Corona: The Need for Flexible Supply Chains | कोरोना : लवचिक पुरवठा साखळीची गरज

कोरोना : लवचिक पुरवठा साखळीची गरज

- अमिताभ कांत, कौथमराज व्ही. एस.

कोरोना विषाणूने लाखो लोकांना ग्रासले असून, जगभरातील तीस हजारांपेक्षा जास्त लोकांचे आयुष्य संपविले आहे. यामुळे अनेक देश त्यांच्या नागरिकांना घरांत राहण्याची सक्ती करीत आहेत. परिणामी जागतिक अर्थव्यवस्थेचा आजवरचा सर्वांत जास्त ºहास होईल व सकल देशांतर्गत उत्पादनातही मोठी घसरण होईल.

आपण देशभरात तीन आठवड्यांसाठी लॉकडाऊन अनुभवत आहोत. नागरिकांच्या दैनंदिन गरजांचा तसेच या संकटाशी सामना करण्यासाठी आवश्यक वस्तूंचा पुरवठा या बाबींवर याचा मोठा परिणाम होतो आहे. या परिस्थितीत आरोग्यसेवा, स्रोत व पुरवठा साखळी कोलमडणे हा सर्वांत मोठा धोका आहे. जगभरात पारंपरिक पुरवठा साखळी बंद पडत असताना ‘कोविड-१९’ग्रस्त देशांमध्ये वैद्यकीय पुरवठा, चाचणी उपकरणे, श्वसनयंत्र, मास्क, ट्यूब, थर्मामीटर, हेजमाट सूट आणि आरोग्य कामगारांची मागणी सातत्याने वाढत आहे.

अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम करणाऱ्या २०१५ च्या टएफरच्या उद्रेकानंतर दक्षिण कोरियाने नेमकी काय चूक झाली, याचे विश्लेषण केले. टएफरचा संसर्ग झाला अथवा नाही, याच्या चाचणीसाठी पुरेशा उपकरणांअभावी लोकांना दवाखान्यांमध्ये फेºया माराव्या लागल्या. तसेच ८३ टक्के संक्रमण पाच ‘सुपर स्प्रेडर्स’च्या माध्यमातून झाले. अर्थात १६ रुग्णालयांतल्या १८६ रुग्णांपैकी ८१ संक्रमण अशा प्रकारे झाल्याचे उघडकीस आले. त्यांची वेळीच चाचणी करून पाचजणांचे संपर्क शोधून, केवळ त्यांनाच वेळेत वेगळे ठेवले असते तर?

परीक्षण संच व वैद्यकीय उपकरणे मुबलक प्रमाणात उपलब्ध न होणे, हे चाचण्या कमी होण्यामागचे महत्त्वाचे कारण आहे. विषाणू संसर्गाची खातरजमा करणारे परीक्षण संच मोठ्या शहरांमध्येच आहेत. हे रोग ‘कोविड १९’पेक्षा जास्त धोकादायक असू शकतात आणि केवळ आरोग्ययंत्रणा सक्षम करून कोणतेही क्षेत्र साथ रोगापासून बचाव करू शकणार नाही. अशा काळात उत्कृष्ट आरोग्यसेवाही अपुºया पडतात, ही वस्तुस्थिती आहे.

पारंपरिक आरोग्यसेवा पुरवठा साखळीमध्ये बहुतेकदा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण व तुलनेने लहान अशी कारखान्यांची एकके असतात. हवे ते प्रमाण प्राप्त करण्यासाठी उच्चप्रतीचे नियोजन, पत, पायाभूत सुविधा, सामाजिक भांडवल व व्यवहार कौशल्य यांची आवश्यकता असते. त्याचमुळे चीनमध्येही मागणीच्या प्रमाणात मास्कसारख्या अत्यावश्यक सुविधा देणे पारंपरिक आरोग्यसेवा पुरवठा साखळीला शक्य झाले नाही.

