शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

BLOG : कोरोनाविरुद्धच्या लढाईतला पडद्याआडचा 'रिअल हिरो'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 10:40 IST

Suresh Kakani, Addl. Municipal Commissioner And CoronaVirus Mumbai Updates : गेले वर्षभर सतत कामात असणारे आरोग्य अधिकारी, शासकीय कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ यांच्या श्रमाला तोड नाही. शांतपणे आणि नेमस्तपणे आपले काम करणारे  एक अधिकारी म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी.

- अतुल कुलकर्णी

महाराष्ट्रात कोरोनाची सुरुवात होऊन एक वर्ष पूर्ण झाले. एक लाट आली आणि ती संपत असताना दुसरी आली. परिस्थिती सुधारत असताना पुन्हा दुसऱ्या लाटेने महाराष्ट्राला घेरले आहे. गेले वर्षभर सतत कामात असणारे आरोग्य अधिकारी, शासकीय कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ यांच्या श्रमाला तोड नाही. आता या आजारासोबत आपल्याला राहावे लागेल, या मानसिकतेत हळूहळू उपचार करण्याची सिस्टीम देखील सेट होऊ लागली आहे. मी या काळात अनेक अधिकारी पाहिले. प्रसिद्धीपासून दूर,.कुठलाही गाजावाजा न करता, शांतपणे आणि नेमस्तपणे आपले काम करणारे  एक अधिकारी म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani, Addl. Municipal Commissioner). 

मंत्रालयात ते काम करत तेव्हापासून माझी त्यांची ओळख आहे. मात्र त्यांच्यातला माणूस मी या वर्षभरात खूप जवळून पाहिला. अनुभवला. मुंबईत या साथीने प्रचंड डोके वर काढले असतानाही स्वतःचे चित्त शांत ठेवून काम करताना मी त्यांना पाहिले. त्यांची मुलाखत घेतली. ज्या ज्या वेळी त्यांना काही माहिती विचारली, तेव्हा त्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता माहिती दिली. अनेकदा दिलेली माहिती मुंबई महापालिकेच्या विरोधात जाईल असे वाटत असतानाही, त्यांनी काहीही न लपवता माहिती दिली. ती देत असताना महापालिकेची बाजूदेखील तेवढ्यात भक्कमपणे मांडली. 

सायन हॉस्पिटलमध्ये डेडबॉडीज पडून आहेत. त्या नेल्या जात नाहीत अशा पद्धतीचा व्हिडिओ व्हायरल झाला. प्रचंड टीका झाली. त्यावेळी वस्तुस्थिती काय आहे, हे विचारण्यासाठी मी काकाणी यांना फोन केला. तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया होती, ती माहिती खरी आहे अशी... पण त्या का पडून आहेत? त्याची कारणं सांगताना त्यांनी जी वस्तुस्थिती मांडली ती विदारक होती. तरी देखील त्यांनी निर्भीडपणे ती माहिती सांगितली. सांगत असताना प्रशासनाला फेस कराव्या लागणाऱ्या अडचणीही त्यांनी सांगितल्या. त्या अडचणी अत्यंत भयंकर होत्या, आणि ज्या काळी कोरोना पीक वर होता त्या काळाची असहाय्यता दर्शवणाऱ्या होत्या. 

या वर्षभरात मी ज्यावेळी त्यांना फोन केले आणि कोणाला बेडची गरज आहे, कोणाला ऑक्सिजनची गरज आहे, किंवा कोणाला रेमडेसेवीरची गरज आहे, कोणाला व्हॅक्सिन हवे आहे, अशा प्रत्येक वेळी त्यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांच्याकडून कधीही नकार घंटा नव्हती. पत्रकार असल्यामुळे अनेक जण फोन करतात. मदत मिळेल का असे विचारतात. ओळख असो नसो, मला आलेले मेसेज मी त्यांना फॉरवर्ड केले, त्यावेळी त्यांनी मदतीचा हात पुढे केला. तुम्ही मुंबई महापालिकेच्या विरोधात लिहिता किंवा बाजूने लिहिता हा विषय कधीही त्यांनी मदत करताना मध्ये आणला नाही. काकाणी यांना मी मंत्रालयात काम करताना जेवढे पाहिले आहे, त्यापेक्षा कितीतरी जास्त पुण्याईचे काम करताना मी त्यांना गेले वर्षभर पाहत आहे. त्यांना तणावाचे प्रसंग आले नसतील असे नाही, मात्र अत्यंत शांतपणे आणि संयमाने माहिती देत, त्यांनी ही परिस्थिती हाताळली आहे. कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात पडद्याआड काम करणारे असे अनेक रियल हिरो आहेत. काकाणी त्यातले एक प्रमुख हिरो आहेत, असे म्हटले तर वावगे होणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारतCorona vaccineकोरोनाची लसMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र