‘छोटा भीम’ची भुरळ

By Admin | Updated: November 9, 2014 01:26 IST2014-11-09T01:26:35+5:302014-11-09T01:26:35+5:30

‘मुलांनी अभ्यास करायचा, नको त्या गोष्टीत लक्ष घालायचं नाही. काय ते आईबाबा ठरवतील’ हे वाक्य एखादा हुकूम व्हावा तसा ऐकू येण्याचा एक काळ होता.

'Chhota Bhim's love' | ‘छोटा भीम’ची भुरळ

‘छोटा भीम’ची भुरळ

‘मुलांनी अभ्यास करायचा, नको त्या गोष्टीत लक्ष घालायचं नाही. काय ते आईबाबा ठरवतील’ हे वाक्य एखादा हुकूम व्हावा तसा ऐकू येण्याचा एक काळ होता. ते वाक्य कानी पडलं की मुलांनाही फारसा पर्याय नसे. ती बिचारी शाळेच्या पुस्तकात डोकं घालून आपलं म्हणणं गुंडाळून ठेवत. ज्यांचा जन्म 1921 ते 197क् या 5क् वर्षात झाला आहे ते आज वयाची चाळिशी ओलांडून पुढे गेले आहेत. त्यांच्या बालपणी ‘अभ्यासात लक्ष घालायचं, परीक्षा जवळ आलीय’ हे वाक्य दर तासाला टोल पडावा तसं कानी पडल्याचं बहुतेक मंडळी सांगतील. पण ज्यांचा जन्म 2क्क्क् ते 2क्1क् या दशकातला आहे, म्हणजे साडेतीन वर्षे ते 14 वर्षे या वयोगटातली आजची जी मुले आहेत, त्यांनी कुठे लक्ष घालायचं हे फक्त आई-बाबांनी (किंवा आजच्या मम्मी-डॅडनी) ठरवायचं, अशी स्थिती नाही. याचं कारण आजच्या मुलांना अमुक कळत नाही म्हणून त्यांनी बोलायचं नाही, असं म्हणण्यासारखी परिस्थितीच मुळात नाही. 
 
गुगल कंपनी आता 13 वर्षाखालील मुलांना स्वतंत्र गुगल अकाउंट देऊन त्यांना स्वतंत्रपणो जीमेल, यू टय़ुब वगैरे वापरता येईल, अशी व्यवस्था करणार असल्याच्या बातम्या गेल्या महिन्यात झळकल्या आहेत. 13 वर्षाखालील मुलांविषयीची माहिती (डेटा) त्यांच्या पालकांच्या अनुमतीशिवाय गोळा करता येत नाही, अशा प्रकारचा कायदा अमेरिकेत आहे. त्यामुळे पालकांना बाजूला ठेवून गुगल कंपनी मुलांना स्वतंत्र अकाउंट कसं देऊ शकेल, अशी चर्चा सध्या जगभर चालू आहे. 
 
प्रथम अमेरिकेत आणि आता भारतासारख्या देशातही पाय रोवलेल्या मॅक्डोनल्ड्ससारख्या कंपन्या आपल्या जाहिरातींमधून मुलांचा अक्षरश: पाठलाग करताना दिसतात. अमेरिकेतलं प्रत्येक मूल वर्षभरातल्या 365 दिवसांमध्ये मॅक्डोनल्ड्सच्या किमान 25क् जाहिराती पाहतं, असा अभ्यास अहवाल आल्याचे वृत्त आहे. 
 
अमेरिकेतील वॉलमार्टसारखी अजस्त्र कंपनी असो की जनसामान्यांच्या आयुष्याच्या नसानसात भिनलेली गुगलसारखी कंपनी असो, आता मुलांचा विचार मोठय़ा गांभीर्याने होताना दिसतो. बाजारपेठेबरोबर मुलांविषयीचाही दृष्टिकोन धरून आणि त्यासंबंधी विशेष संशोधन करून मगच मोठे निर्णय घेण्याकडे बडय़ा कंपन्यांनी लक्ष पुरवल्याच्या बातम्या गेल्या काही वर्षात सतत ऐकू येत आहेत.
 
