शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

दानवे साहेब, आपण आहात म्हणून..!

By अतुल कुलकर्णी | Published: November 22, 2017 12:14 AM

नमस्कार. खूप दिवसापासून आपल्याला पत्र लिहायची इच्छा होती. पण हिंमत होत नव्हती.

प्रिय रावसाहेब दानवे पाटील,नमस्कार, खूप दिवसापासून आपल्याला पत्र लिहायची इच्छा होती. पण हिंमत होत नव्हती. आज रहावलं नाही बघा. आपल्या सारखा हिंमतवान नेता भाजपात आहे याचा भाजपाने गर्व बाळगावा तेवढा थोडाच...! कोणत्या वेळी काय बोलावं याचा आपल्याएवढा अभ्यास तर कुणाचाच नाही. अगदी काँग्रेसचे दिग्विजयसिंह देखील फिक्के पडावे आपल्यापुढे साहेब... आता परवाचंच पाहा ना... नगर जिल्ह्यात शेतक-यांनी आंदोलन केलं तर त्या देवेनभाऊंच्या पोलिसांनी त्यांच्या अंगावर गोळ्या घातल्या. ही काय पध्दत आहे का साहेब...? शेवटी तुम्हालाच पुढे येऊन सांगावं लागलं की, गोळ्याच घालायच्या तर पायावर मारा... आपली मात्रा एकदम लागू पडली ना साहेब. सगळे शेतकरी आता लांबून जरी पोलीस येताना दिसला तरी पाय लपवून पळून जातात. शेवटी कसं आहे ना, आपण पडला हाडाचे शेतकरी. त्यांना कोणत्या भाषेत सांगितलं म्हणजे कळतं हे आपल्याशिवाय कुणाच्या लक्षात येणार...? मागे नाही का, एवढं सगळं आपल्या सरकारनं शेतकºयांना देऊ केलं तरी त्यांच्या मागण्या काही संपत नव्हत्या. त्यामुळे आपण त्यांना ‘साले ऐकतच नाहीत...’ असं म्हणालात आणि सगळे एकदम गप्पगार झाले ना राव...मला तर काय वाटतं सांगू का, आपलं सरकार एवढं चांगलं काम करतंय, ते या विरोधकांना पाहवत नाही. म्हणून ते असे संप घडवून आणताय. तेव्हा आपण देवेनभाऊंना आदेश का देत नाही, एक जीआरच काढा म्हणावं... आंदोलन करणाºया शेतकºयांच्या पायावर, अंगणवाडीतार्इंच्या पाठीवर, एसटी कर्मचाºयांच्या पोटावर, शिक्षकांच्या हातावर मारण्याचा आदेशच काढून टाका म्हणावं. म्हणजे एक आंदोलन होणार नाही...आपण असं काही बोलला की विरोधक लगेच आपला बुद्ध्यांक तपासा म्हणतात. पण त्यांना काय माहिती आपण काय चीज आहात ते...! एकनाथ खडसेंना वाटायचं रावसाहेब आपल्याच बाजूनं आहेत... पण ते मंत्रिमंडळातून घरी जाणार हे आपण दोन तीन महिने आधीच आपल्या मित्रांना सांगून ठेवल्याचं गुपीत कुठं त्यांना माहितीयं... आता नारायण राणे मंत्री व्हावेत असं फक्त आपल्याला आणि चंद्रकांत दादांनाच वाटतं, असा समज करून देत राणेंच्या विरोधात आपणच फटाके लावल्याचं अजूनही त्यांना कळालेलं नाही. काही म्हणा साहेब, आपण आहात म्हणून पक्ष चालूयं... नाहीतर एकट्या देवेनभाऊंचं काही खरं नव्हतं...

टॅग्स :BJPभाजपा