चीनमधील बीवायडी (ईव्ही आणि बॅटरी निर्माता)ने शेनझेनमधील प्रकल्पात आवश्यक उत्पादनासाठी ३,००० अभियंत्यांचा समावेश असलेल्या कृती दलाची नियुक्ती केली. महिनाभरात ते जगातील सर्वांत मोठे मास्क निर्माता झाले. आरोग्यसेवा क्षेत्रातील बहुतेक कंपन्यांकडे इतके अभियंतेही नसतात, उत्पादन क्षमताही नसते. व्हेंटिलेटरच्या उत्पादनासाठी भारतातील टाटा आणि महिंद्रा आता सज्ज होत आहेत.

भारतात आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्यांची सुरक्षा विशेष महत्त्वाची आहे. कारण आपल्याकडे डॉक्टर आणि परिचारिकांचा मोठा तुटवडा आहे. चीन आणि इटलीमध्ये आरोग्यसेवा क्षेत्रातील कर्मचाºयांना ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याचा मोठा फटका बसला. आरोग्य कर्मचाºयांना हातमोजे, ग्लोव्हज्, कव्हरॉल, गॉगल, ठ-95 मास्क, शू कव्हर, फेस शील्ड, ट्रिपल-लेयर मेडिकल मास्क यांचा संच तसेच रुग्णालयात जेवण व विश्रांतीची सुविधा प्रदान करणे गरजेचे आहे. भारत सरकारने सर्व आरोग्य कर्मचाºयांसाठी ५० लाखांचा आरोग्यविमा उपलब्ध करून दिला, हे कौतुकास्पद आहे.

आपण गेल्या २० वर्षांत पाच वेळा साथीच्या रोगांचा सामना केला आहे. साथीच्या रोगावर समर्थपणे मात करायची असेल तर प्रत्येक देशाने ‘सुप्त संघटना’ ही संकल्पना स्वीकारली पाहिजे. थोडक्यात, साथीच्या रोगांची डिजिटल मॉडेल्स तयार करायला हवी. विविध उद्योगांतल्या सर्वोत्तम पुरवठा साखळी तज्ज्ञांना अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी नवीन मार्ग शोधण्यास विनंती केली पाहिजे. सरकारने आवश्यक प्रमाणात उत्पादन घेण्यास सक्षम कंपन्या (वाहन, इलेक्ट्रॉनिक्स, वस्त्रे, आदी) सुनिश्चित करून त्यांना आरोग्यसेवा कंपन्यांसोबत एकत्र आणले पाहिजे. एखादा समग्र आणि कालबद्ध असा बौद्धिक मालमत्ता करार तयार करता येईल.

साथीच्या रोगाच्या प्रतिकारक पुरवठा साखळीमध्ये हजारो सुसज्ज स्वच्छ खोल्या हाताळण्यासाठी प्रशिक्षित लक्षावधी कामगार असणाºया उत्पादकांची भूमिका महत्त्वाची असेल. तांबे हा धातू बहुतेक सूक्ष्मजंतूंचा नाश करतो, हे लक्षात घेत बॅटरी उद्योगातील तांबे पुरवठादारांच्या माध्यमातून साथरोग नियंत्रकाच्या वेष्टनासाठी तांब्याच्या फॉईलचा वापर करता येऊ शकतो. आरोग्यसेवा कर्मचाºयांच्या सुरक्षेसाठी सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्विगी, उबर, ओला यांसारख्या कंपन्यांच्या वितरणासाठीच्या निगडित पायाभूत सुविधांचा उपयोग जास्त प्रमाणात स्वॅब नमुन्यांच्या संकलनासाठी केला जाऊ शकतो.

भारतामध्ये सरकारी, खासगी कार्यालये आणि व्यावसायिक संस्था बंद ठेवल्या असल्या तरी अन्न, किराणा सामान, फळे व भाज्यांची दुकाने तसेच अन्नासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाºया दुकानांना, ई-कॉमर्सच्या माध्यमातून फार्मास्युटिकल्स, वैद्यकीय उपकरणे पुरवठा करणाºयांना सूट दिली आहे. सामान्य नागरिकाला त्रास होऊ नये आणि पुरवठा साखळी अबाधित राहावी, यासाठी ही खबरदारी घेतली आहे.

Web Title: Corona: The Need for Flexible Supply Chains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.