शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
3
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
4
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
5
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
6
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
7
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
8
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
9
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
10
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
11
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
12
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
13
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
14
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
15
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
16
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
17
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
18
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
19
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
20
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा

विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?

By यदू जोशी | Updated: June 27, 2025 06:56 IST

अजितदादांपेक्षा एकनाथ शिंदे यांच्या मनात असुरक्षिततेची भावना अधिक असणे साहजिकच; शिवाय शिंदे अजून उपमुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत रुळलेले नाहीत!

- यदु जोशी (सहयोगी संपादक, लोकमत)एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस-अजित पवार उपमुख्यमंत्री होते तेव्हा ‘या दोघांबाबत माझी भूमिका ट्राफिक पोलिसाची असते,’ असे फडणवीस एकदा म्हणाले होते. आता  त्यांना मुख्यमंत्री म्हणून या दोघांबाबत अधूनमधून ट्राफिक पोलिसाच्या भूमिकेत जावे लागत आहे. 

भाजप हा राष्ट्रीय पक्ष, त्याचे दोन्ही मित्रपक्ष प्रादेशिक. राज्याच्या राजकारणातील आपली स्पेस वाढविण्याचे प्रयत्न शिंदे-अजित पवार करत राहतील आणि त्यातून दोघांमध्ये संघर्षाचे प्रसंग उद्भवत राहतील. त्यामुळे फडणवीस यांना मध्यस्थी करावीच लागणार आहे.  

‘विकासकामांसाठी आमच्या मतदारसंघांना अजित पवार निधी देत नाहीत,’ अशी तक्रार शिंदेसेनेच्या आमदारांनी मध्यंतरी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली होती. अशीच तक्रार घेऊन ते फडणवीस यांनाही अधूनमधून भेटत असतात आणि मग फडणवीस त्यांच्या समाधानासाठी पुढाकार घेतात.

अजित पवारांपेक्षा एकनाथ शिंदे यांच्या मनात असुरक्षिततेची भावना अधिक  असणे साहजिक आहे. एकतर शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद गेले, त्यामुळे ते अजूनही उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत रुळलेले नाहीत. 

अजित पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून राहण्याची सवय आहे. त्यातच वित्त खाते हे अजित पवार यांच्याकडे आहे आणि बाहेर त्यांची काहीही प्रतिमा असली तरी सरकारी तिजोरीच्या वित्तीय शिस्तीबाबत ते अतिशय काटेकोर असतात.  

शिंदे मुख्यमंत्री असताना एमएसआरडीसीसारख्या त्यांच्या खात्यात घेतलेले आर्थिक निर्णय अजित पवार यांना खटकत आहेत आणि त्यातूनच ते एमएसआरडीसीमार्फत सुरू असलेले प्रकल्प, त्यांची देणी आणि त्यानिमित्ताने येणारा आर्थिक भार असे सगळे स्वतंत्रपणे तपासायला निघाले आहेत म्हणतात. 

तसे तर सार्वजनिक बांधकाम खात्यात आणि सार्वजिनक आरोग्य खात्यात शिंदे सरकारच्या काळात झालेला खर्च हा विषयही अजित पवारांच्या रडारवर असल्याचे सांगितले जाते.  ही खाती अनुक्रमे रवींद्र चव्हाण आणि तानाजी सावंत यांच्याकडे होती. त्यात अजितदादा किती हात घालतात ते पाहायचे. 

मित्रा संस्थेचे प्रमुख आणि मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांना दिलेले अधिकार आणि त्यातून वित्त खात्यावर येत असलेली गदा यावरून अजित पवार अस्वस्थ असल्याचीही माहिती आहे. परदेशी यांना जादा अधिकार देणारा जीआर अजित पवारांच्या कार्यालयाला खूपच खटकला आहे म्हणतात. याबाबत अजितदादा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत असल्याचे दिसते. 

- अजित पवार-एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष वाढविण्याच्या उद्देशाने माध्यमे ही वित्त विभागाच्या शेऱ्यांचे दाखले देतात, मुळात ते वित्त सचिवांचे शेरे असतात, अजित पवार यांचे नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे. 

अर्थपूर्ण व्यवहार? 

भाजपचे पश्चिम महाराष्ट्रातील एक आमदार.  त्यांच्या मतदारसंघातील एका तृतीय श्रेणी कर्मचाऱ्याबाबतची सुनावणी एका मित्रपक्षाच्या राज्यमंत्र्यांकडे होती. आमदार त्या कर्मचाऱ्याला घेऊन गेले राज्यमंत्र्यांकडे. 

राज्यमंत्री म्हणाले, चिंता करू नका, मी याचे काम लगेच करतो. आमदारांनाही बरे वाटले. चार-पाच दिवसांनी ‘राज्यमंत्री कार्यालयातून बोलतो,’ असे सांगून त्या कर्मचाऱ्याला एक फोन आला आणि तीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली. 

‘मुंबईत येऊन भेटा,’ म्हणून सांगितले, तो कर्मचारी त्यानुसार मुंबईत येऊन भेटला, त्याने पैसे दिले की नाही ते माहिती नाही; पण, त्याचे काम झाले. त्या कर्मचाऱ्याला ज्याने फोन केला, तो खरेच राज्यमंत्री कार्यालयात आहे का याची चौकशी होण्याची गरज आहे.  

मंत्र्यांकडील सुनावणी आणि त्या आडून होणारे अर्थपूर्ण व्यवहार हा विषय जुनाच आहे, तो आताही सुरूच असल्याचे जाणवत राहते.

भास्कर जाधवांची नाराजी

उद्धवसेनेचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव का नाराज आहेत? त्यांना  विरोधी पक्षनेतेपद देण्याची भाजपची तयारी आहे म्हणतात; पण, मातोश्रीवरून एनओसी मिळत नाही. जाधव अभ्यासू आहेत, विधिमंडळ कामकाजातील खाचखळगे, नियम त्यांना नेमकेपणाने कळतात; पण, नेहमी हुशार माणसांनाच संधी मिळते असे कुठे आहे? 

‘फडणवीस यांना भास्कर जाधव चालतात’ याचा अर्थ ते पुढेमागे फडणवीस यांच्या कलाने चालू शकतात, असे मातोश्रीच्या कानात सांगून जाधव यांचा पत्ता कट करण्याचे चालले आहे. आशिष जयस्वाल हे फडणवीसांचे जवळचे आहेत, असे सांगून त्यांचे कॅबिनेट मंत्रिपद कट करण्यात शिंदेसेनेतल्या काहींना यश आले होतेच. तसेच आता जाधव यांच्याबाबत उद्धवसेनेत घडत आहे.yadu.joshi@lokmat.com

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुतीBJPभाजपाPoliticsराजकारण