शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

आम्ही ९१ हजार टन काॅफी दरवर्षी पित आहाेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 10:47 IST

भारतात मध्यमवर्गाचं प्रमाण मोठं आहे आणि पैसे खर्च करण्याची त्यांची क्षमताही. कारण चहाच्या एका कपाच्या तुलनेत कॉफी नक्कीच महाग आहे. 

श्रुति गणपत्ये मुक्त पत्रकार

कॉफी हे सत्य शोधणाऱ्यांचं पेय आहे. ती केवळ शरीरालाच नव्हे तर आत्म्यालाही जागं करते,’ असा एक वाक्प्रचार सुफी साहित्यामध्ये वापरला जातो. सध्याच्या मार्केटिंगच्या जमान्यात या ओळी कॉफीला जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत नेण्यासाठी एकदम चपखल आहेत. पारंपरिक चहा पिणाऱ्या भारताच्या शहरी भागांमध्ये साधारण २०१२ पासून कॉफीचा ट्रेंड वाढतो आहे. कॉफी बोर्ड ऑफ इंडियानुसार, २०१२ मध्ये ८४,००० टन कॉफी भारतात प्यायली जायची ती २०२३ मध्ये ९१,००० टनावर गेली आहे.

मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरू वगैरे मोठ्या शहरांमध्ये अनेक ब्रँड्सचे कॅफे सुरू झाले आहेत. केसी, अल ब्यूनो, फ्रॅक्शन ९, कॉपी कोत्ताई, देवान्स, ७,००० स्टेप्स, ग्रेसोल असे फक्त रोस्टर वेगळेच आहेत. तिथली कॉफी ऑनलाइनच मिळते. या कॉफी पारंपरिक इन्स्टंट कॉफीसारख्या नाहीत की पाण्यात किंवा दुधात मिसळली आणि कॉफी तयार. कॉफी बनवण्याच्याही विविध पद्धती आहेत.

भारतात प्रसिद्ध असणारी फिल्टर कॉफीसुद्धा एका विशिष्ट पद्धतीने बनवली जाते. मुळात कॉफीचा ट्रेंड भारतात सुरू होण्याचं कारण म्हणजे तरुणांमध्ये असलेला पाश्चिमात्य संस्कृती, सोशल मीडियाचा प्रभाव आणि मार्केटिंग. तसेच आजकाल सर्वच हेल्थ एक्सपर्ट ब्लॅक कॉफीचं महत्त्व सांगतात. त्यामुळे ब्लॅक कॉफीकडे वळणारे लोकही जास्त आहेत.

भारतात मध्यमवर्गाचं प्रमाण मोठं आहे आणि पैसे खर्च करण्याची त्यांची क्षमताही. कारण चहाच्या एका कपाच्या तुलनेत कॉफी नक्कीच महाग आहे. 

कॉफी पिणं हा झाला लाईफस्टाइलचा भाग

कॉफी बनवण्यासाठी विशिष्ट पद्धत असते, त्यासाठी फ्रेंच प्रेस, मेक्का पॉट अशी उपकरणं लागतात. अरेबिका किंवा रोबस्टा बियांवरूनही कॉफीची किंमत ठरते. त्या ठराविक तापमानावर भाजलेल्या लाइट, मिडियम किंवा डार्क रोस्ट, त्यांची पावडर बनवताना जाड, बारीक, एकदम बारीक या सर्वांवर कॉफीची चव ठरते. या बिया एकाच ठिकाणाहून म्हणजे सिंगल ऑरिजन आहेत की, ब्लेंड म्हणजे मिक्स केलेल्या आहेत यावरही त्याची चव आणि किंमत ठरते. म्हणजे पोअर ओव्हर ब्लॅक कॉफीसाठी मिडिअम रोस्ट आणि थोडी जाडसर कॉफी, मोक्का पॉटमध्ये प्रेशरने ब्रूइंग होते, त्यामुळे हलकं रोस्ट आणि एसप्रेसोपेक्षा जाडसर कॉफी, फ्रेंचप्रेससाठी जास्त जाडसर अशा पद्धती जगभर वापरतात.

मुळात कॉफीचं मार्केंटिंग करताना कॉफी हा एक अनुभव असल्याचं ग्राहकांच्या गळी उतरविण्यात आलंय. ती हळूहळू चव घेत पिणं, कॅफेटेरियामध्ये काम करता करता कॉफी पिणं हा आता ठराविक वर्गाच्या लाईफस्टाइलचा भाग झाला आहे. कॅफेटेरिया हे भेटण्याचे, रेंगाळण्याचे, गप्पा मारण्याचे अड्डे झालेत. वर्क फ्रॉम होमच्या कल्चरमध्ये तर कॅफेजची संकल्पना फिट्ट बसते. 

दोन कप कॉफी, एखादं सँडविच किंवा क्रॉसाँ मागवून दिवसभर काम करता येतं. कॉलेजच्या लायब्ररीपेक्षा जेनझीला कॅफेमध्ये बसून अभ्यास करणं जास्त “कूल” वाटतं. कॉफी शॉप निवडताना त्याचा ‘लूक’ आणि ‘ॲस्थेटिक्स’ पाहतात. साधारण ९ व्या शतकामध्ये मध्य आशियात शोध लागलेली कॉफी भारतात आता स्थिरावू पाहतेय.  

टॅग्स :Indiaभारत