‘छोटा भीम’ या काटरुन मालिकेसोबत भारतीय संस्कृती जोडली गेली आहे. छोटय़ांनी मोठय़ांचा आदर करावा, हे आपली भारतीय संस्कृती शिकविते. या कार्टुनच्या माध्यमातून आजवर हेच चित्रित केले असून, ही मालिका पाहणा:या प्रेक्षकांची संख्या आजघडीला सहा कोटी एवढी आहे. 
 
सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की, भारतात पूर्वी आंतरराष्ट्रीय कार्टुन फिल्म्सची बाजारपेठ होती किंवा तिचा बोलबाला अधिक होता. आता येथे भारतीय काटरुन्स फिल्म्सला अधिक मागणी आहे. एक आवजरून नमूद करण्यासारखी बाब ती म्हणजे आजघडीला छोटा भीम तब्बल 12 देशांमध्ये ऑनएअर आहे. भारतात हिंदी, इंग्रजी, तामिळ आणि तेलगू या चार भाषांत छोटा भीम दाखवले जाते. मध्य-पूर्व देशांत सुद्धा छोटा भीम हे कार्टुन आवजरून पाहिले जाते. चायनीझ आणि अरब लोक पाहतात, हेच तर आमचे आणि भारतीय कार्टून फिल्म्स बाजारपेठेचे वैशिष्टय़ आहे. भविष्यात आम्ही ‘मायटी राजू’ आणि  ‘लव-कुश’ ही काटरुन्स भारतीय बाजारपेठेत दाखल करणार आहोत. 
 
टा भीम या पात्रची निर्मिती माझा सहकारी राजीव याने केली. झालं असं, की 2क्क्3 साली भारतात देशाबाहेरील काटरुन फिल्म्स मोठय़ा प्रमाणावर येत होत्या. या भाऊगर्दीत एकही भारतीय काटरुन फिल्म नव्हती. मग आम्हीच भारतीय काटरुन फिल्म्सवर विचार सुरू केला. राजीवने पात्र चित्रित केलं आणि आम्ही काम सुरू केलं. पण भारतीय बाजारपेठांना भारतीय काटरुन मालिका रुचावी, असं वातावरण नव्हतं. तरीही आम्ही जोमाने कामाला लागलो. 2क्क्4 साली ‘विक्रम-वेताळ’ केलं. मग ‘कृष्णा’ आणि त्यानंतर ‘छोटा भीम’ असा आमचा प्रवास झाला. 2क्क्8 साली छोटा भीम ही काटरुन मालिका सुरू झाली. आज या मालिकेला सहा वर्षे झाली असून, वर्षाला यावर दोन ते तीन चित्रपट येत आहेत. शिवाय आम्ही त्याचे थिएटर रिलीजही करतो. आजघडीला छोटा भीम काटरुन मालिकेचे तब्बल सहा कोटी प्रेक्षक  आहेत. या मालिकेत तुम्ही कुठेही पाहा, हिंसेचे चित्रण नाही. मालिकेची कथा साधी, सोपी आणि सरळ आहे. मालिकेचे कथाभाष्य उत्तम आहे. त्याची आणि प्रेक्षकांची चांगली नाळ जुळली आहे. भारतीय बाजारपेठेने छोटा भीम या काटरुन मालिकेला दिलेला प्रतिसाद पाहून आता आम्ही छोटा भीम थ्रीडी अॅनिमेशनमध्ये आणणार आहोत. मात्र यासाठी कमीत कमी दोन वर्षे लागतील. छोटा भीम मुलांर्पयत पोहोचण्यासाठीही आमच्या टीमने बरेच परिश्रम घेतले. लहान मुलांसाठी मग, कम्पास, टिफीन, टी-शर्ट, टुथब्रश, टुथपेस्टवरील जाहिरातींमधून छोटा भीम घराघरात, मुलांच्या हातात पोहोचला. सणासुदीतही छोटा भीमचं प्रमोशन केलं. सगळीकडे छोटा भीम दिसू लागला आणि त्याची लोकप्रियता कळसाला पोहोचली. 
(लेखक ‘छोटा भीम’चे मार्केटिंग हेड आहेत.)
 
- समीर जैन

 

Web Title: 'Chhota Bhim's love'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.