्याय विभागात या सरकारमधील एक अत्यंत धक्कादायक प्रकार ऐकण्यात आला. मुंबई, ठाण्यातील दलित विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांमध्ये जेवणावर हा विभाग जेवढा खर्च करतो त्यापेक्षा निम्म्या किमतीत आणि दहापट अधिक चांगले भोजन पुरविण्याचा प्रस्ताव वर्ष दीड वर्षापूर्वी आला होता. पण त्याला वाटाण्याचा अक्षता लावण्यात आल्या. संबंधित पुरवठादाराने सरकारकडून निम्मी रक्कम घेऊन निम्मी रक्कम सीएसआर फंडातून देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, खाबूगिरीची सवय जडलेल्या विभागाने हा प्रस्ताव डब्यात टाकला. इस्कॉनसारखी नामवंत संस्था पालघर जिल्ह्यातील २६ गावांमधील मुलांना ताजे व उत्तम जेवण देते आणि तेही सरकारपेक्षा कमी खर्चात. हे सरकाला का जमू नये? हजारो अंगणवाड्यांमध्ये ‘टेक होम रेशन’चा पुरवठा नीट होतो की नाही याची ‘मॉनिटरिंग सिस्टीम’ न आणणारे अधिकारी व पुरवठादार उघडे पडलेच पाहिजेत.सरकारबरोबरच वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांची पण काही जबाबदारी आहे. कुठल्याही अभ्यासक्रमात नसलेले विद्यार्थी हे वसतिगृहांमध्ये अनधिकृतपणे राहत आहेत. त्यांची त्या ठिकाणी दादागिरी असते. वसतिगृहात राहतच नाहीत पण जेवायला बरोबर हजर राहतात, असेही काही जण आहेत. त्यामुळे १०० मुले असलेल्या वसतिगृहात १५० जणांच्या जेवणाची सोय पुरवठादारास करावी लागते. त्यामुळे जेवणाचा दर्जाही घसरतो. असे अनधिकृत विद्यार्थी/गुंड कुठलाही मुलाहिजा न ठेवता हुडकून हाकलले पाहिजेत.

टॅग्स :Governmentसरकार