शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

चीनची असहिष्णुता

By admin | Updated: July 5, 2014 10:42 IST

चीन सरकारने आपल्या झिजियांग प्रांतातील मुस्लिम जनतेला रमजानचा पवित्र महिना न पाळण्याचे व रोजे (उपवास) न करण्याचे सक्त आदेश काढले आहेत.

चीन सरकारने आपल्या झिजियांग प्रांतातील मुस्लिम जनतेला रमजानचा पवित्र महिना न पाळण्याचे व रोजे (उपवास) न करण्याचे सक्त आदेश काढले आहेत. झिजियांग हा मुस्लिमबहुल प्रांत आहे आणि जगभरच्या मुसलमानांप्रमाणेच तिथले मुसलमानही रमजान पाळतात व श्रद्धापूर्वक रोजेही ठेवतात. मार्क्‍सच्या मते, धर्म ही अफूची गोळी आहे आणि जगभरच्या कम्युनिस्टांनी ती नाहीशी करण्याचा शर्थीने प्रयत्नही केला आहे. रशिया आणि चीन यांच्या जुन्या कम्युनिस्ट सरकारांनी चर्चवर बंदी आणली, कन्फ्युशियस व बुद्धाची मंदिरे बंद पाडली. धर्मगुरूंना बेड्या ठोकल्या आणि पूजास्थानी येणार्‍यांना कठोर शिक्षा ठोठावल्या. शिक्षणातून धर्म हद्दपार केला आणि मुला-मुलींवर कोणतेही धार्मिक संस्कार होणार नाहीत, याची पोलिसी दक्षता घेतली. माओ-त्से-तुंग तर त्याच्या अखेरच्या काळापर्यंत चीनमधील धर्ममंदिरे पाडण्याच्या वा बंद ठेवण्याच्या उद्योगातच गढला होता. कम्युनिस्टांचे दुर्दैव हे, की जगभरच्या त्यांच्याच अनुयायांनी त्या पक्षाचा हा धर्मविषयक विचार पुढे नाकारला. रशियाने कम्युनिझमला पहिली मूठमाती दिली. पाठोपाठ पूर्व रशियातील कम्युनिस्टांच्या राजवटीही कोसळल्या. कम्युनिस्ट विचारसरणीने आपला देश दरिद्री व मागे ठेवल्याची जाणीव झालेल्या डेंग या चिनी नेत्याने माओच्या मृत्यूनंतर चीनमधील कम्युनिझमचीही वाट लावली. काही काळापूर्वी चीनच्या राजवटीने आपल्या सरकारी यंत्रणेमार्फत देशातील ३ हजार लोकांना दोन प्रश्न विचारले. त्यांतला पहिला होता, हुकूमशाही आणि लोकशाही यांतले चांगले काय.? लोकांनी उत्तर दिले, लोकशाही. दुसरा प्रश्न होता, एकपक्षीय राजवट चांगली की बहुपक्षीय.? लोकांनी उत्तर दिले, बहुपक्षीय. यावर तशी सर्वेक्षणे घेण्याचा नादच त्या सरकारने सोडला. या पार्श्‍वभूमीवर, झिजियांग प्रांतातील त्या सरकारची कारवाई पाहिली, की जुन्या कडव्या कम्युनिस्ट विचारसरणीची काही माणसे तेथे अजून सत्तेत उरली असावीत, असे वाटू लागते. झिजियांग प्रांत हा तसाही चीनमध्ये अजून पुरता मुरलेला प्रदेश नाही. तिबेटमध्ये जशी अधूनमधून बंडे उद््भवतात आणि चीनचे राज्यकर्ते ती कठोरपणे दडपून टाकतात, तसे त्यांना झिजियांगमध्येही करावे लागते. या प्रांतात सामान्यपणे दर दोन वर्षांनी एक बंड उभे होते. त्याचे स्वरूप मुळात राजकीय आणि वरवर पाहता धार्मिक असते. या प्रांताला जास्तीची स्वायत्तता आणि स्वातंत्र्य हवे आहे. चीनमधील बहुसंख्य जनतेची श्रद्धा कन्फ्युशियसवर व त्याच्या धर्मावर आहे. त्याखालोखाल तेथे बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. मुसलमानांची संख्या र्मयादित व काही प्रांतांतच तेवढी शिल्लक आहे. या वर्गाला त्याचे धार्मिक स्वातंत्र्य व सामाजिक अधिकार हवे आहेत. चीन हा संघटित हुकूमशाही असलेला व धार्मिक विधींना अजूनही पुरते स्वातंत्र्य न देणारा देश आहे. झिजियांग प्रांताची धार्मिक मागणी मान्य केली, तर देशातील इतरही प्रांत तशी मागणी करतील आणि त्यातून उभा होणारा उठाव केवळ धार्मिकच नव्हे, तर राजकीय क्रांती घडवून आणेल, याची तेथील राज्यकर्त्यांना भीती आहे. तिबेटमध्ये लामांचे बौद्धधर्मी अनुयायी आहेत आणि ते नि:शस्त्र व शांतताप्रिय आहेत. मात्र, त्यांच्यातील असंतोष जेव्हा संघटित होतो, तेव्हा केंद्रसत्तादेखील हादरल्यासारखी होते. त्यामुळे छोटेसे बंड मोडून काढायलाही चीनचे सरकार तिबेटमध्ये मोठय़ा फौजा तैनात करते. या फौजांनी केलेल्या भीषण अत्याचाराच्या कहाण्या अंगावर शहारे आणणार्‍या आणि हुकूमशाही राजवट केवढी पाशवी होऊ शकते ते सांगणार्‍या आहेत. झिजियांग प्रांतातील आजवरचे उठावही चीन सरकारने अशाच पाशवी पद्धतीने मोडून काढले आहेत. तरीही त्या सरकारला वाटणारी खरी भीती धार्मिक प्रेरणांची आहे. श्रद्धेने दिलेल्या प्रेरणा सहसा मरत नाहीत आणि त्या पुन:पुन्हा आपले डोके नव्या सार्मथ्यानिशी वर काढत असतात. सार्‍या अरब देशांनी हा अनुभव घेतला आहे. तो रशियाच्या वाट्याला आला आहे. जे देश एका धर्माचे वा धर्मविरोधाचे कडवे राजकारण करतील, त्यांच्या वाट्याला अटळपणे येणारे हे प्राक्तन आहे. समाज विचारांनी मोठा होतो; पण साराच्या सारा समाज विचारांसाठी आपल्या श्रद्धा सोडायला क्वचितच कधी तयार होतो. त्याने त्या सोडल्या असे दिसले, तरी तो त्याने केलेला देखावा असतो. रशियाने याचा अनुभव याआधी घेतलेला आहे आणि चीन आता तो घेत आहे.