शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

जनतेशी संवाद, मात्र परस्परांतच विसंवाद!

By किरण अग्रवाल | Updated: September 10, 2023 11:48 IST

Politics : यंदा निवडणुकीत उमेदवारीच्या रिंगणात कोण कोणाकडून असेल, याचीच मोठी उत्सुकता आहे.

- किरण अग्रवाल

पावसाअभावी शेतकऱ्यांच्या कोमेजलेल्या आशांना जिवंत करण्याचे काम दीर्घ प्रतीक्षेनंतर गेल्या आठवड्यात आलेल्या पावसामुळे घडून आले, त्याचप्रमाणे आगामी निवडणुकीच्या रणांगणात नशीब आजमावू पाहणाऱ्यांसोबतच त्यांचे भाग्य ठरविणाऱ्या मतदारांमध्येही सक्रियता व उत्साह भरण्याचे काम राजकीय कार्यक्रमांमुळे पश्चिम वऱ्हाडात घडून आल्याचे म्हणावे लागेल. 

‘हो ना, हो ना’ करता करता मेहकरची जागा बदलून बुलढाण्यात का होईना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रम घेतला गेला. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद यात्रेपाठोपाठ विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांचीही संवाद यात्रा पश्चिम वऱ्हाडात येऊन गेल्याने राजकीय माहौल तापून गेला आहे. राज्यात ट्रिपल इंजिनचे सरकार आहे तसे विरोधात ट्रिपल पक्षांची महाआघाडी आहे. त्यामुळे यंदा निवडणुकीत उमेदवारीच्या रिंगणात कोण कोणाकडून असेल, याचीच मोठी उत्सुकता आहे. ऐनवेळीच ते स्पष्ट होणार असले, तरी सर्वांनीच राजकीय मशागतीस प्रारंभ करून दिला आहे. बावनकुळे व वडेट्टीवार यांच्या यात्रा त्याचदृष्टीने नांगरणीसाठी येऊन गेल्याचे म्हणता यावे.

बावनकुळे यांनी चिखली, खामगावात जनसंवाद साधला; मात्र जालन्यातील उपोषणकर्त्या मराठा बांधवांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराचे पडसाद पाहता अकोल्यातील दौऱ्यात पदयात्रा टाळून पक्ष कार्यकर्त्यांची बैठक व काहींच्या व्यक्तिगत भेटीगाठी घेतल्या. या यात्रेनिमित्त भाजपातील सारे नेते पुन्हा एकवटलेले दिसून आले असले तरी व्यासपीठावर एकाच गुलाबी हारात गुंफलेल्या स्थानिक नेत्यांमधील विसंवाद अकोलेकरांपासून लपलेला नाही. तेच चित्र वडेट्टीवार यांच्या यात्रेनिमित्त काँग्रेसमध्ये बघायला मिळाले. वडेट्टीवार यांच्या अकोला दौऱ्यापूर्वी अवघ्या तीन-चार दिवस अगोदरच अकोटमध्ये पक्षातील जुन्या जाणत्या नेत्यांची एक बैठक होऊन त्यात विद्यमान जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांच्याविरुद्ध अविश्वासाची चर्चा केली गेली असली, तरी वडेट्टीवारांसोबतच्या व्यासपीठांवर मात्र आजी माजी सारेच नेते परस्परांचा हात हाती घेत वावरल्याचे पाहावयास मिळाले. 

अकोल्याच्या काँग्रेसमध्ये जितके नेते तितके गट झाल्याची वास्तविकता आहे. नेते अधिक झाले; परंतु, कार्यकर्त्यांची वानवा आहे. १९८९ पासून लोकसभेतील अकोल्याची जागा काँग्रेसच्या हातून जी गेली ती पुन्हा येऊ शकलेली नाही. मात्र, अशाही स्थितीत या पक्षाकडून आजही ही जागा लढविण्यासाठी महाआघाडीअंतर्गत दावा केला जातो हे विशेष. 

विधान परिषदेतील पदवीधर मतदारसंघात गेल्यावेळी काँग्रेसला अनपेक्षितपणे लॉटरी लागली. भाजपतील अंतस्थ नाराजीमुळे काँग्रेसला हे यश लाभले. आताही एकूण राजकारण बघता महाआघाडीला हायसे वाटावे असे चित्र आहे; पण त्या वातावरणावर स्वार होत आगेकूच करण्यात स्थानिक काँग्रेसचे नेते कमी पडत आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील काँग्रेस अंग झटकून कामाला लागलेली दिसत आहे, तसे अकोला जिल्ह्यात दिसत नाही. निवडणूक काळातील लाभाची गणिते लक्षात घेता पक्षाची सूत्रे आपल्याच हाती यावीत, म्हणून काहींनी उचल खाल्ल्याचे चित्र समोर येत आहे. सारांशात, सर्वपक्षीय संवाद वाढला असून निवडणुकीसाठीची अस्त्रे परजली जाऊ लागली आहेत. अशात ‘जो जीता वही सिकंदर’ या न्यायाने जो सक्रियता दर्शवेल त्याच्याच वाट्याला अच्छे दिन येणार हे नक्की असले तरी, त्यासाठी अगोदर स्वकीयांतील विसंवाद दुर होणे गरजेचे आहे.   

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण