शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

आत्मनिर्भरतेबरोबरच आत्मविश्वासही गरजेचा!

By किरण अग्रवाल | Updated: July 23, 2020 09:46 IST

राज्याच्या काही शहरांमध्ये कोरोनाचा असा काही कहर सुरू आहे, की त्यामुळे भीतीच वाटावी. अशा ठिकाणी सरकारीच नव्हे तर खासगी रुग्णालयातील खाटाही कमीच पडत असल्याने हाउसफुल्लचे बोर्ड लागल्याच्या वार्ता आहेत.

- किरण अग्रवाल

संकटे येतात व जातात; परंतु त्यावर मात करण्याची जिद्द व त्याबाबतचा विश्वास मनात असला तर कोणतेही संकट कुणालाही अडवू शकत नाही. कोणाचे जगणे मुश्कील करू शकत नाही, की कोणाची प्रगती रोखू शकत नाही. सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात व्यावहारिकदृष्टीने दिल्या गेलेल्या आत्मनिर्भरतेच्या संदेशाला आत्मविश्वासाची जोड लाभणे त्यासाठीच गरजेचे आहे. या आजारातून आपण बरे होऊ शकतो, यासंबंधीचा विश्वास जागविण्यासाठी भारतीय जैन संघटनेसारख्या संस्थांनी योजिलेल्या ‘मिशन झिरो’सारख्या उपक्रमांचे महत्त्व म्हणूनच मोठे आहे.राज्याच्या काही शहरांमध्ये कोरोनाचा असा काही कहर सुरू आहे, की त्यामुळे भीतीच वाटावी. अशा ठिकाणी सरकारीच नव्हे तर खासगी रुग्णालयातील खाटाही कमीच पडत असल्याने हाउसफुल्लचे बोर्ड लागल्याच्या वार्ता आहेत. त्यामुळे सामान्य व्यक्ती अधिकच घाबरून जाणे स्वाभाविक ठरले आहे. अर्थात शासन प्रशासनातर्फे ठिकठिकाणी कोविड सेंटर्सची उभारणी करून काळजी घेण्याचे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेतच, मात्र बाधितांची संख्या अशा वेगाने वाढते आहे की, या यंत्रणा अपुऱ्या पडाव्यात. परिणामी कोरोनाची तपासणी व त्याचे निदान सोडाच; परंतु अन्य आजारांसाठी रुग्णालयाची पायरी चढणेदेखील अनेकांसाठी मुश्कील बनले आहे. कसे होईल आपले, अशी भीती अनेकांच्या मनात दाटली आहे. या भीतीमधून रक्ताच्या नातेसंबंधातील रुग्णांकडेसुद्धा काही ठिकाणी दुर्लक्ष होताना दिसत आहे, त्यामुळे सामाजिक पातळीवरील संबंधांचे नवेच प्रश्न आकारास येऊ पहात आहेत. अशा स्थितीत सामाजिक भान जपत प्रत्येकच अडीअडचणीच्या वा संकटाच्या काळात मदतीसाठी धावून येणा-या भारतीय जैन संघटनेने पुन्हा पुढे येत व शासनाला मदतीचा हात देत सेवा कार्यास जुंपून घेतले आहे, त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.

खरे तर अलीकडच्या काळात अनेक सामाजिक संघटना या केवळ त्यांच्या नेत्यांच्या नेतृत्वासाठी अस्तित्वात असल्याचे प्रकर्षाने दिसून येते, त्यामुळे सामाजिक कामांचे संदर्भही बदलून गेलेले दिसून येतात; परंतु भारतीय जैन संघटनेने आपल्या सेवाकार्याच्या बळावर निस्पृहतेचा वेगळा ठसा उमटविण्यात यश मिळविले आहे. या संघटनेचे अर्ध्वयू शांतिलाल मुथा या व्यक्तीची या संघटनेमागील प्रेरणा व ऊर्जा स्तिमित करणारीच आहे. मनाची संवेदनशीलता काय असू शकते व त्यातून ‘एैसी कळवळ्याची जाती’ याचा प्रत्यय कसा येऊ शकतो, हे मुथा यांच्याकडे पाहून कळावे. त्यामुळेच जिथे शासन प्रशासनही एकटेच पडताना किंवा त्यांना मर्यादा आलेल्या दिसून येतात, तिथे मुथा यांची संघटना धावून जाताना दिसून येते. सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यांपासून ते लातूरच्या किल्लारी व सास्तूरमध्ये झालेल्या भूकंपाच्या घटनेनंतर तेथील मदतकार्यासाठी धावून जाण्यापर्यंतची या संघटनेच्या सेवेची उदाहरणे देता येणारी आहेत. दूर कशाला जायचे, गेल्या दोनेक वर्षापूर्वी दुष्काळी स्थितीला सामोरे जावे लागू नये म्हणून अभिनेते आमीर खान यांच्या पानी फाउण्डेशनच्या सहकार्याने व स्थानिक नागरिकांच्या श्रमदानाने या संघटनेने अनेक ठिकाणी तलावांमधील गाळ उपसून पाणी साठवण्यासाठीची जी मोहीम हाती घेतली होती व त्यासाठी शेकडो जेसीबी उपलब्ध करून दिले, ते अजूनही जनतेच्या विस्मृतीत गेलेले नाही. कोरोनाचेच घ्या; लॉकडाऊन झाल्यावर स्थलांतरितांचे जे लोंढे गावाकडे परतू लागले होते त्यांच्या जेवणा-खाण्यासाठी व हातावर पोट असणाऱ्यांच्या उदरनिर्वाहासाठी या संघटनेने जागोजागी अन्नछत्र चालवून लाखोंच्या तोंडी जो घास भरवला ते तर ताजे उदाहरण आहे.

एवढ्यावर न थांबता भारतीय जैन संघटना आता कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठीही पुढे आली असून, फोर्स मोटर्सच्या सहकार्याने या संघटनेने सुमारे ४९ शहरांमध्ये २७९ मोबाइल डिस्पेंसरी व्हॅन्सच्या माध्यमातून कोरोनामुक्तीसाठीचा ‘मिशन झिरो’ उपक्रम हाती घेतला आहे. महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य सामाजिक संस्थांना सोबत घेऊन सुरू करण्यात आलेल्या या मिशनमुळे संशयित रुग्णांचे ट्रेसिंग होऊन व त्यांना वेळेवर उपचार मिळून कोरोनामुक्तीकडील त्यांची वाटचाल सुलभ होण्यास मदत होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे निदान व उपचार वेळेवर झाल्यास जनसामान्यांच्या मनात असलेली भीती दूर होऊ शकेल. आजच्या संकटसमयी कोरोनाबाबत मनामनात घर करून असलेली भीती दूर होणेच प्राधान्याचे आहे. भीतीने मनुष्य खचतो, म्हणून संकटाशी लढण्याची जिद्द व आत्मविश्वास त्यामध्ये जागवणे गरजेचे आहे. त्याचसाठी कोरोनाला घाबरू नका तर त्याला धैर्याने सामोरे जा असा संदेश देत आत्मविश्वास जागविण्याकरिता हे मिशन हाती घेण्यात आल्याचे शांतिलाल मुथा यांनी म्हटले आहे. तेव्हा हे मिशन तडीस जावो आणि शासन तसेच सामाजिक संस्था-संघटनांच्या परस्पर सहकार्यातून कोरोनाच्या भयापासून मुक्ती मिळो याच अपेक्षा.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashikनाशिक