प्रतिबद्धता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 05:31 AM2018-12-25T05:31:07+5:302018-12-25T05:31:27+5:30

नदीला वाहण्यास दोन किनारे लागतात. वाहणारी नदी आणि पूर यात हा फरक आहे की नदीत वाहणारे पाणी हे नियंत्रित असते; मात्र पुरात त्या पाण्याला कसलीही दिशा नसते. आपल्या जीवनऊर्जेला वाहण्यासाठीही एक दिशा हवी असते.

 Commitment | प्रतिबद्धता

प्रतिबद्धता

googlenewsNext

- श्री श्री रवीशंकर

नदीला वाहण्यास दोन किनारे लागतात. वाहणारी नदी आणि पूर यात हा फरक आहे की नदीत वाहणारे पाणी हे नियंत्रित असते; मात्र पुरात त्या पाण्याला कसलीही दिशा नसते. आपल्या जीवनऊर्जेला वाहण्यासाठीही एक दिशा हवी असते. आजकाल बहुतांश लोक गोंधळलेले दिसतात. कारण त्यांच्या जीवनाला काही दिशाच नाही. जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपल्यात जीवनऊर्जा भरभरून असते; पण तिला योग्यपणे मार्ग मिळाला नाही, तर ती अडकून जाते. ती साचू लागली की कुजायला लागते. जीवनऊर्जा योग्य कार्यरत होण्यासाठी प्रतिबद्धता आवश्यक आहे. प्रतिबद्धता असली की जीवन दौडू लागते. आयुष्यातला सर्व छोट्या- मोठ्या गोष्टींचे निरीक्षण कराल, तर ते विशिष्ट वचनबद्धतेने साकार होताना दिसेल. एक विद्यार्थी शाळेत किंवा कॉलेजमध्ये वचनबद्ध होत प्रवेश घेत असतो. हे सांगण्याची गरज नाही, की एक परिवारसुद्धा वचनबद्ध होऊनच चालत असतो. आई आपल्या बाळासाठी वचनबद्ध असते. पती आपल्या पत्नीसाठी आणि पत्नी आपल्या पतीसाठी वचनबद्ध असते. जेवढी प्रतिबद्धता मोठी तेवढे अधिकारही मोठे असतात आणि गोष्टी साध्य करणे तेवढेच सोपे जाते. छोट्या प्रतिबद्धतेने आपल्याला गुदमरायला होते. कारण आपली क्षमता जास्त असते. जेव्हा आपण अनेक कामे हाती घेतो, तेव्हा त्यातील एक काम जरी बिघडले, तरी आपण दुसऱ्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतो, त्यामुळे त्या बिघडलेल्या कामाचा तेवढा परिणाम आपल्यावर होत नाही. उलट, आपण एकच काम हाती घेतले आणि त्यात गडबड झाली, तर त्यामुळे आपल्या कामावर त्याचा मोठा फरक पडतो.

सहसा आपली प्रतिबद्धता उपलब्ध संसाधनावर निश्चित करतो. मात्र अनुभवांवरून असे सांगता येईल की, आपण जेवढी मोठी प्रतिबद्धता घेतो, तेवढी संसाधने आपोआप प्राप्त होऊ लागतात.
आपण ज्या कोणत्या गोष्टींसाठी वचनबद्ध असतो, त्याने आपल्याला अजून सामर्थ्य लाभते. जर तुम्ही आपल्या परिवारासाठी वचनबद्ध आहात तर तुमचा परिवार नेहमीच तुम्हाला आधार देत राहील. जर तुम्ही समाजासाठी वचनबद्ध आहात तर समाजाचा आधार तुमच्यामागे असतोच. दीर्घकाळाचा परिणाम बघता, वचनबद्धता तुमच्यासाठी नेहमी समाधानच घेऊन येते. प्रत्येकाने हे जग आपल्यासाठी अधिक सुंदर करण्यास वचनबद्ध राहायला हवे.
तुम्ही आपल्या अंतरंगाशी जुळून राहिलात तर सार्या जगाचे तुम्ही प्रियतम व्हाल. चेतना ही ह्या भौतिक जगाची प्रियतम आहे, आण िभौतिक जग चेतनेचे प्रियतम आहे. ते एकमेकांसाठीच बनलेले आहे. ते एकमेकांना धरून ठेवतात. जर तुम्ही चेतनेचा आदर ठेवला नाहीत, तर भौतिक जगही सुखमय रहात नाही. जर तुम्ही चेतनेचा आदर ठेवलात तर तुम्ही जगाचीही काळजी घेत असता, जेव्हा तुम्ही जगाची काळजी घेता, तेव्हा सारे जग तुमची काळजी घेत असते.
तुम्ही स्वप्ने पाहिल्याशिवाय ती प्रत्यक्षात उतरवू शकत नाही. प्रत्येक शोध हा त्याची स्वप्ने पाहिल्यावरच साकार झालेला आहे. अशक्याची स्वप्ने बघा. अर्थातच, स्वप्ने बघितल्यानेच तुम्ही आपल्या आकलनाच्या क्षमतेपलीकडे जाऊन कार्य करू लागता. तुमच्या स्वप्नांसाठी मार्गदर्शक ठरेल अशा विद्याशाखेचा विचार करा. काही स्वप्नांनी तुमच्या रोजच्या जगण्यावर परिणाम केलेला असतो, आण िइतर स्वप्ने तशी नसतात. काही स्वप्ने तुम्हाला आठवत असतात तर काही विसरली जातात.
आपण सार्यांनीच ह्या जगात काहीतरी अद्भुत आण िअनोखे कार्य करण्यासाठी जन्म घेतलेला आहे. ही संधी वाया जाऊ देऊ नका. स्वत:ला मोठी स्वप्ने बघायला आण िमोठे विचार करायला स्वातंत्र्य द्या. तुमची अत्यंत प्रिय स्वप्ने साध्य करण्याचे धैर्य आण िदृढनिश्चय ठेवा. बरेचदा मोठी स्वप्ने बघणार्या लोकांचा उपहास केला गेला, पण आपले ध्येय साध्य करण्यासाठी ते खंबीर राहिले.
काहीतरी सृजनात्मक करा. कोणतेही वर्ष काहीतरी सृजनात्मक कार्य पार पाडल्याशिवाय सरून जाऊ नये.

Web Title:  Commitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.