शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

काँग्रेसची मराठवाड्यात जनसंघर्ष यात्रा आणि सरकार गंभीर अन् मध्यम दुष्काळात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 21:55 IST

काँग्रेसने तुळजापूर, औसा, निलंगा लातूर, उदगीर, मुखेड, देगलूर, नांदेड करीत औरंगाबादपर्यंत आपली जनसंघर्ष यात्रा लोकांपर्यंत नेली. दुष्काळ, इंधन दरवाढ, महागाई या ताज्या मुद्यांना स्पर्श करीत चार वर्षांतील सरकारच्या अपयशाचा पाढा काँग्रेसने वाचला.

- धर्मराज हल्लाळे

काँग्रेसने तुळजापूर, औसा, निलंगा लातूर, उदगीर, मुखेड, देगलूर, नांदेड करीत औरंगाबादपर्यंत आपली जनसंघर्ष यात्रा लोकांपर्यंत नेली. दुष्काळ, इंधन दरवाढ, महागाई या ताज्या मुद्यांना स्पर्श करीत चार वर्षांतील सरकारच्या अपयशाचा पाढा काँग्रेसने वाचला. वादग्रस्त विधानांचाही खरपूस समाचार घेतला. एकिकडे विरोधक लोकभावनेला वाट मोकळी करून देताना सत्ता पक्ष मात्र दुष्काळाचा अर्थ काढण्यात व्यस्त आहेत. आधी दुष्काळजन्य, दुष्काळसदृश तालुके जाहीर केले. आता गंभीर आणि मध्यम दुष्काळ अशी व्याख्या केली आहे. आश्चर्य म्हणजे मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात एकाही तालुक्यात गंभीर दुष्काळ नाही. तुलनेने औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यांतील गंभीर दुष्काळ असलेल्या तालुक्यांची संख्या अधिक आहे. मात्र नांदेडमध्ये केवळ मुखेड व देगलूर या दोन तालुक्यांतच दुष्काळ आहे. हिंगोली आणि सेनगाव या दोन तालुक्यांचाच समावेश आहे. दुष्काळ व्यस्थापन संहिता २०१६ नुसार शासनाने मूल्यांकन केले आहे. राज्यातील १८० तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतल्याचा दावा सरकारने केला आहे. त्यानुसार १५१ तालुक्यांत गंभीर व मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. म्हणजेच लातूर जिल्ह्यातील एकमेव शिरूर अनंतपाळ तालुक्याला मध्यम दुष्काळांच्या उपाययोजनांचा लाभ होईल. प्रत्यक्षात मराठवाड्यातील सर्वच तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात खरिपाचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीनचा पेरा सर्वाधिक आहे. पाऊस कमी झाल्यामुळे दाणे भरलेले नाहीत. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न निघणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याचवेळी काँग्रेसने मात्र विद्यमान सरकारने केलेल्या आश्वासनांचा आणि प्रत्यक्षात काय दिले याचा वस्तुपाठच जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवला. तूर, हरभºयाला हमीभाव जाहीर केला. पण तो मिळाला नाही. खरेदी केंद्र सुरू केले. अनेक ठिकाणी ते बंद पडले. बारदाणा नाही म्हणून ते सुरू झाले नाहीत. व्यापारीवर्गही नाराज होता. नियमावलीला कंटाळून बाजारपेठा बंद राहिल्या होत्या. कर्जमाफीचे टप्पे अजूनही सुरू आहेत. गेल्यावर्षीच्या पीकविम्याची चौथ्या टप्प्यातील रक्कमही आॅक्टोबर अखेरीस मिळाली. जे राज्यात घडले, तेच केंद्रातही घडले. ना खाऊंगा.. ना खाने दूँगा... अशा घोषणा करणाºया नरेंद्र मोदी यांच्या सत्ताकाळात सीबीआय या स्वायत्त संस्थेतील अस्थाना आणि वर्मा यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला. इतिहासात हे सर्व पहिल्यांदा घडले होते. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीही माध्यमांसमोर आले होते. जी नोटाबंदी काळा पैसा नष्ट करण्यासाठी केली, त्याने काही फरक पडलेला नाही. काळ्या पैशाची निर्मिती होत राहिली. १५ लाख कोणाच्याही खात्यात पडले नाहीत. परकीय खात्यातील पैसा आला नाही. सर्व काही बोलाचा भात आणि बोलाची कढी राहिली. अलिकडच्या काळात इंधन दरवाढीने सर्वसामान्यांना हैराण केले. महिला अत्याचाराच्या आरोपामध्ये मंत्री घरी गेले. हे सर्व प्रश्न काँग्रेसच्या नेत्यांनी जनसंघर्ष यात्रेत उचलून धरले. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात झालेल्या जनसंघर्ष यात्रेचा औरंगाबादेत समारोप झाला. विशेष म्हणजे काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्यातील अनेक माजी मंत्री लोकभावना समजून घेत राज्याचा दौरा करीत आहेत. माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लातूरमध्ये झालेल्या सभेला प्रचंड गर्दी लोटली होती. तालुक्यांच्या ठिकाणीही मोठ्या सभा झाल्या. औरंगाबादमधील समारोपानंतर मराठवाड्यात काँग्रेस आपले स्थान अधिक बळकट करीत असल्याचे दिसले. मोदी लाटेतही महाराष्ट्रात काँग्रेसने मराठवाड्यातच ताकदीने लढत दिली होती. केंद्रातील आणि राज्यात सत्ता हे बलस्थान असतानाही नांदेडमध्ये काँग्रेसने महापालिकेत एकतर्फी विजय मिळविला. लातूर, उस्मानाबादमध्येही काँग्रेस नेत्यांमध्ये उत्साह संचारला असून, राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाºया जागाही काँग्रेस लढवू इच्छिते, अशी स्थिती आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसMarathwadaमराठवाडा