शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अन्वयार्थ: अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 06:18 IST

अभियांत्रिकी पदवीसाठी नेमका कुठे प्रवेश घ्यावा, याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये बऱ्याचदा संभ्रम असतो. त्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणात गोंधळही होतो.

प्रा. संदीप ताटेवार, निवृत्त प्राध्यापक, अमरावती

सध्या बऱ्याच नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांना ‘अभिमत विद्यापीठ’ किंवा ‘स्वायत्त संस्था’ असा दर्जा प्राप्त होत आहे. यामध्ये शासकीय व खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांचा समावेश आहे.  काही अभियांत्रिकी महाविद्यालये क्षेत्रीय विद्यापीठाशी संलग्नीत आहेत. अभियांत्रिकी पदवीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना व पालकांना अभिमत विद्यापीठ, स्वायत्त संस्था व विद्यापीठाशी संलग्नीत संस्था यामध्ये काय फरक असतो, कुठे प्रवेश घ्यावा, याबद्दल बऱ्याचदा फारशी माहिती नसल्यामुळे प्रवेश घेताना त्यांची संभ्रमाची स्थिती निर्माण होते. सध्या सीईटी, जेईई, बारावीची परीक्षा आटोपल्यामुळे विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना अभियांत्रिकी पदवी प्रवेशाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. अभिमत विद्यापीठ म्हणजे यूजीसी (युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन) अधिनियम, १९५६ कलम तीन अंतर्गत उच्च शिक्षण विभागाद्वारे नामांकित महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला जातो. हा दर्जा मिळवण्यासाठी सदर महाविद्यालयाला अनेक कसोट्या पूर्ण कराव्या लागतात. अभिमत विद्यापीठाला प्रशासकीय, वित्तीय व शैक्षणिक स्वातंत्र्य असते. शैक्षणिक स्वातंत्र्य म्हणजे  विविध कोर्सेस चालू करणे, त्यासंबंधी अभ्यासक्रम ठरवणे, प्रवेश संख्या व प्रवेश शुल्क निश्चित करणे, स्वत: परीक्षा घेणे, वेळेत निकाल घोषित करणे व स्वतःच्या विद्यापीठाची पदवी देणे, याचे स्वातंत्र्य असते.  स्वायत्त संस्थेत अभिमत विद्यापीठासारखे  बऱ्याच अंशी शैक्षणिक स्वातंत्र्य असते; पण पदवी ही संलग्नीत विद्यापीठाची द्यावी लागते. अभिमत विद्यापीठ व स्वायत्त संस्थेमध्ये उद्योगांच्या सध्याच्या गरजांवर आधारित अभ्यासक्रम विकसित करता येतो, नवीन तंत्रज्ञान शिकवले जाते, अभ्यासक्रमामध्ये  क्रेडिट सिस्टीमचा लाभ घेणे शक्य होते. ही प्रणाली टक्केवारी आणि गुणांऐवजी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी क्रेडिटचा वापर करते. 

अभिमत विद्यापीठातील व  स्वायत्त संस्थांमधील विद्यार्थी इतर शासकीय सेवेसाठी व स्पर्धात्मक परीक्षेसाठी पात्र असतात. विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयात स्वतःचे शैक्षणिक स्वातंत्र्य नसते. शैक्षणिक गोष्टी जवळपास सर्वच असतात. मात्र अभ्यासक्रम ठरवणे, त्यात आवश्यकतेनुसार फेरबदल करणे, निकाल घोषित करणे, याबाबत संलग्नीत विद्यापीठावर अवलंबून राहावे लागते. काही अभिमत विद्यापीठात ज्या अभ्यासक्रमाला जास्त मागणी आहे; उदाहरणार्थ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व तत्सम शाखा जसे की, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, डाटा मॅनेजमेंट, सायबर सिक्युरिटी आदी अभ्यासक्रमांची प्रवेश संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली जाते, तसेच प्रवेश शुल्कात भरमसाठ वाढ केली जाते. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना आस्थापना (प्लेसमेंट) देता येईल का, याबाबत माहिती घेणे  आवश्यक असते.  याबाबत विद्यापीठाच्या भविष्यात काय योजना आहेत, याबाबत जाणून घेणेसुद्धा हिताचे ठरते. कधी-कधी या तिन्ही प्रकारच्या संस्थेमध्ये महाविद्यालयामार्फत विविध कंपनींमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पॅकेज फुगवून सांगितले जावू शकते, तेव्हा त्याची खातरजमा करणे गरजेचे ठरते. अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड करण्यासोबतच कोणती शाखा आपल्या दृष्टीने योग्य राहील, याबाबत विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

आज कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फाॅर्मेशन टेक्नाॅलाॅजी यासारख्या शाखेला जास्त मागणी असली तरी भविष्यात काय स्थिती राहील, याची भविष्यवाणी आज आपण करू शकत नाही. सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकीच्या मूळ शाखा असून, यावरच बांधकाम उद्योग, दूरसंचारण व्यवस्था, कारखाने, विद्युतनिर्मिती व संचारण  या सारख्या  महत्त्वाच्या गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे  या शाखेतील अभियंत्यांची गरज नेहमीच भासणार आहे. विद्यार्थ्यांनी याचाही विचार करावा. 

टॅग्स :Educationशिक्षण