Corona vaccination: पळा पळा, कोणी किती लसी मिळविल्या ? कोणाचे लसीकरण कुठवर आले?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 05:17 AM2021-05-27T05:17:06+5:302021-05-27T05:17:40+5:30

Corona vaccination Update: कोरोनाची लस कुणी कुणी घेतली? हा प्रश्न व्यक्तिगत स्तरावर नागरिकांचा आहे, तसेच देशोदेशीच्या सरकारांसाठीसुद्धा आपापल्या देशांच्या संपूर्ण लसीकरणाचे आव्हान फार मोठे आहे.

Corona vaccination: Run away, how many vaccines did anyone get? Who got vaccinated? | Corona vaccination: पळा पळा, कोणी किती लसी मिळविल्या ? कोणाचे लसीकरण कुठवर आले?

Corona vaccination: पळा पळा, कोणी किती लसी मिळविल्या ? कोणाचे लसीकरण कुठवर आले?

Next

सध्या अवघ्या जगभरात एकमेव प्राथमिकता होऊन बसली आहे : कोरोनाची लस कुणी कुणी घेतली? हा प्रश्न व्यक्तिगत स्तरावर नागरिकांचा आहे, तसेच देशोदेशीच्या सरकारांसाठीसुद्धा आपापल्या देशांच्या संपूर्ण लसीकरणाचे आव्हान फार मोठे आहे. अनेक देशांकडे लसी विकत घ्यायला पैसे नाहीत; पण ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्यासाठी बाजारात लसीच पुरेशा उपलब्ध नाहीत असे सारे त्रांगडे होऊन बसले आहे.  या पार्श्वभूमीवर जे लसीच्या संशोधनासाठी पैसे  गुंतवून लसमात्रा आरक्षित करू शकले  असे अमेरिकेसारखे  बलाढ्य देश आणि कमी लोकसंख्येचे इस्त्रायलसारखे देश लसीकरणाच्या टक्केवारीत पुढे आहेत. इस्त्रायलमध्ये ४० % लोकसंख्येला पहिला डोस दिला जाताच  त्या देशातील संसर्गाचे प्रमाण उतरणीला लागले. आता त्या देशातल्या ५९.१ % लोकांचे संपूर्ण लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यानंतर बहारीन, मग चिली आणि चौथ्या क्रमांकावर आहे अमेरिका !

Web Title: Corona vaccination: Run away, how many vaccines did anyone get? Who got vaccinated?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.